ETV Bharat / city

Nagar Panchayat Election 2022 : 'आर्थिक बळावर जागा जिंकल्या...'; दीपक केसरकरांचा भाजपावर घणाघात

author img

By

Published : Jan 20, 2022, 12:24 AM IST

Updated : Jan 20, 2022, 12:32 AM IST

Deepak Kesarkar
Deepak Kesarkar

राज्यातील नगरपंचायत निवडणुकांचा निकाल ( Maharashtra Nagarpanchayat Election Result 2022 ) हाती आला आहे. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसने भाजपला दूर सारत जोरदार मुसंडी मारली आहे. तर या निवडणुकीत भाजपाने आर्थिक बळावर जागा जिंकल्याचा आरोप दीपक केसरकर यांनी ( Deepak Kesarkar Criticizes Bjp ) केला आहे.

मुंबई - राज्यात नगर पंचायतीच्या निवडणुकांचा निकाल लागला ( Maharashtra Nagarpanchayat Election Result 2022 ) आहे. महाविकास आघाडीची यात सरशी झाली ( Mahavikas Aghadi Won Nagarpanchayat Election ) आहे. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसने भाजपला दूर सारत जोरदार मुसंडी मारली. शिवसेना नेते दीपक केसरकर यांनी या निकालाचे विश्लेषण करताना भाजपवर टीकास्त्र ( Deepak Kesarkar Criticizes Bjp ) सोडले. आर्थिक बळाचा वापर करून काही ठिकाणच्या जागा भाजपने जिंकल्या आहेत, असा आरोप केसरकर यांनी केला. सिंधुदुर्गातील राणे कुटुंबाच्या वर्चस्वावर ही त्यांनी शाब्दिक हल्ला चढवला. तसेच स्वबळावर निवडणुका लढवणाऱ्या काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी आजच्या निकालाचे आत्मपरीक्षण करावे, असा सल्लाही केसरकर यांनी दिला. ते ईटीव्ही भारतशी बोलत होते.

भाजपचा टिकावच लागला नाही

राज्यात नगरपंचायतीच्या निवडणुकीत महाविकास आघाडी सरकारला मोठे यश मिळाले आहे. जनतेचा महाविकास आघाडीकडे बघण्याचा दृष्टिकोन आणि त्याला मिळालेला पाठिंबा याचे प्रतिबिंब आजच्या निकालातून स्पष्ट दिसत आहे. आजच्या निकालाची विरोधकांशी तुलना होऊ शकत नाही, असा दावा शिवसेना नेते दीपक केसरकर यांनी केला. सर्वच ठिकाणी महाविकास आघाडी एकत्र लढली असती, तर अधिक चांगले निकाल आले असते. हजार, दीड हजार मते असलेल्या नगर पंचायतीमध्ये भाजपकडून आर्थिक व्यवहार करून जागा निवडून आणल्या आहेत. परंतु, मोठ्या नगरपंचायतमध्ये शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या जागा निवडून आल्या आहेत. भाजपचा तेथे टिकावच लागला नाही, असेही केसरकर म्हणाले.

शिवसेना नेते यांच्याशी संवाद साधताना प्रतिनिधि

राणे बोध घेतील

सिंधुदुर्गातील ज्या पंचायतीमध्ये दीड ते दोन हजार मत आहेत, ती पैसे देऊन विकत घेतलेला विजय आहे. मात्र, त्याला विजय म्हणता येणार नाही. ज्या नगरपंचायती हजारोंच्या संख्येने मत आहेत, तेथील जनतेने नारायण राणे आणि परिवाराला साफ धुडकावून लावला आहे. वैभव नाईक, संदेश पारकर यांनी चांगली भूमिका निभावली. एकंदरीत सिंधुदुर्गातील हवा राणेंच्या विरोधात असल्याचे आजच्या निकालातून सिद्ध होते. शिवाय पैशांचा वापर करून निवडणूक जिंकता येणार नाही, हे सुद्धा स्पष्ट झालेले आहे. आजच्या निकालातून राणे बोध घेतील, असा चिमटाही केसरकर यांनी यावेळी काढला. आगामी निवडणुकीत महाविकास आघाडीला चांगले यश मिळेल, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.

शहरात फरफट तर ग्रामीण भागाचा विचारच करू नये

भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी राज्यात नगरपंचायत निवडणुकीत मोठे यश मिळाल्याचा दावा केला. दीपक केसरकर यांनी पाटील यांचा दावा खोडून काढताना जोरदार कानपिचक्या ( Deepak Kesarkar On Chandrakant Patil ) दिल्या. बहुतांश नगरपंचायतींमध्ये त्यांना विरोधी पक्ष म्हणून बसावे लागलेले आहे. विरोधी पक्ष म्हणूनच त्यांची भूमिका महाराष्ट्रात राहील. चंद्रकांत पाटील यांनी केलेले विधान विरोधी पक्षाला साजेसे आहे. पराभव त्यांनी मान्य करावा. माझ्या विधानसभा मतदार संघातील एक नगरपंचायत गेली. हा पराभव मला मान्य आहे. काही चुका झाल्या असतील. जनतेचा कौल मान्य करायला हवा. राज्यात महाविकास आघाडी सरकार म्हणून आम्ही राज्य करतो आहोत. वेगवेगळे पक्ष म्हणून नाही. भाजप हा राष्ट्रीय पक्ष आहे. देशात सगळ्यात बहुमताचा आकडा त्यांच्याकडे आहे. मोदींसारखा चेहरा असताना शहरी भागात भाजपची फरफट होत असेल तर ग्रामीण भागातील विचार त्यांनी करू नये, असा सल्ला केसरकर यांनी दिला.

काँग्रेसने आत्मपरीक्षण करावे

राज्यात महाविकास आघाडी म्हणून आम्ही निवडणूक लढत आहोत. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस अनेक ठिकाणी आघाडी करून लढले. तर काँग्रेसने एकटा चलो ची भूमिका घेतली आहे. काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींनी याचे आत्मपरीक्षण दिल्लीला करायला हवे. एकत्र लढल्याने फायदा होतो की तोटा होतो हे पहायला हवे. राज्यात महाविकास आघाडी म्हणून एकत्र आहोत हे लक्षात घेऊन, काँग्रेसने वेगळी भूमिका घेतली तर आगामी निवडणुकांत त्याचा चांगले यश आघाडीला मिळू शकते, असेही केसरकर ( Deepak Kesarkar On Congress ) म्हणाले.

हेही वाचा - Nagar Panchayat Result : राज्यात भाजपच सर्वात मोठा पक्ष.. मात्र, महाविकास आघाडीची सरशी

Last Updated :Jan 20, 2022, 12:32 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.