ETV Bharat / city

Kishori Pednekar On CM Eknath Shinde : पालिकेच्या शिवसेना कार्यालयात हार तुरे घेऊन उभे होतोत मात्र मुख्यमंत्री भाजपा... - किशोरी पेडणेकर

author img

By

Published : Jul 6, 2022, 4:18 PM IST

मुंबईत सलग दोन दिवस मुसळधार पाऊस ( Heavy Rain In Mumbai ) पडला आहे. यामुळे सखल भागात पाणी साचून जनजीवन विस्कळीत झाले आहे. या पार्श्वभूमीवर काल मंगळवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( CM Eknath Shinde ) यांनी पालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाला भेट देऊन आढावा घेतला. आज मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर ( Mumbai Farmer Mayor Kishori Pednekar ) यांनी आपत्कालीन व्यवस्थापन विभागाला भेट दिली त्यानं नंतर त्या पत्रकारांशी बोलत होत्या. यावेळी बोलताना मुंबईत पाणी साचणार नाही असा कधीही दावा केलेला नाही. पण साचलेल्या पाण्याचा निचरा जलदगतीने कसा होईल हे पाहणे गरजेचे आहे.

Kishori Pednekar On Rain Water
किशोरी पेडणेकर

मुंबई - राज्याचे नवे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( CM Eknath Shinde ) काल पालिका मुख्यालयात आले होते. त्यावेळी ते महापालिकेमधील शिवसेना कार्यालयात येतील असे वाटले होते. मात्र ते आलेच नाहीत. मुख्यमंत्री आम्ही शिवसैनिक आहोत असे सतत बोलत आहेत. आम्ही शिवसेनेच्या कार्यालयात त्यांची हार तुरे घेऊन वाट बघत होतो. मात ते भाजपच्या कार्यालयात गेले असे मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर ( Mumbai Farmer Mayor Kishori Pednekar ) यांनी म्हटले आहे.

पावसाच्या पाण्याचा निचरा हेच आमचे यश - मुंबईमध्ये पाऊस पडला की पाणी साचते. हे पाणी काही तास तसेच साचलेले असायचे. मात्र मुंबई महानगरपालिकेने केलेल्या उपायोजनांमुळे पाण्याचा निचरा जलद गतीने होत आहे. हेच आमचे यश आहे. या कामांमुळेच नवनिर्वाचित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्तुती केल्याचे किशोरी पेडणेकर यांनी म्हटले आहे.

उपायोजनांमुळे पाण्याचा निचरा जलद - मुंबईत सलग दोन दिवस मुसळधार पाऊस पडला आहे. यामुळे सखल भागात पाणी साचून जनजीवन विस्कळीत झाले आहे. या पार्श्वभूमीवर काल मंगळवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाला भेट देऊन आढावा घेतला. आज मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी आपत्कालीन व्यवस्थापन विभागाला भेट दिली त्यानं नंतर त्या पत्रकारांशी बोलत होत्या. यावेळी बोलताना मुंबईत पाणी साचणार नाही असा कधीही दावा केलेला नाही. पण साचलेल्या पाण्याचा निचरा जलदगतीने कसा होईल हे पाहणे गरजेचे आहे. पालिकेने गेल्या काही वर्षात पम्पिंग स्टेशन, भूमिगत टाक्या, पाणी उपसा करणारे पंप आदी उपाययोजना केल्याने यंदा पाऊस पडला. त्यानंतरही पाण्याचा निचरा कमी वेळात झाला. आताही तीन ते चार ठिकाणी पाणी साचले आहे ते का आहे आणि त्याचा निचरा कसा होईल यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. मुंबईकर नागरिकांना दिलासा मिळेल असे काम आम्ही करत आहोत असे पेडणेकर म्हणाल्या. पालिकेने गेले काही वर्षात जे काम केले आहे याची नवनिर्वाचित मुखमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्थिती केली आहे. त्यावरून आम्ही चांगले काम केले हे स्पष्ट होते असे पेडणेकर म्हणाल्या.

हेही वाचा- Video : ...तर मातोश्रीवर पुन्हा जाऊ,... बंडखोर आमदार संजय राठोड यांच्या विधानाने खळबळ

हेही वाचा - Raj Thackeray : शिंदे गट मनसेत सामील होणार?, बंडखोर आमदाराने राज ठाकरेंची भेट घेतल्याने चर्चेला उधाण

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.