ETV Bharat / city

मॉनिटर स्टिकरमुळे लस राहते सुरक्षित, मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागाची माहिती

author img

By

Published : Aug 3, 2021, 6:43 PM IST

Updated : Aug 3, 2021, 7:56 PM IST

मॉनिटर स्टिकरमुळे लस राहते सुरक्षित, मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागाची माहिती
मॉनिटर स्टिकरमुळे लस राहते सुरक्षित, मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागाची माहिती

कोणत्याही लसीकारणाआधी लसीला एका विशिष्ट अशा तापमानात लस सुरक्षित ठेवली जाते. विशिष्ट अशा तापमानापेक्षा अधिक तापमान झाल्यास, लस निरुपयोगी होते. यासाठी लस बनवणाऱ्या कंपन्या आपल्या लसीवर तापमान तपासण्यासाठी मॉनिटर स्टिकर लावतात. सध्या कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी जी लस वापरली जात आहे. त्यावर असे, मॉनिटर स्टिकर नाहीत. त्यामुळे या लसी चार तासात वापरल्या जात आहेत, अशी माहिती मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली.

मुंबई - विविध साथीच्या आजारावर उपाय म्हणून लसीकरण केले जाते. लसीकारणाआधी लसीला एका विशिष्ट अशा तापमानात सुरक्षित ठेवले जाते. विशिष्ट अशा तापमानापेक्षा अधिक तापमान झाल्यास, लस निरुपयोगी होते. यासाठी लस बनवणाऱ्या कंपन्या आपल्या लसीवर तापमान तपासण्यासाठी मॉनिटर स्टिकर लावतात. सध्या कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी जी लस वापरली जात आहे. त्यावर असे, मॉनिटर स्टिकर नाहीत. त्यामुळे या लसी चार तासात वापरल्या जात आहेत, अशी माहिती मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली.

अशी राहते लस सुरक्षित -

लसीकरण कारण्यापूर्वी लसीच्या व्हायल म्हणजेच बॉटल २ ते ८ डिग्री सेल्सियस तापमानात आईस-लाईन रेफ्रिजरेटरमध्ये ठेवल्या जातात. एखाद्या ठिकाणी लसीकरण कॅम्पवर जाताना वॅक्सीन कॅरियर वापरले जाते. त्यात ४ आईस बॅग ठेवल्या जातात. या आईस बॅग वजा १५ ते २५ डिग्रीपर्यंत डिफ्रीज केलेल्या असतात. लसीकरण कॅम्पला जाताना आईस बॅग कंडिशनिंग करून घेतल्या जातात. लसीकरण कॅम्पला जाताना, तीन प्रकारच्या कॅरियर सोबत घेतल्या जातात. एकामध्ये उघडण्यात आलेल्या बॉटल असतात. दुसऱ्यामध्ये लागू शकतात अशा बॉटल असतात, तर तिसऱ्या कॅरियरमध्ये लसीचा साठा करून नेला जातो. यामुळे लसीचा योग्य वापर करता येतो, असे आरोग्य विभागाने सांगितले.

आईस बॅग अशा केल्या जातात कंडिशनिंग -

एका वॅक्सीन कॅरियरमध्ये चार आईस बॅग असतात. या आईस बॅग वजा १५ ते २५ डिग्रीमध्ये ठेवून डिफ्रीज केल्या जातात. लसीकरण कॅम्पला जाताना या बॅग कंडिशनिंग केल्या जातात. कंडिशनिंग करताना या आईस बॅग फ्रिजरमधून काढून पाण्याचे थेंब तयार होतात आणि बर्फ वितळण्याचा आवाज होतो. तेव्हा ती बॅग वापरण्यास तयार झाली आहे, असे समजले जाते. त्या बॅगवरील पाणी कपड्याने पुसून वॅक्सीन कॅरियरमध्ये ठेवली जाते. आईस बॅगमुळे ६ ते ८ तास लस सुरक्षित राहते. वातावरण योग्य असल्यास १२ तासांपर्यंत लस सुरक्षित राहू शकते, अशी माहिती आरोग्य विभागाने दिली.

तापमान तपासण्यासाठी मॉनिटर स्टिकर -

देशभरात लहान मुलांना पुढील आयुष्यात कोणत्याही प्रकारचे आजार होऊ नयेत म्हणून, लसी दिल्या जातात. कित्तेक वर्ष शोध लावून या लसी बनवण्यात आल्या आहेत. यामुळे पोलिओसह अनेक लसीच्या बॉटलवर एक मॉनिटर स्टिकर लावला जातो. गोल स्टिकरच्या मध्यभागी एक सफेद चौकोन असतो. लसीला जितक्या तापमानात ठेवणे गरजेचे आहे, त्यापेक्षा जास्त तापमान झाल्यास मॉनिटर स्टिकरवरील चौकोनातील रंग गडद होतो. गोलामध्ये असलेल्या रंगापेक्षा चौकोनातील रंग अधिक गडद झाल्यास ती लसची बॉटल खराब झाली, असे समजले जाते. ती बॉटल बायो वेस्टमध्ये टाकली जाते. अशा बॉटलमधील लस लसीकरण करण्यासाठी वापरण्यात येत नाही.

Last Updated :Aug 3, 2021, 7:56 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.