ETV Bharat / city

Mumbai Corona Update : मुंबईत सलग दुसऱ्या दिवशी रुग्णांची संख्या २० हजारावर

author img

By

Published : Jan 7, 2022, 8:58 PM IST

मुंबईत आज (७ जानेवारीला) २०,९७१ नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर ६ मृत्यूची नोंद झाली आहे. आज ८४९० रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत एकूण ८ लाख ७४ हजार ७८० रुग्णांची नोंद झाली आहे. त्यापैकी ७ लाख ६४ हजार ५३ रुग्ण बरे झाले आहेत. तर १६ हजार ३९४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

Mumbai Corona Update
Mumbai Corona Update

मुंबई - मुंबईत डिसेंबर महिन्यापासून पुन्हा कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. पहिल्या लाटे दरम्यान २८०० तर दुसऱ्या लाटेदरम्यान कोरोनाचे ११ हजार ५०० सर्वाधिक रुग्णांची नोंद झाली होती. बुधवारी दुसऱ्या लाटेचा रेकॉर्ड तोडत १५,१६६ तर काल गुरुवारी २०,१८१ रुग्णांची नोंद झाली. आज शुक्रवारी पुन्हा २०,९७१ रुग्णांची नोंद झाली आहे. सक्रिय रुग्णांची संख्या ९१,७३१ वर पोहचली आहे. दरम्यान आज धारावीतही १५० रुग्णांची नोंद झाली आहे.

२०,९७१ नव्या रुग्णांची नोंद -

मुंबईत आज (७ जानेवारीला) २०,९७१ नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर ६ मृत्यूची नोंद झाली आहे. आज ८४९० रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत एकूण ८ लाख ७४ हजार ७८० रुग्णांची नोंद झाली आहे. त्यापैकी ७ लाख ६४ हजार ५३ रुग्ण बरे झाले आहेत. तर १६ हजार ३९४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. ९१ हजार ७३१ सक्रिय रुग्ण आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८७ टक्के तर रुग्ण दुपटीचा कालावधी ५६ दिवस इतका आहे. मुंबईमधील १२३ इमारती आणि ६ झोपडपट्ट्या सील करण्यात आली आहे. ३१ डिसेंबर ते ६ जानेवारी या कालावधीत कोरोना वाढीचा दर १.२३ टक्के इतका आहे.

८३.६ टक्के बेड रिक्त -

मुंबईत आज आढळून आलेल्या २०,९७१ रुग्णांपैकी १७६१४ म्हणजेच ८४ टक्के लक्षणे नसलेले रुग्ण आहेत. आज १३९५ रुग्णांना रुग्णालयात दाखल करावे लागले. ८८ रुग्णांना ऑक्सिजन बेडची आवश्यकता भासली आहे. मुंबईत रुग्णालयांमध्ये ३५,६४५ बेडस असून त्यापैकी ६५३१ बेडवर म्हणजेच १८.३ टक्के बेडवर रुग्ण आहेत. इतर ८१.२ टक्के बेड रिक्त आहेत.


अशी वाढली रुग्णसंख्या -

मुंबईत गेल्या वर्षी मार्च महिन्यात कोरोना विषाणूचा पहिला रुग्ण आढळून आला. तेव्हापासून मुंबईत कोरोनाचा प्रसार आहे. फेब्रुवारी महिन्यात दुसरी लाट आली. एप्रिल महिन्यात रुग्णसंख्या ११ हजारावर गेली होती. जूनपासून त्यात घट होऊ लागली. १ डिसेंबरला कोरोनाचे १०८ नवे रुग्ण आढळून आले होते. २ डिसेंबरला त्यात वाढ होऊन २२८ रुग्ण आढळून आले. १७ डिसेंबरला २९५, १९ डिसेंबरला ३३६, २२ डिसेंबरला ४९०, २३ डिसेंबरला ६०२, २४ डिसेंबरला ६८३, २५ डिसेंबर ७५७, २६ डिसेंबर ९२२, २७ डिसेंबरला ८०९, २८ डिसेंबरला १३७७, २९ डिसेंबरला २५१०, ३० डिसेंबर ३६७१, ३१ डिसेंबरला ५६३१, १ जानेवारीला ६३४७, २ जानेवारीला ८०६३, ३ जानेवारीला ८०८२, ४ जानेवारीला १०८६०, ५ जानेवारीला १५,१६६, ६ जानेवारीला २०,१८१, ७ जानेवारीला २०,९७१ नवीन रुग्ण आढळून आले आहेत.

नऊ वेळा शून्य मृत्यूची नोंद -


मुंबईमध्ये कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर गेल्या काही महिन्यात १ ते ६ मृत्यूंची नोंद झाली होती. १७ ऑक्टोंबर २०२१ रोजी शून्य मृत्युची नोंद झालेली आहे. त्यानंतर ११ डिसेंबर, १५ डिसेंबर, १८ डिसेंबर, २० डिसेंबर, २२ डिसेंबर, २५ डिसेंबर, ३० डिसेंबरला, २ जानेवारीला शून्य मृत्यूची नोंद झाली आहे.

धारावीत १५० रुग्ण -


मुंबईतील धारावी ही सर्वात मोठी झोपडपट्टी कोरोनाच्या पहिल्या लाटेदरम्यान हॉटस्पॉट ठरली होती. पहिल्या लाटे दरम्यान सर्वाधिक ९४, तर दुसऱ्या लाटेदरम्यान ९९ रुग्ण आढळून आले होते. धारावीत गेले काही महिने कोरोनाचे १ ते ५ रुग्ण आढळून येत होते. मात्र मुंबईत रुग्णसंख्या वाढू लागल्यावर धारावीतही रुग्णसंख्या वाढू लागली आहे. धारावीत ३० डिसेंबरला २०, ३१ डिसेंबरला ३४, १ जानेवारीला २४, २ जानेवारीला ६०, ३ जानेवारीला ४१, ४ जानेवारीला ४०, ५ जानेवारीला ८१, ६ जानेवारीला १०७, ७ जानेवारीला १५० रुग्णांची नोंद झाली आहे. धारावीत एकूण ७७७६ रुग्ण असून ६७७१ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. धारावीत सध्या ५८८ सक्रिय रुग्ण आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.