ETV Bharat / city

Sanjay Raut criticize bjp महाराष्ट्राचे वातावरण कोण बिघडवते? हे सर्वांना माहीत - शिवसेना खासदार संजय राऊत

author img

By

Published : Nov 23, 2021, 4:44 PM IST

अमरावतीमध्ये झालेली हिंसा ते एसटी संपापर्यंत महाराष्ट्रात आग लावण्याचे प्रयत्न सुरू आहे. हे आग लावण्याचे प्रयत्न कोण करत आहे? हे संपूर्ण महाराष्ट्राला माहीत आहे, असा खोचक टोला शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut criticize bjp) यांनी नाव न घेता भाजपला लावला.

Sanjay Raut criticize bjp
शिवसेना खासदार संजय राऊत

मुंबई - अमरावतीमध्ये झालेली हिंसा ते एसटी संपापर्यंत महाराष्ट्रात आग लावण्याचे प्रयत्न सुरू आहे. हे आग लावण्याचे प्रयत्न कोण करत आहे? हे संपूर्ण महाराष्ट्राला माहीत आहे. महाराष्ट्राचे वातावरण बिघडविण्याचा प्रयत्न केला जात आहे. हे वातावरण कोण बिघडवण्याचा प्रयत्न करत आहे? हे सर्वांना माहीत आहे, असा खोचक टोला शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut criticize bjp) यांनी नाव न घेता भाजपला लावला.

हेही वाचा - अग्निशामक दलाला पालिका रुग्णालयावर नाही भरोसा, खासगीला कंत्राट

संजय राऊत यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sanjay Raut meets Sharad Pawar) यांची यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे भेट घेतली. यावेळी खासदार सुप्रिया सुळे या देखील उपस्थित होत्या. या भेटीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी हे वक्तव्य केले. तसेच, महाराष्ट्राच्या इतर महत्त्वाच्या मुद्द्यांवरही शरद पवार यांच्यासोबत चर्चा झाल्याची माहिती संजय राऊत यांनी यावेळी प्रसारमाध्यमांना दिली.

चंद्रकांत पाटलांनी झोपेतून जागे व्हावे

राज्यात सत्तापरिवर्तन होण्याच्या चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्याची संजय राऊत यांनी पुन्हा एकदा खिल्ली उडवत, आतातरी चंद्रकांत पाटील यांनी झोपेतून जागे व्हावे. पहाटेच्या शपथविधीला आता दोन वर्षे पूर्ण झाली आहेत. मात्र, अद्यापही चंद्रकांत पाटलांना त्याचे धक्के बसत असल्याचा टोला संजय राऊत यांनी चंद्रकांत पाटलांना (Chandrakant Patil) लगावला.

बैठकीत एसटी संपाबाबत चर्चा

शरद पवार यांनी संपाबाबत (st workers strike) तोडगा काढण्यासाठी राज्याचे अर्थमंत्री अजित पवार, परिवहन मंत्री अनिल परब (Minister Anil Parab) यांच्याबरोबर प्रदीर्घ चर्चा केली. ही चर्चा केल्यानंतर शरद पवार यांनी राज्य सरकारला एसटी संपावर तोडगा काढण्यासाठी काही सूचनाही केल्या आहेत. सरकार एसटी संपाबाबत तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करत आहे. मात्र, काही लोक आगीत तेल ओतण्याचे प्रयत्न करत असल्याचे यावेळी संजय राऊत म्हणाले.

महाराष्ट्र हे सुरक्षित राज्य

महाराष्ट्र हे सुरक्षित राज्य आहे. या राज्यात कोणाच्याही सुरक्षेला धोका नाही. मात्र, मुंबई पोलीस आयुक्त पदावर राहिलेल्या परमबीर सिंग यांना राज्यात आता असुरक्षित वाटत असेल तर, हे हास्यास्पद असल्याचे यावेळी संजय राऊत म्हणाले.

मुख्यमंत्र्यांची तब्येत झपाट्याने सुधारत आहे

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर झालेल्या शस्त्रक्रियेनंतर त्यांची तब्येत झपाट्याने सुधारत आहे. लवकरच ते आपल्या कामावर रुजू होतील. मात्र, शस्त्रक्रिया झाल्यानंतर देण्यात आलेल्या वैद्यकीय सल्यामुळे मुख्यमंत्र्यांना काही गोष्टी पार पाडाव्या लागत असल्याची माहिती संजय राऊत यांनी यावेळी दिली.

हेही वाचा - ST Worker Strike : संपावर निघणार तोडगा? राज्य सरकारकडून एसटी कर्मचाऱ्यांना चर्चेसाठी निमंत्रण

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.