ETV Bharat / city

बोगस लसीकरण करून रुग्णांच्या जीवाशी खेळणाऱ्या रुग्णालयांना चाप बसला पाहिजे - महापौर किशोरी पेडणेकर

author img

By

Published : Jul 3, 2021, 12:33 PM IST

किशोरी पेडणेकर
किशोरी पेडणेकर

कोरोना काळात लोकांना त्रास होतोय, हे माहीत आहे पण नाईलाजाने निर्बंध ठेवावे लागत आहेत, असे महापौर किशोरी पेडणेकर म्हणाल्या. मुंबईत लसीकरण वेग घेत आहे. मात्र, लसींचा पुरवठा योग्य प्रमाणात झाला तर लसीकरणाचा वेग अधिक वाढेल, असे त्यांनी म्हटलंय. खासगी लसीकरण केंद्रावर पालिकेचे लक्ष असून बोगस लसीकरण झाल्याने नागरिक पालिकेच्या लसीकरण केंद्रावर गर्दी करत आहेत, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

मुंबई - कांदिवली इथल्या हिरानंदानी हेरिटेज गृहसंकुलातल्या नागिरकांनी बोगस लसीकरणाबद्दलची तक्रार केली होती. या प्रकरणातनंतर मुंबईत विविध ठिकाणी सुरू असलेल्या बोगस लसीकरणाची प्रकरणे समोर आली आहेत. तपासात आरोपींनी २५ मे ते ६ जून दरम्यान १० शिबिरांचे आयोजन केले गेले होते. या दरम्यान २६०० लोकांना बोगस लस देण्यात आल्या होत्या. या प्रकरणी कारवाई करत मुंबई महानगर पालिकेने शिवम रुग्णालय सील केले आहे. या संपूर्ण प्रकरणावर मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. बोगस लसीकरण नागरिकांच्या जीवासाठी धोकादायक असून लोकांच्या जीवाशी खेळणाऱ्या रुग्णालयांना चाप बसला पाहिजे, असं त्यांनी म्हटलंय.

कोरोना काळात लोकांना त्रास होतोय, हे माहीत आहे पण नाईलाजाने निर्बंध ठेवावे लागत आहेत, असे महापौर किशोरी पेडणेकर म्हणाल्या. मुंबईत लसीकरण वेग घेत आहे. मात्र, लसींचा पुरवठा योग्य प्रमाणात झाला तर लसीकरणाचा वेग अधिक वाढेल, असे त्यांनी म्हटलंय. खासगी लसीकरण केंद्रावर पालिकेचे लक्ष असून बोगस लसीकरण झाल्याने नागरिक पालिकेच्या लसीकरण केंद्रावर गर्दी करत आहेत, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

ऑक्सिजन प्लांट -

दुसऱ्या लाटेत रुग्ण संख्या अधिक होती त्यामुळे ऑक्सिजन कमतरता भासली होती. मुंबईत 5 ठिकाणी हवेतून ऑक्सिजन निर्मिती प्लॅट तयार केले आहेत. वरळीतील नेहरू सायन्स सेंटर, बांद्रा भाभा, राजावाडी, कूपर आणि कस्तुरबा या पालिकेच्या पाच रुग्णालयांत ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प उभारण्यात आला आहे. ऑक्सिजन अभावी १६८ पालिका रुग्णालयातील दीडशे रूग्णांना दुसऱ्या रुग्णालयात हलवण्यात आल्याने मोठा अनर्थ टळला होता.
इतकेच नाही तर, दुसऱ्या लाटेदरम्यान एकही रुग्ण ऑक्सिजन अभावी दगावला नाही, ही असामान्य कामगिरी आहे. तरीही ऑक्सिजनबाबत आत्मनिर्भर होणे गरजेचे असल्याने ही नवीन पाच संयंत्रे सुरू करण्यात आली आहे. वातावरणातील हवा शोषून त्याद्वारे वैद्यकीय प्राणवायू निर्मिती करणाऱ्या तंत्रज्ञानाचा उपयोग करुन हे प्रकल्प उभारण्यात आले आहेत. या प्रकल्पातून दररोज एकूण ६.९३ मेट्रिक टन प्राणवायू उत्पादित होणार आहे, अशी माहिती त्यांनी दिली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.