ETV Bharat / city

Jagmitra Sugar Factory issue : मृत पावलेल्या व्यक्तीकडून धनंजय मुंडेंची जमीन खरेदी - किरीट सोमैय्यांचा आरोप

author img

By

Published : Dec 10, 2021, 5:42 PM IST

Updated : Dec 10, 2021, 5:58 PM IST

जगमित्र साखर कारखान्याची जमीन हे देवस्थानची जमीन ( Jagmitra sugar factory land controversy ) आहे. त्या जमिनीचे चार मालक होते. परंतु १९८८ मध्ये यापैकी ज्ञानोबा कोळी यांचा मृत्यू झाला आहे. सप्टेंबर २०१० मध्ये ही जमीन धनंजय मुंडे ( Dhananjay Munde ) यांनी ज्ञानोबा कोळी यांच्याकडून विकत घेतली. या करारनाम्यात ज्ञानोबा कोळी यांची स्वाक्षरी त्या पत्रात आहे. त्यासाठी २२ वर्षांपूर्वी मृत पावलेल्या व्यक्तीकडून जमीन कशी घेता येते, असा प्रश्न किरीट सोमैय्या यांनी ( corruption allegations on Dhananjay Munde ) उपस्थित केला आहे.

किरीट सोमैय्या
किरीट सोमैय्या

मुंबई - राज्याचे समाजकल्याण मंत्री धनंजय मुंडे ( Kirit Somaiyas corruption allegations on Dhananjay Munde ) हे भाजप नेते किरीट सोमैय्या यांच्या रडारवर आले आहेत. भाजप नेते सोमैय्या यांनी मंत्री मुंडे यांच्यावर जमिनीच्या घोटाळ्यांचे आरोप केले आहेत. परिवहन मंत्री अनिल परब यांच्यासह समाजकल्याण मंत्री धनंजय मुंडे या दोन्ही मंत्र्यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्याची मागणी सोमैय्या यांनी ( Kirit Somaiyas allegations on Anil Parab ) पत्रकार परिषदेतून केली आहे.


पर्यावरण नियमांचे उल्लंघन करून बांधला दापोली रिसॉर्ट

परिवहन मंत्री, शिवसेना नेते अनिल परब यांचा रत्नागिरीतील दापोली रिसॉर्ट ( Anil Parabs resort in Dapoli ) हा अनधिकृत आहे. पर्यावरण नियमांचे उल्लंघन करून रिसॉर्ट बांधण्यात आला आहे, असा आरोप भाजप नेते किरीट सोमैय्या यांनी केला आहे. सीआरझेडचे उल्लंघन करून हा ( CRZ rules violation by Anil Parab ) रिसॉर्ट अनधिकृतपणे बांधला आहे. तसे पुरावे देऊन त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी मागील काही महिन्यापासून किरीट सोमैय्या सातत्याने प्रयत्न करत होते. महसूल, पर्यावरण व जिल्हाधिकारी यांच्या विभागाकडून अनिल परब यांना क्लीनचिट देण्यात आली आहे. अनिल परब यांना एका प्रकरणात क्लीन चिट दिली आहे. तरीसुद्धा अजूनही ४ प्रकरणे शिल्लक आहेत, असे सांगत परब यांच्या विरोधात फौजदारी गुन्हा दाखल करावा, अशी मागणी सोमैय्या यांनी केली आहे.

