ETV Bharat / city

Andheri East Assembly By election: पालिकेच्या आयुक्तांवर गद्दारांचा दबाव.. शिवसेनेने घेतली 'अशी' भूमिका.. न्याय मिळणारच

author img

By

Published : Oct 12, 2022, 5:45 PM IST

Uddhav Thackeray Group Allegations
Uddhav Thackeray Group Allegations

Uddhav Thackeray Group Allegations: अंधेरी पूर्व येथील पोट पोटनिवडणुकीत Andheri East Assembly By election: ऋतुजा लटके यांना शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाकडून उमेदवारी देण्यात आली आहे. मात्र त्यांचा राजीनामा पालिकेने अद्याप स्वीकारलेला नाही. या प्रकरणी गद्दारांचा दबाव असून या दबावाखाली पालिका आयुक्त काम करत असल्याचा आरोप माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वर Former Mayor Vishwanath Mahadeshwar यांनी केला आहे. दरम्यान आम्हाला न्यायालयात नक्की न्याय मिळेल असेही महाडेश्वर म्हणाले आहेत.

मुंबई: Andheri East Assembly By election: अंधेरी पूर्व येथील पोट पोटनिवडणुकीत ऋतुजा लटके यांना शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाकडून उमेदवारी देण्यात आली आहे. मात्र त्यांचा राजीनामा पालिकेने अद्याप स्वीकारलेला नाही. या प्रकरणी गद्दारांचा दबाव असून या दबावाखाली पालिका आयुक्त काम करत असल्याचा आरोप माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वर Former Mayor Vishwanath Mahadeshwar यांनी केला आहे. दरम्यान आम्हाला न्यायालयात नक्की न्याय मिळेल असेही महाडेश्वर म्हणाले आहेत.

पालिका आयुक्त दबावाखाली ऋतुजा लटके यांनी राजीनामा दिल्या नंतरही त्यांचा राजीनामा मुंबई पालिकेकडून Mumbai Municipality मंजूर केला जात नाही. या प्रकरणी आज ऋतुजा लटके यांच्यासह माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वर, उप महापौर हेमांगी वरळीकर, माजी नगरसेवक चंद्र शेखर वायंगणकर आदीनी पालिका आयुक्तांची भेट घेतली आहे. यानंतर विश्वनाथ महाडेश्वर पत्रकारांशी बोलत होते. यावेळी बोलताना ऋतुजा लटके यांनी राजीनामा दिला आहे. त्यांनी एक महिन्याचे वेतन पालिकेकडे जमा केले आहे. तरीही राजीनामा मंजूर केलेला नाही. राजीनामा मंजूर का केला नाही. याबाबत प्रश्न विचारल्यावर काहीही उत्तर देत नाही. आयुक्तांवर दबाव आहे. लोकशाहीमध्ये प्रशासन असे वागायला लागले, तर लोकशाही कशी टिकणार असा प्रश्न उपस्थित करत हा संविधानाचा अवमान केला जात असल्याचे महाडेश्वर यांनी म्हटले आहे.

शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाचा आरोप

मशाल चिन्हावर निवडणूक लढणार ऋतुजा लटके या आपल्या राजीनामा बाबत पालिका मुख्यालयात आले होते. माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वर, उप महापौर हेमांगी वरळीकर, माजी नगरसेवक चंद्र शेखर वायंगणकर आदी उपस्थित होते. यावेळी बोलताना शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून मशाल चिन्हावर निवडणूक लढवणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. मी राजीनामा दिला आहे. नियमानुसार एक महिन्याचा पगार पालिकेकडे जमा केला आहे. माझी सही बाकी आहे, सांगितलं जात आहे. मी गेले ३ दिवस कार्यालयात येवून बसत आहे. आज आयुक्तांची भेट घेवून राजीनामा मंजूर करण्याची मागणी करणार आहे, असे ऋतुजा लटके यांनी सांगितले आहे.

ऋतुजा लटके पालिकेत अंधेरी पूर्व येथील आमदार रमेश लटके यांच्या निधनामुळे त्यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांना उमेदवारी देण्यात आली आहे. ऋतुजा लटके या मुंबई महापालिका कर्मचारी असून त्यांनी नोकरीचा राजीनामा दिला आहे. मात्र हा राजीनामा मंजूर केला नसल्याने आज त्यांनी आयुक्तांना भेटण्याचा प्रयत्न केला आहे. आयुक्तांचे पी ए असलेले सह आयुक्त चंद्रशेखर चोरे यांच्या कार्यालयात त्या दुपारी १.३० च्या दरम्यान दाखल झाल्या आहेत. सुमारे अर्धा तास वाट पाहिल्यावर त्यांना चोरे यांनी भेटीसाठी बोलावले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.