ETV Bharat / city

Mumbai Quit India Movement : 'भारत छोडो आंदोलना'चे मुंबई ठरले केंद्रबिंदू!

author img

By

Published : Aug 8, 2022, 8:05 PM IST

भारताची आर्थिक राजधानी ( Financial capital of India ) म्हणून मुंबईची ओळख आहे. जागतिक दर्जाचे शहर म्हणून मुंबई ओळखले जाते. याच मुंबईने स्वातंत्र्य पूर्व काळात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आणि इथूनच "भारत छोडो आंदोलन" ( Bharat Chhodo Andolan in Mumbai ) सुरू झाले. मुंबईमधील बाळ गंगाधर टिळक आणि नंतर महात्मा गांधी यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबईतील ( mumbais contribution in freedom movement ) नेत्यांनी काँग्रेस चळवळीचे नेतृत्व केले.

quit india movement in Mumbai
'भारत छोडो आंदोलना'त सहभागी महात्मा गांधी आणि त्यांचे सहकारी

मुंबई - भारताची आर्थिक राजधानी ( Financial capital of India ) म्हणून मुंबईची ओळख आहे. जागतिक दर्जाचे शहर म्हणून मुंबई ओळखले जाते. याच मुंबईने स्वातंत्र्य पूर्व काळात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आणि इथूनच "भारत छोडो आंदोलन" ( Bharat Chhodo Andolan in Mumbai ) सुरू झाले. मुंबईमधील बाळ गंगाधर टिळक आणि नंतर महात्मा गांधी यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबईतील ( mumbais contribution in freedom movement ) नेत्यांनी काँग्रेस चळवळीचे नेतृत्व केले.

काँग्रेसची स्थापना - भारतावर दीडशे वर्षे इंग्रजांचे राज्य होते. इंग्रजांच्या जुलमी राजवटी विरोधात १७५७ ते १८५७ या शतकात ३०० पेक्षा अधिक छोटे, मोठे उठाव या देशात करण्यात आले. या लढ्यात मुंबईची भूमिका महत्त्वाची होती. बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन, १८८५ साली स्थापन करण्यात आली होती. भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसचे मूळ नाव, भारतीय राष्ट्रीय संघटना असे होते; मात्र या संघटनेच्या मुंबईत १८८५ साली झालेल्या अधिवेशात, तिचे नाव, इंडियन नेशनल कॉंंग्रेस असे करण्यात आले. मुंबईतील तेजपाल सभागृहात हे अधिवेशन झाले होते. यात एकूण ७२ जण सहभागी झाले होते. त्यातले १८ जण मुंबईतील होते. मुंबई भारताच्या स्वातंत्र्यलढ्याचा केंद्रबिंदू होते आणि दक्षिण मुंबईत ब्रिटिशांच्या धोरणांविरोधात अनेक आंदोलने त्यावेळी करण्यात आली होती. स्वदेशी चळवळीत मुंबईच्या (पूर्वाश्रमीची बॉम्बे) उद्योगपतींनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आणि इथूनच भारत छोडो आंदोलनाला सुरुवात झाली.


'भारत छोडो आंदोलन' - दुसऱ्या महायुद्धासाठी ब्रिटिशांनी भारताचा पाठिंबा मागितला होता. ज्याच्या बदल्यात भारताला स्वातंत्र्य देण्याचे वचन इंग्रजांनी दिले होते. भारताचा पाठिंबा घेऊनही इंग्रज भारताला स्वातंत्र्य द्यायला तयार नव्हते. तेव्हा महात्मा गांधींनी ब्रिटिश राजवट उलथून टाकण्यासाठी चळवळ सुरू ( Movement to end British rule ) केले. एकूण 79 वर्षांपूर्वी म्हणजेच 9 ऑगस्ट 1942 रोजी ही चळवळ सुरू झाली. मुंबईतील मैदानात गांधीजींनी चळवळीची घोषणा दिली. ही चळवळ जिथून सुरू झाली ते उद्यान मुंबईमधील ग्रांटरोड येथे आहे. हे मैदान ऑगस्ट क्रांती मैदान ( August Kranti Maidan ) म्हणून ओळखले जाते. या लढ्यात 'करो या मरो'चा नारा देत बापूंनी ( Karo Ya Maro ) संपूर्ण भारतातील तरुणांना इंग्रजांना देशातून हाकलण्यासाठी बोलावले होते. म्हणूनच या आंदोलनाला 'भारत छोडो आंदोलन' किंवा भारत छोडो आंदोलन म्हणतात. महात्मा गांधींच्या या आंदोलनामुळे ब्रिटिश सरकारमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते. 4 जुलै 1942 रोजी, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने एक ठराव संमत केला की जर इंग्रजांनी आता भारत सोडला नाही, तर त्यांच्या विरोधात देशभरात "सविनय कायदेभंगाची ( Civil Disobedience ) चळवळ" सुरू केली जाईल.


महिलांचाही सहभाग - भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात मुंबईतील अनेक शूर महिलांनी भाग घेतला होता. आंदोलनात सहभागी झाल्याबद्दल त्यांना सश्रम करावासाची शिक्षा देखील भोगावी लागली होती. मुंबईतल्या पारसी महिला, मादाम कामा यांनी एकटीने जर्मनीत भारताचा पहिला राष्ट्रध्वज फडकवत संपूर्ण देशाला राष्ट्रध्वज फडकावण्याची प्रेरणा दिली होती. दादाभाई नौरोजी यांची नात पेरिन कॅप्टन आणि त्यांच्या दोन भगिनींनी मुंबईत दारोदारी जाऊन खादीचा प्रचार आणि विक्री केली होती आणि ब्रिटिश राजवटीला आव्हान दिले होते. स्वातंत्र्यलढ्याच्या शेवटच्या टप्प्यात, सर्व प्रमुख नेत्यांना अटक झाल्यावर आंदोलनाचे नेतृत्व करण्यास कोणीही उरले नव्हते. अशा वेळी मुंबईतल्या विद्यार्थिनी आणि महिलांनी ही चळवळ जिवंत ठेवली. “मुंबईतल्या विद्यार्थिनी आणि महिलांनी स्वतः पुढाकार घेऊन स्वातंत्र्यलढ्याला बळ देणारे अनेक उपक्रम राबवले. इंदिरा गांधी यांची वानर सेना स्थापन होण्याच्याही आधी, उषाबेन मेहता यांनी मुंबईत मांजर सेना सुरू केली होती. या सेनेकडे ब्रिटिश पोलिस आणि सैन्याला त्रास देण्याची, त्यांना हैराण करण्याची जबाबदारी देण्यात आली होती.

हेही वाचा- Cabinet Expansion: मंत्रिमंडळ विस्ताराचे अद्याप विरोधी पक्षाला निमंत्रण नाही -अजित पवार

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.