धनंजय मुंडे यांच्यावर कारवाई होणार असल्याचा दावा

हेही वाचा-Lady Police Commit Suicide : 𝟐𝟖 वर्षीय महिला पोलीस कर्मचाऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या



मृत पावलेल्या व्यक्तीकडून धनंजय मुंडेंची जमीन खरेदी - सोमैय्यांचा आरोप

राज्याचे समाज कल्याण मंत्री धनंजय मुंडे यांचा जगमित्र साखर कारखाना चौकशीच्या फेऱ्यामध्ये ( Jagmitra sugar factory land controversy ) अडकला आहे. हा कारखाना बांधताना या कारखान्याची जमीन चुकीच्या मार्गाने हस्तगत केल्याचा आरोप माजी खासदार सोमैय्या यांनी धनंजय मुंडे यांच्यावर केला आहे. या प्रकरणी १४ जून २०१९ ला बीड जिल्ह्यात एफआयआरही दाखल झाला होता. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने या संदर्भामध्ये स्थगिती दिली. त्याकारणाने हे प्रकरण दाबले गेले होते. परंतु सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी स्थगिती उठविली. त्यामुळे धनंजय मुंडे यांच्यावर कारवाई होणार असल्याचा दावा किरीट सोमैय्या यांनी केला. जगमित्र साखर कारखान्याची जमीन हे देवस्थानची जमीन आहे. त्या जमिनीचे चार मालक होते. परंतु १९८८ मध्ये यापैकी ज्ञानोबा कोळी यांचा मृत्यू झाला आहे. सप्टेंबर २०१० मध्ये ही जमीन धनंजय मुंडे यांनी ज्ञानोबा कोळी यांच्याकडून विकत घेतली. या करारनाम्यात ज्ञानोबा कोळी यांची स्वाक्षरी त्या पत्रात आहे. त्यासाठी २२ वर्षांपूर्वी मृत पावलेल्या व्यक्तीकडून जमीन कशी घेता येते, असा प्रश्न किरीट सोमैय्या यांनी उपस्थित केला आहे.

हेही वाचा-BJP Jan Akrosh Agitation : नाशकातील विविध मुद्यांवरुन भाजपाचे महाविकास आघाडी सरकार विरोधात 'जन आक्रोश मोर्चा'

महाविकास आघाडी निष्पक्ष चौकशी करणार नाही-

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे या दोन्ही प्रकरणाची निष्पक्ष चौकशी होऊ देणार नाही, असा दावा किरीट सोमैय्या यांनी व्यक्त केली आहे. पोलिसांचा, सरकारचा वापर करून ते हे प्रकरण दाबून टाकतील, असेही ( BJP leader Somaiya on ministers probe ) त्यांनी म्हटले आहे. जोपर्यंत या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी होत नाही, तोपर्यंत मंत्री अनिल परब व मंत्री धनंजय मुंडे यांना मंत्रिमंडळातून काढून टाकावे, अशी मागणी किरीट सोमैय्या यांनी केली आहे.

हेही वाचा-Anil Parab Appeal ST Workers : एसटी कर्मचाऱ्यांना शेवटची संधी, सोमवारपर्यंत कामावर हजर व्हा - अनिल परब

दिवाळीनंतर फटाके फोडणार असल्याचा दिला होता इशारा-

महाविकास आघाडीमधील ३ मंत्र्यांचे व त्यांच्या ३ जावयांचे अशा एकूण ६ नेत्यांचे घोटाळे बाहेर काढून दिवाळीनंतर फटाके फोडणार असल्याचे सोमैया यांनी ट्विटद्वारे सांगितले होते. या पूर्वी शिवसेनेचे मंत्री अनिल परब, खासदार भावना गवळी, आमदार रवींद्र वायकर, माजी खासदार आनंदराव अडसूळ, सचिव मिलिंद नार्वेकर, तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री हसन मुश्रीफ, माजी गृहमंत्री अनिल देशमुख, मंत्री छगन भुजबळ यांची भ्रष्टाचाराची प्रकरणे सोमैया यांनी उजेडात आणली. त्यांच्या मागे राष्ट्रीय तपास यंत्रणांचा ससेमिरा लावला आहे. परंतु सोमैया यांनी अजून ६ नेत्यांचे घोटाळे बाहेर काढणार असल्याचे सांगून याप्रकरणी ही लढाई चालू राहणार असल्याचे स्पष्ट संकेत दिले होते.

Last Updated :Dec 10, 2021, 5:58 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.