ETV Bharat / city

ShivSena Meeting at Matoshri: शिवसेनेच्या ज्येष्ठ नेत्यांची मातोश्रीवर बैठक, पुढील रणनिती ठरवणार

author img

By

Published : Jun 23, 2022, 9:40 AM IST

Updated : Jun 23, 2022, 10:32 AM IST

शिवसेनेला पडलेल्या खिंडारामुळे महाविकास आघाडी सरकार अस्थिर ( Mahavikas Aghadi gov ) झाले आहे. एकनाथ शिंदे आणि निर्माण केलेल्या आव्हानाला सामोरे जाण्याची संपूर्ण तयारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ( CM Uddhav Thackeray ) केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेसने शिवसेनेच्या पाठीशी ठाम उभे राहण्याचा निर्णय घेतला आहे. तर दुसरीकडे शिवसेनेचे एक एक करून आमदार, खासदार शिंदे गटाला मिळत असल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे संख्याबळ कमी झाले आहे.

उद्धव ठाकरे
उद्धव ठाकरे

मुंबई - शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे ( Eknath Shinde live update ) यांच्या बंडखोरीने शिवसेनेत उभी फूट पडली आहे. शिवसेना आणि एकनाथ शिंदे गटाकडून एकमेकांना उघड आव्हान देत, संघर्षाची भूमिका घेतली ( Shivsena meeting at Matoshri ) आहे. शिंदे यांच्या बंडखोरी विरोधात रणनीती ठरवण्याबाबत आज मातोश्रीवर शिवसेनेच्या ज्येष्ठ नेत्यांची सकाळी साडेअकरा वाजता बैठक होत आहे. शिवसेनेची पुढील वाटचाल कशी असेल, यावर बैठकीत निर्णय घेतला जाणार आहे.


शिवसेनेला पडलेल्या खिंडारामुळे महाविकास आघाडी सरकार अस्थिर ( Mahavikas Aghadi gov ) झाले आहे. एकनाथ शिंदे आणि निर्माण केलेल्या आव्हानाला सामोरे जाण्याची संपूर्ण तयारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ( CM Uddhav Thackeray ) केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेसने शिवसेनेच्या पाठीशी ठाम उभे राहण्याचा निर्णय घेतला आहे. तर दुसरीकडे शिवसेनेचे एक एक करून आमदार, खासदार शिंदे गटाला मिळत असल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे संख्याबळ कमी झाले आहे. राजकीय पेच निर्माण झाल्याने शिवसेनेची पुढील रणनीती कशी असावी, या संदर्भात शिवसेनेच्या ज्येष्ठ नेत्यांची बैठक बोलावण्यात आली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह आदित्य ठाकरे, शिवसेनेचे ज्येष्ठ नेते दिवाकर रावते, सुभाष देसाई, लीलाधर डाके, खासदार संजय राऊत, अनिल देसाई, शिंदे गटाला न मिळालेले आमदार, शिवसेना - युवासेनेचे पदाधिकारी आदी उपस्थित राहणार आहेत. या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

एकनाथ शिंदे ऐकायच्या मनस्थितीत नाहीत- एकनाथ शिंदे यांची बंडखोरी आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना थेट आव्हान दिल्याने महाराष्ट्रात शिवसेनेच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला. उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, शिंदे ऐकायच्या मनस्थितीत नाहीत. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ज्येष्ठ नेत्यांसोबत सल्लामसलत करणार आहेत. या बैठकीत शिवसेना पुढे नेण्यासाठी उद्धव ठाकरे काय भूमिका घेतात हे पाहावे लागणार आहे.

हेही वाचा-Sharad Pawar meeting with NCP leaders : शिवसेनेतील बंडखोरीने सरकार अस्थिर, राष्ट्रवादी काँग्रेसची आज महत्वाची बैठक

हेही वाचा-Maharashtra Political Crisis : एकनाथ शिंदेंना बळ; शिवसेनेचे आणखी सात आमदार नॉटरिचेबल झाल्याने सरकार कोसळण्याची शक्यता

हेही वाचा-एकनाथ शिंदे यांना दोन तृतीयांश आमदार फोडण्यात यश?

Last Updated :Jun 23, 2022, 10:32 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.