ETV Bharat / city

Mumbai Weather Forecast मुंबईत ढगांच्या गडगडाटासह पाऊस; शुक्रवार ते रविवारपर्यंत यलो अलर्ट

author img

By

Published : Sep 7, 2022, 9:13 PM IST

Mumbai Weather Forecast मुंबईत मागील काही दिवसांपासून पावसाने दडी मारली होती. Mumbai Weather Forecast आज बुधवारी संध्याकाळी 5 नंतर विजांचा कडकडाट आणि वा-यासह जोरदार पाऊस पडला. Mumbai Rain Yellow Alert यामुळे कामावरून घरी परतणा-या मुंबईकरांची चांगलीच तारांबळ उडाली.

Mumbai Weather Forecast
Mumbai Weather Forecast

मुंबई मुंबईत मागील काही दिवसांपासून पावसाने दडी मारली होती. Mumbai Weather Forecast आज बुधवारी संध्याकाळी 5 नंतर विजांचा कडकडाट आणि वा-यासह जोरदार पाऊस पडला. Mumbai Rain Yellow Alert यामुळे कामावरून घरी परतणा-या मुंबईकरांची चांगलीच तारांबळ उडाली. Mumbai Rain Update काही ठिकाणी वाहतूकही मंदावली. Maharashtra Rain Updates दरम्यान हवामान विभागाने Department of Meteorology गणपती विसर्जनाच्या दिवशी म्हणजे शुक्रवार ते रविवारपर्यंत 3 दिवस पावसाचा येलो अलर्ट जारी केला आहे. या दिवशी मुसळधाऱ पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

शुक्रवार ते रविवारपर्यंत यलो अलर्ट

अनेकांची तारांबळ उडाली मुंबईत मागील काही दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली होती. गेल्या शनिवार, रविवारी पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या. त्यानंतर पावसाने पुन्हा दडी मारली. त्यामुळे वातावरणातील आर्द्रता वाढल्याने उकाड्याने मुंबईकर त्रस्त झाले आहे. त्यानंतर बुधवारी संध्याकाळी 5 नंतर पावसाने अचानक जोरदार वा-यासह सुरुवात केली. तासभर पडलेल्या पावसाने मुंबईकरांना चांगलेच झोडपून काढले आहे.

रस्ते वाहतूकीसह रेल्वे वाहतूकीवर परिणाम काही ठिकाणी रस्ते वाहतूक मंदावल्याने वाहतूक जॅम झाली होती. बरकत, अली नाका, सहारा स्टार येथील दोन्ही बाजूची वाहतूक मंदावली होती. मिलन सबवे परिसरातील वाहतुकीवर ही परिणाम झाला आहे. वाहतूक मंदावल्याने वाहनांच्या रांगा लागल्याचे चित्र होते. पावसाचे वातावरण नसल्याने चाकरमानी छत्रीवीना सकाळी कामानिमित्त घराबाहेर पडले होते. त्यामुळे अनेकांची तारांबळ उडाली. वा-यासह पाऊस पडल्याने छत्री असूनही उपयोग झाला नाही. वा-यासह पडलेल्या पावसाचा रस्ते वाहतूकीसह रेल्वे वाहतूकीवरही परिणाम झाला. रेल्वेचा वेगही मंदावला होता. दरम्यान पावसामुळे वातावरणात काहीसा गारवा निर्माण झाल्याने उकाड्याने हैराण झालेले मुंबईकर सुखावले आहेत.

या ठिकाणी पावसाची नोंद पालिका मुख्य कार्यालय परिसरात १८ मिलीमीटर, मलबार हिल, ब्रिटानिया येथे १७ मिलीमीटर, मुलुंड फायर स्टेशन येथे २८ मिलीमीटर, विक्रोळी २६ मिलीमीटर, गवाणपाडा २२ मिलीमीटर, मरोळ ९ मिलीमीटर तसेस दादर, वडाळा, भायखळा, मुलुंड, भांडुप, घाटकोपर, विद्याविहार, चेंबूर, बरकत अली नाका, सहारा स्टार, कुर्ला, गोवंडी, वांद्रे, मालाड, कांदिवली, बोरीवली आदी ठिकाणी जोरदार पाऊस कोसळला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.