ETV Bharat / city

Sameer Wankhede Extortion Case : पुराव्यांअभावी तपास थांबवण्याची मुंबई पोलिसांवर नामुष्की

author img

By

Published : Dec 23, 2021, 10:18 AM IST

Sameer Wankhede
समीर वानखेडे

एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी लाच घेतल्याचा आरोप ( Sameer Wankhede Extortion Case ) केला. प्रकरणातील साक्षीदार किरण गोसावी ( Kiran Gosavi Arrested ) याला काही दिवसांपूर्वीच अटकही करण्यात आली. पण या प्रकरणात अजूनही काही पुरावे सापडत नसल्याने तपास थांबवावा लागण्याची नामुष्की या पथकावर ओढवली आहे.

मुंबई - आर्यन खान क्रूझ ड्रग पार्टी प्रकरणात (Aryan Khan Cruise Drug Party Case ) एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी लाच घेतल्याचा आरोप ( Sameer Wankhede Extortion Case ) केला. प्रकरणातील साक्षीदार किरण गोसावी ( Kiran Gosavi Arrested ) याला काही दिवसांपूर्वीच अटकही करण्यात आली. लाच प्रकरणाच्या तपासासाठी मुंबई पोलिसांकडून विशेष तपास पथक नेमण्यात आले. पण या प्रकरणात अजूनही काही पुरावे सापडत नसल्याने तपास थांबवावा लागण्याची नामुष्की या पथकावर ओढवली आहे.

तपास थांबविला -

क्रूझ ड्रग्ज प्रकरणात आर्यन खानला एनसीबीने ताब्यात घेतले. त्या रात्री साक्षीदार किरण गोसावी व अभिनेता शाहरूख खानची मॅनेजर पूजा ददलानी यांच्यात तडजोड झाल्याचा गौप्यस्फोट दुसरा साक्षीदार प्रभाकर साईल याने केला आहे. याच कथित खंडणी प्रकरणाचा तपास करण्यासाठी एसआयटी ( Special Inquiry Team ) नेमण्यात आली. आतापर्यंत या प्रकरणात सुमारे 20 जणांचे जबाब घेण्यात आल्याची माहिती मुंबई पोलिसांनी दिली. तपासात एकही पुरावा मिळत नसल्याने अद्याप गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. त्यामुळे पुढील आदेश येईपर्यंत या प्रकरणाचा तपास थांबविण्यात आल्याचे मुंबई पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आले आहे. प्रभाकर साईल याच्या गौप्यस्फोटानंतर या प्रकरणाला वेगळं वळण लागलं होतं.

पूजा ददलानीची साक्ष महत्वाची -

दरम्यान, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, वसुली आणि लाच या दोन प्रकरणांमध्ये ददलानीचा ( Puja Dadlani Statement ) जबाब अत्यंत महत्वाचा आहे. पण ती समोर येत नसल्यामुळे या प्रकरणाचा तपास पुढे सरकत नसल्याचे या विशेष तपास पथकातील अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार पूजा ददलानीला मुंबई पोलिसांनी समन्स बजावले होते. मात्र तिने प्रकृतीचे कारण सांगून उपस्थित न राहता वेळ मागून घेतली. त्यामुळेच पोलिसांना अद्यापही तिचा जबाब नोंदवता आला नाही.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.