ETV Bharat / city

MSRTC Strike : ठाकरे सरकारकडून एसटी कर्मचाऱ्यांविरुद्ध मेस्मा लावण्याच्या हालचाली, अनिल परब म्हणतात..

author img

By

Published : Dec 17, 2021, 3:52 PM IST

एसटी कर्मचाऱ्यांचा तिढा अजूनही सुरूच आहे. कर्मचाऱ्यांना मेस्मा लावण्याचा इशाराही यापूर्वीच दिला आहे. त्यामुळे आज संपकरी कर्मचाऱ्यांना मेस्मा (Mesma Against ST Workers ) लागणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागले आहे. परिवहन मंत्री अनिल परब यांनीही (Anil parab on msrtc strike ) मेस्मा लावला जाऊ शकतो व त्यासंदर्भात आजच्या बैठकीत हा निर्णय होईल, असं स्पष्ट केले आहे.

msrtc strike
msrtc strike

मुंबई - विलीनीकरणाच्या मागणीवर ठाम राहिलेल्या एसटी कर्मचाऱ्यांवर आता कठोर कारवाईच्या हालचाली राज्य शासनाने सुरु केल्या आहेत. राज्य परिवहन महामंडळाने आज यासंदर्भात बैठक बोलावली आहे. दरम्यान, संपावर ठाम असलेल्या कर्मचाऱ्यांवर मेस्मा (Mesma Against ST Workers ) लावण्याबाबत निर्णय होईल, अशी माहिती परिवहन मंत्री अनिल परब (Anil parab on msrtc strike ) यांनी प्रसारमाध्यमांना दिली आहे.

आजच्या बैठकीत 'मेस्मा'बाबत निर्णय -

एसटी कर्मचारी संपाचा तिढा कायम आहे. कामगारांसाठी सर्वाधिक पगारवाढ दिली आहे. पगार वेळेत देण्याची हमी घेतली आहे. तरीही कामगार संपावर ठाम आहेत. संप मोडीत काढण्यासाठी निलंबिनाची कारवाई सुरु केली. बडतर्फ करण्यात येत आहेत. परंतु, कर्मचारी संपातून काढता पाय घेत नाहीत. ग्रामीण भागातील लोकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. संपकरी सध्या भरकटलेले आहेत. दिशाहीन झाले आहेत. त्यांना वाटत आहे, की ताबडतोब आपला निकाल लागेल. पण कोर्टाने त्रिसदस्यीय समिती नेमली आहे. त्यामुळे सरकार निर्णय घेऊ शकत नाही. २० तारखेला विलीनीकरण करून घेऊ असे त्यांचे वकील कर्मचाऱ्यांना सांगत आहे. त्यामुळे हे कर्मचारी २० तारखेपर्यंत कामावर येणार नाहीत, असे कळत आहे. मात्र, प्रवाशांचे हाल होत असल्याने अत्यावश्यक सेवा म्हणून मेस्मा (Mesma Against ST Workers ) लावण्याची कारवाई करावी लागणार आहे. आज परिवहन मंडळाची बैठक होत आहे. या बाबतीत मेस्मा कसा लावायचा किंवा आणखी काय करायचे त्याबाबत निर्णय घेऊ. चर्चेअंती सर्व ठरवलं जाईल, असे परिवहन मंत्री परब (Anil parab on msrtc strike) यांनी सांगितले.

काय म्हणतात अनिल परब -

- संपाचा तिढा कायम आहे. सरकारने शक्यतेपेक्षा जास्त पगारवाढ दिलीय. काही कामगार हे भरकटलेले व दिशाहीन झाले आहेत. कामगारांमध्ये अफवांचे पीक आलंय.
- मेस्मा लावला जावू शकतो. आजच्या बैठकीत हा निर्णय होईल.
- मेस्मा कुणावर लावला जाईल व कसा लावायचा याचा निर्णय घेतला जाईल.
- जैतापूरबाबत आम्ही घेतलेली भूमिका कायम राहिल.

शिवसेनेची भूमिका कायम

जैतापूर प्रकल्पाबाबत शिवसेनेची भूमिका कायम आहे. तीच भूमिका कायम राहिल, असे अनिल परब म्हणाले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.