ETV Bharat / city

महानगरपालिका आयुक्तांच्या मंजुरीविना महापौर शिक्षक पुरस्कार रखडले

author img

By

Published : Sep 4, 2022, 1:40 PM IST

mayors teacher award pending without approval of municipal commissioner in mumbai
महानगरपालिका आयुक्तांच्या मंजुरीविना महापौर शिक्षक पुरस्कार रखडले

महापौर पुरस्कारासाठी सात जुलै 2022 रोजी महानगरपालिकेने खास परिपत्रक जारी केले आहे. त्या परिपत्रकामध्ये सर्व प्रक्रिया नमूद केलेली आहे. त्यानुसार ज्यांनी महापौर शिक्षक पुरस्कार करिता मोबाईल लिंक द्वारे अर्ज केलेले आहेत. त्यांनी आपल्या शाळा प्रशासकीय अधिकारी तसेच उपशिक्षण अधिकारी यांच्याकडे सर्व कागदपत्रे जमा करण्याची सूचना नमूद आहे. ही प्रक्रिया अनेक अर्जदार शिक्षकांनी पूर्ण केलेली आहे. मात्र अद्याप आयुक्त महोदयांकडून फायलीवर आदेश मंजूर झाला नसल्यामुळे पुरस्काराबाबत आम्ही सगळे वाट पाहत आहोत, अशी प्रतिक्रिया शिक्षक सेनेचे नेते के पी नाईक यांनी ईटीव्ही भारत सोबत संवाद करताना दिली.

मुंबई आयुक्तांच्या मंजुरीविना बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या दरवर्षी दिले जाणारे महापौर शिक्षक पुरस्कार यावेळी रखडलेले आहेत.यामुळे मुंबई महानगरपालिकेमध्ये सर्व दहा हजार शिक्षकांमध्ये उत्कंठा आहे की पुरस्कार कधी दिले जातील. दोन वर्षे कोरोना महामारीमुळे पुरस्कार सोहळा फारसा उत्साहाने झालाच नाही. यंदा सर्व सणवार जल्लोषात साजरे होतायत. मात्र, बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्त इकबालसिंग चहल यांच्या मंजुरीविना महापौर शिक्षक पुरस्कार रखडले असल्याची चर्चा दबक्या आवाजात शिक्षण क्षेत्रात सुरू आहे.

महापौर शिक्षक पुरस्कारासाठी शिक्षकांची प्रतीक्षा बृहन्मुंबई महानगरपालिकेने महापौर पुरस्कार यासाठी 11 जुलै ते 16 जुलै या कालावधीत पुरस्कारासाठी संबंधित अधिकाऱ्यांकडे अर्ज जमा करण्याची सूचना महानगरपालिकेने केली होती. साधारणतः 110 च्या आसपास सर्व स्तरातील शिक्षकांनी अर्ज भरले असल्याची माहिती शिक्षक सभेचे नेते आबिद शेख यांनी दिली. त्यांनी ह्या बाबत महत्वाची निरीक्षणे नोंदवली की, शिक्षक मंडळी आपले अर्ज शाळा प्रशकीय अधिकारीकडे जमा केले. मात्र गणपती सुट्या आहेत. परंतु अद्याप मनपा आयुक्तांनी आदेश दिला असल्याने महापौर शिक्षक पुरस्कार सोहळा यंदा होणार की नाही याची प्रतीक्षा शिक्षक करीत आहेत.

शेकडो शिक्षकांचे अर्ज दाखल अद्याप आयुक्तांकडून पुरस्कारा संदर्भात आदेश आलेले नाही महापौर पुरस्कारासाठी सात जुलै 2022 रोजी महानगरपालिकेने खास परिपत्रक जारी केले आहे. त्या परिपत्रकामध्ये सर्व प्रक्रिया नमूद केलेली आहे. त्यानुसार ज्यांनी महापौर शिक्षक पुरस्कार करिता मोबाईल लिंक द्वारे अर्ज केलेले आहेत. त्यांनी आपल्या शाळा प्रशासकीय अधिकारी तसेच उपशिक्षण अधिकारी यांच्याकडे सर्व कागदपत्रे जमा करण्याची सूचना नमूद आहे. ही प्रक्रिया अनेक अर्जदार शिक्षकांनी पूर्ण केलेली आहे. मात्र अद्याप आयुक्त महोदयांकडून फायलीवर आदेश मंजूर झाला नसल्यामुळे पुरस्काराबाबत आम्ही सगळे वाट पाहत आहोत, अशी प्रतिक्रिया शिक्षक सेनेचे नेते के पी नाईक यांनी ईटीव्ही भारत सोबत संवाद करताना दिली.

यंदा शिक्षकांमध्ये उत्साह तर प्रशासनाकडून निरुत्साह दरवर्षी महापौर शिक्षक पुरस्कार या योजनेत 50 शिक्षकांना पुरस्कार दिला जातो. विविध विषय, विविध स्तर यातील शिक्षक यासाठी आपले अर्ज दाखल करतात. यंदा महापालिकेकडूनच फारसा उत्साह नसल्याचे एका शिक्षकाने नाव न सांगण्याच्या अटीवर आपली खंत ईटीव्ही भारत अशी बोलताना व्यक्त केलेली आहे. दसरा मेळाव्याच्या बाबतीत शिंदे गट आणि शिवसेना यांच्या वादाची पार्श्वभूमी देखील महापौर शिक्षक पुरस्कारापर्यंत गेले की काय अशी शंका देखील मुंबई शिक्षण क्षेत्रामधून व्यक्त केली जात आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.