ETV Bharat / city

Indias First Microfactory आयआयटी बॉम्बेमध्ये देशातील पहिला सूक्ष्म कारखाना सुरू

author img

By

Published : Aug 16, 2022, 11:24 AM IST

Mumbai Firsttime India Microfactroy IITB
देशातील पहिला सूक्ष्म कारखाना

सम्राट सागर आयआयटी मुंबईचा विद्यार्थी हा यांत्रिकी अभियंता शाखेमध्ये पीएचडी करत आहे त्याने लिंकडिंग यांचे वरिष्ठ संचालक बालाजी श्रीनिवासन यांच्या सहकार्याने हरिवल्लभ नगर मायक्रो फॅक्टरी Micro factories सूक्ष्म कारखाने नावाचे एक मिशन आयआयटी मुंबईमध्येच IIT Mumbai सुरू केली त्याचे उद्घाटन स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्ताने नुकतेच बालाजी श्रीनिवासन Balaji Srinivasan यांच्या हस्ते झाले

मुंबई आयआयटी मुंबई हे सतत उच्च शिक्षणामध्ये अत्यंत उच्च तंत्रज्ञानाचा अभ्यास आणि त्यातून विविध तज्ञ निर्माण करण्याचा प्रयत्न करत असते. आयआयटी मुंबईचा इतिहास साक्ष आहे की ज्या ज्या विद्यार्थ्यांना मूलभूत विषयावर ज्ञान प्राप्त करायचे आहे. आपल्या देशासाठी अनेक पातळीवर नवनवीन शोध तंत्रज्ञान याचा अभ्यास करायचा असेल तर आयआयटी मुंबई मध्ये जे वातावरण लागते ते निराळाच आहे. सम्राट सागर आयआयटी मुंबईचा IIT Mumbai विद्यार्थी यांत्रिकी अभियंता शाखेमध्ये पीएचडी करत आहे. त्याने लिंकडिंग यांचे वरिष्ठ संचालक बालाजी श्रीनिवासन यांच्या सहकार्याने हरिवल्लभ नगर मायक्रो फॅक्टरी Micro factories सूक्ष्म कारखाने नावाचे एक मिशन आयटी मुंबईमध्येच सुरू केली. त्याचे उद्घाटन स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्ताने नुकतेच बालाजी श्रीनिवासन Balaji Srinivasan यांच्या हस्ते झाले.



कशी चालते मायक्रोफॅक्टरी मायक्रो फॅक्टरीज म्हणजे स्वयंचलित सर्व कामे एकाच प्रणाली अंतर्गत केले जातात. यासाठी ऊर्जेची बचत जागेची बचत वेळेची बचत होते. तसेच पारंपारिक उत्पादन यंत्रे जी आहेत त्यांचा जो आकार आहे तो बदलून यामध्ये जशी जागा उपलब्ध असेल त्या पद्धतीने डिझाईन निर्मिती होते. त्यानुसार यंत्र निर्मिती करून स्वयंचलित पद्धतीने संपूर्ण उत्पादन प्रणाली चालते. विशेष म्हणजे मायक्रो फॅक्टरी Micro factories मेकर स्पेस यामध्ये इलेक्ट्रॉनिक कचरा पुन्हा वापरण्याची पद्धत आहे. ज्यामुळे पर्यावरणाला पूरक अशी उत्पादन प्रणाली आहे.

आयआयटी बॉम्बे मध्ये देशातील पहिला सूक्ष्म कारखाना सुरु



मायक्रो फॅक्टरी कुठून आली जापान मध्ये 1990 च्या दशकामध्ये मायक्रो फॅक्टरी ही संकल्पना प्रत्यक्ष वापरात आली .सामाजिक उद्योजकता याच्यातून पुढे येत गेली आणि ऊर्जेचा वापर कमीत कमी व्हावा ऊर्जेचे संवर्धन व्हावे हा उद्देश यामागे होता. तसेच यामध्ये भांडवल गुंतवणूक देखील कमीत कमी व्हावी ऑपरेशन खर्च देखील कमी व्हावा कार्बन उत्सर्जनदेखील कमी व्हावे अशी डायनामिक प्रणाली यामध्ये वापरली जाते. स्पर्धात्मक जगासाठी सध्याच्या उत्पादन बाजारपेठेसाठी कोणतीही सीमा नसलेली अशी ही उत्पादन प्रणाली आयआयटी मुंबईच्या आवारात लिंकडइन समाज माध्यमाचे वरिष्ठ संचालक बालाजी श्रीनिवासन यांच्या सहकार्याने सुरू झाली.




मायक्रो फॅक्टरीचा प्रवास जपामधून भारतात 1990 ते 2000 च्या दशकात जापान मध्ये स्वयंचलित उत्पादनासाठी सुरू झालेली एक प्रणाली आहे. ज्या द्वारे स्वयंचलित पद्धतीने मेकॅनिकल इंजिनियर प्रयोगशाळेमध्ये जागा ऊर्जा साहित्य वेळ आणि भांडवलाची बचत करणारे म्हणून सूक्ष्म कारखाने या नावाने ओळखले जाऊ लागले. सामान्यता मायक्रो फॅक्टरी म्हणजे सूक्ष्म कारखाने उत्पादन प्रक्रिया विशेष करून डिजिटल फॅब्रिकेशन तंत्रज्ञानाचा उपयोग त्यामध्ये होतो. उदाहरणार्थ द्यायचे झाले तर गेल्या सात ते दहा आठ वर्षांमध्ये थ्रीडी प्रिंटिंग हे प्रचलित झालेले आहे. लिंकडिंगचे वरिष्ठ संचालक बालाजी श्रीनिवासन जे रोबोटिक्स मध्ये आणि अनेक क्षेत्रांमध्ये तज्ज्ञ आहेत. बालाजी श्रीनिवासन विशेष करून सॉफ्टवेअर मधील रचना त्याचा विकास आणि त्यासाठी मोठ्या व्याप्तीवर त्याचा उपयोग स्थळ काळानुरूप कसा करावा त्यावर ते उपाययोजना करतात. त्यासाठी अत्यंत उच्च दर्जाचं वेब किंवा मोबाईलला लागणारे आपलिकेशन तयार करणे हे देखील काम ते करतात. ते सध्या अमेरिकेत असतात त्यांच्या सहकार्याने सम्राट सागर याने आयटी मुंबईमध्ये सूक्ष्म कारखाने मिशन सुरू केले अशी माहिती सम्राट सागर याने आपल्या ट्विटमध्ये दिली.

हेही वाचा Serum Institute special vaccine सिरम इन्स्टिट्यूटची ओमायक्रॉनवरील खास लस या वर्षीच्या अखेर पर्यंत बाजारपेठेत येणार

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.