ETV Bharat / city

Mumbai police : फसवणूकीच्या आरोपीस पोलीसांनी डिलिव्हरी बॉय बनुन पकडले

author img

By

Published : Oct 12, 2022, 1:15 PM IST

Mumbai Police arrested to accused
मुंबई पोलिस आयुक्तालयात संबंधित गुन्ह्यात कारवाई केलेले गुन्हे शाखेचे पथक

मुंबई शहरातून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. एल टी मार्ग पोलीस ठाण्याच्या ( L T Marg police station ) हद्दीतील आर्थिक फसवणूकीच्या गुन्ह्याची नोंद असलेला आरोपी अनेक दिवसांपासून फरार होता.मुंबई पोलिसांनी डिलिव्हरी बाॅय आणि फेरीवाले यांच्या वेशात ( Mumbai police in guise of a delivery boy ) श्रीकुमार शंकरा पिल्लई ( 68 ) वर्ष यास अटक करण्यात आली आहे. यासोबतच दोन कोटींची रोख रक्कम हस्तगत करण्यात पोलिसांना यश मिळाले आहे.

मुंबई - मुंबई शहरातून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. एल टी मार्ग पोलीस ठाण्याच्या ( L T Marg police station )हद्दीतील आर्थिक फसवणूकीच्या गुन्ह्याची नोंद असलेला आरोपी अनेक दिवसांपासून फरार होता.मुंबई पोलिसांनी डिलिव्हरी बाॅय आणि फेरीवाले ( Mumbai police in guise of a delivery boy ) यांच्या वेशात श्रीकुमार शंकरा पिल्लई ( 68 ) वर्ष यास अटक करण्यात आली आहे. यासोबतच दोन कोटींची रोख रक्कम हस्तगत ( Cash amount of two crores seized by police ) करण्यात पोलिसांना यश मिळाले आहे.

sMumbai Police arrested to accused
sमुंबई पोलिस आयुक्तालयात संबंधित गुन्ह्यात कारवाई केलेले गुन्हे शाखेचे पथक

काय आहे प्रकरण - एल टी मार्ग पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ईएमके ज्वेलर्स या नावाने शोरूम आहे. 2020 ते 21 मध्ये सोन्याच्या दागिन्यांची खरेदी विक्री होलसेलमध्ये एस कुमार ज्वेलर्स व एस कुमार गोल्ड अँड डायमंडचे मालक तथा आरोपी श्रीकुमार पिल्लई याच्यासोबत व्यवसाय सुरू होता .व्यवसायातून फिर्यादी व इतर व्यापारी यांच्याकडून सोन्याचे दागिने आरोपी यांनी घेतले आणि नंतर डिसेंबर 2020 पासून दागिन्यांचे पैसे परत देण्यास टाळाटाळ करून भारतातील विविध ठिकाणी असलेले बारा सोन्याचे शोरूम अचानक बंद करून पलायन केले. नंतर एकूण चार करोड 22 लाख 74 हजार 270 इतकी रक्कम न देता आरोपीने व्यावसायिकांची फसवणूक केल्याबाबत एलटी मार्ग पोलीस ठाण्यात आयपीसी कलम 409 420 34 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

sMumbai Police arrested to accused
sमुंबई पोलिस आयुक्तालयात संबंधित गुन्ह्यात कारवाई केलेले गुन्हे शाखेचे पथक

वेशांतर करून घेतला शोध - एल टी मार्ग पोलीस ठाण्याचे गुन्हे शाखेच्या पथकाने आरोपी श्रीकुमार पिल्लई याचा गोपनीय सूत्रांकडून व तांत्रिक माहितीच्या आधारे शोध घेण्यास सुरुवात केली. पोलिसांना आरोपी हा मानपाडा डोंबिवली या ठिकाणी स्वतःचे अस्तित्व लपवून दुसऱ्या व्यक्तीच्या नावाने भाड्याने रूम घेऊन राहत असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. त्यानुसार गुन्हे शाखेच्या पथकातील पोलीस अधिकारी आणि अंमलदारांनी या परिसरात तीन ते चार दिवस कुरियर बॉय, डिलिव्हरी बॉय व फेरीवाले असे वेषांतर करून वांटेड आरोपीचा शोध घेऊन तो राहत असलेल्या त्याच्या भाड्याच्या घरातून शिताफीने ताब्यात घेतले.

दोन कोटींची रक्कम जप्त - पोलिसांनी डोंबिवली येथील राहत्या घराची झडती घेतली असता त्या ठिकाणी कोणतीही किमती मालमत्ता मिळून आलेली नाही. मात्र, त्या ठिकाणी सापडलेल्या एका बीएमडब्ल्यू कारच्या चावीवरून पोलिसांनी आरोपीकडे कौशल्यपूर्ण चौकशी करून परिसरातून एक किलोमीटर अंतरावर पार्क करण्यात आलेल्या बीएमडब्ल्यू कारचा शोध घेण्यात आला. या बीएमडब्ल्यू कारच्या झड़ती दरम्यान पोलिसांना कारमध्ये गुन्ह्यातील मालमत्तेपैकी भारतीय चलनातील 500 आणि 2000 रुपयांच्या एकूण रोख रक्कम रुपये दोन कोटी नऊ लाख रुपये आरोपीने लपवून ठेवलेले सापडले. ही मालमत्ता पोलिसांनी तात्काळ पंचनामा करून जप्त केली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.