ETV Bharat / city

Minister Jitendra Awhad : राज ठाकरेंना अमेरिकेची सुरक्षा मिळू द्या, आमचा आक्षेप नाही - जितेंद्र आव्हाड

author img

By

Published : Apr 18, 2022, 8:48 PM IST

Updated : Apr 18, 2022, 8:58 PM IST

जितेंद्र आव्हाड
जितेंद्र आव्हाड

राज ठाकरे ( Raj Thackeray Security Issue ) यांना अमेरिकेची सीएसआयकडून सुरक्षा मिळू द्या, किंवा मोसादकडून सुरक्षा देण्यात आली तरी त्यांच्याशी आमचा संबंध नाही. मनसेचे नेते बाळा नांदगावकर ( MNS leader Bala Nandgaonkar ) हे दिलीप वळसे पाटील ( Home Minister Dilip Walse Patil ) यांचे चांगले मित्र आहेत. त्यांनी सुरक्षेबाबत त्यांच्याशी बोलावे. सुरक्षा द्यायची असल्यास गृहमंत्री याबाबत निर्णय घेतील. सर्वांना सुरक्षा पोहचणे ही जबाबदारी आहे, असे मंत्री जितेंद्र आव्हाड ( Minister Jitendra Awhad ) म्हणाले आहेत.

मुंबई - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना सोशल मीडियातून धमक्या येत आहेत. म्हणून केंद्र सरकारची सुरक्षा त्यांना दिली जाणार असल्याची माहिती सध्या समोर येत आहे. मात्र राज ठाकरे ( Raj Thackeray Security Issue ) यांना अमेरिकेची सीएसआयकडून सुरक्षा मिळू द्या, किंवा मोसादकडून सुरक्षा देण्यात आली तरी त्यांच्याशी आमचा संबंध नाही. मनसेचे नेते बाळा नांदगावकर ( MNS leader Bala Nandgaonkar ) हे दिलीप वळसे पाटील ( Home Minister Dilip Walse Patil ) यांचे चांगले मित्र आहेत. त्यांनी सुरक्षेबाबत त्यांच्याशी बोलावे. सुरक्षा द्यायची असल्यास गृहमंत्री याबाबत निर्णय घेतील. सर्वांना सुरक्षा पोहचणे ही जबाबदारी आहे, असे मंत्री जितेंद्र आव्हाड ( Minister Jitendra Awhad ) म्हणाले आहेत. तसेच देव दर्शनाला जाताना कोणालाही सांगायचे नसते, मी ही खंडोबाचे दर्शन करायला नेहमी जातो. त्याचा गाजावाजा करत नाही, असा टोला आयोध्या दौऱ्यावरून राज ठाकरे यांना मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी लगावला आहे.

पत्रकार परिषदेत बोलताना मंत्री जितेंद्र आव्हाड



'देशात म्यानमार, अफगाणिस्थान सारखी परिस्थिती निर्माण होऊ शकते' : पाश्चिमात्य देश प्रगत आहेत. या देशात अनेक वर्षांपासून भारतीय राहतात. तिथे कधी ही धर्म आडवा येत नाही. मोठी मोठी मंदिर या देशात आहेत. मात्र हिंसा होत नाही. हिंसेचा कधीही समर्थन केले जाऊ शकत नाही. हिंसा ही समाजाच्या विरोधातच असते. मात्र आपल्या देशात अशीच परिस्थिती राहिल्यास देशात म्यानमार आणि अफगाणिस्तान सारखी परिस्थिती निर्माण होऊ शकते, अशी भीती जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केली.

नया दिन आता है, नया सुरज जाता है : शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्यावर जितेंद्र आव्हाड यांनी केलेल्या टीकेनंतर भारतीय जनता पक्षाचे आमदार नितेश राणे यांनी आव्हाड यांच्यावर टीका केली. मात्र नितेश राणे हे काँग्रेसमध्ये असताना आपण घेतलेली भूमिका नितेश स्वतः घ्यायचे. मात्र आता "नया दिन आता है, नया सुरज आता है" असे म्हणत भाजपात गेलेल्या नितेश राणेंना आव्हाडांनी टोला लगावला आहे.

'महागाईचा दर १४ वर पोचला' : मागच्या मार्चमध्ये महागाईचा दर ७.२ होता आता महागाईचा दर १४ वर पोचला आहे. याचा अर्थ महागाई कधी नव्हे एवढी ७० वर्षात शिगेला पोचली आहे. पेट्रोल-डिझेल आणि गॅसचे भाव कुठे पोचले आहेत. हे एखाद्या गृहिणीला विचारा. एकंदरीतच महागाई सर्वसामान्यांना भाजून काढत आहे. उन्हाचा चटका कमी तर महागाईचा चटका जास्त बसत आहे, अशी खंत जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केली.

75 आजी- माजी आमदारांची मागणी : गोरेगावमध्ये परवडणाऱ्या घरांसाठी 75 आजी-माजी आमदारांनी मागणी केली असल्याची माहिती राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी दिली आहे. राज्य सरकार आमदारांसाठी परवडणारी घरे बनवण्याचा निर्णय घेतल्यानंतर त्यावर सर्व स्तरातून टीका होत होती. महाविकास आघाडी सरकारकडून आमदारांसाठी मुंबई येथील गोरेगाव परिसरात 300 परवडणारे घरांचा प्रकल्प बांधण्याचा निर्णय राज्य सरकारने केला. याची घोषणा नुकतीच अर्थसंकल्पी अधिवेशनात गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केली होती. मात्र राज्य सरकारच्या या निर्णयावर विरोधी पक्षाच्या नेत्यांकडून आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून होणारी टीका पाहता हा निर्णय मागे घेण्यासंदर्भात राज्य सरकार विचार करत होते. राज्य सरकार अस्थिर होण्याची भीती असल्यामुळेच आमदारांना घर दिली जाणार असल्याची टीका भाजपाकडून करण्यात आली होती. तसेच आमदारांना फुकट घरे दिली जाणार असल्याची चर्चा सोशल मीडियावर होत होती. मात्र राज्य सरकारकडून उपलब्ध करून दिली जाणारी घरे ही फुकट नसून, यासाठी आमदारांना 75 लाख ते एक कोटी रुपयापर्यंत रक्कम मोजावी लागणार असल्याचे जितेंद्र आव्हाड यांनी त्यावेळी स्पष्ट केले होते. तसेच लवकरच सर्वसामान्यांसाठी म्हाडाकडून घर उपलब्ध केली जाणार आहेत. याबाबत पुढील आठवड्यात घोषणा होण्याची शक्यता देखील जितेंद्र आव्हाड यांनी वर्तवली आहे.

हेही वाचा - Raj Thackeray Threat Call : राज ठाकरेंना धमकीचे फोन, Z+ सुरक्षा देण्याची मनसेची मागणी

Last Updated :Apr 18, 2022, 8:58 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.