ETV Bharat / city

Subhash Desai on Marathi Language Elite Status : 'अभिजात दर्जा मिळण्यास महाराष्ट्र पात्र'

author img

By

Published : Feb 21, 2022, 6:50 PM IST

Subhash Desai
Subhash Desai

सुभाष देसाई यांनी रेड्डी यांना कुसूमाग्रज जयंती निमित्त आयोजित ‘मराठी भाषा गौरव दिना’ला मुंबईत येण्याचे निमंत्रण दिले. याच दिवशी मराठी भाषेला अभिजात भाषेचा ( Marathi Language Elite Status ) दर्जा मिळण्याबाबतची घोषणाही करण्याची मागणी केली.

मुंबई - मराठी भाषा अभिजात दर्जा मिळण्यासाठी ( Marathi Language Elite Status ) पूर्णपणे पात्र असून याबाबत लवकरच कार्यवाही केली जाईल, असे आश्वासन केंद्रीय मंत्री जी किशन रेड्डी यांनी दिले आहे, अशी माहिती राज्याचे मराठी भाषा विकास मंत्री सुभाष देसाई ( Subhash Desai on Marathi Language Elite Status ) यांनी दिली. कुसुमाग्रज यांची जयंती ‘मराठी भाषा गौरव दिन’ म्हणून साजरी केली जाती. याच दिवशी मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा, अशी मागणी मंत्री सुभाष देसाई यांनी आज रेड्डी यांना भेटून केली. त्यानंतर ते बोलत होते.

देसाई माध्यमांशी बोलताना
देसाई यांनी मराठी भाषा ही अभिजात आहे. यासोबतच देसाईंनी मराठी भाषेबद्दल सुलभ संदर्भ म्हणून आतापर्यंत झालेल्या वाटचालीची पुस्तिका, आणि निवेदन केंद्रीय मंत्री रेड्डी यांना द‍िले. मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळण्याबाबतचे सर्वच निकष, अटींचे पालन केले असल्याचे केंद्रीय मंत्री रेड्डी यांनी सांगितले. यासोबत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचेही याबाबत सकारात्मक दृष्टीकोन असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. केंद्र सरकार यावर लवकर निर्णय घेणार असल्याचे रेड्डी यावेळी म्हणाले.

मराठी भाषा गौरव दिनाला येण्याचे आमंत्रण
देसाई यांनी रेड्डी यांना कुसुमाग्रज जयंती निमित्त साजरा केला जाणाऱ्या ‘मराठी भाषा गौरव दिना’ला मुंबईत येण्याचे निमंत्रण दिले. याच दिवशी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्याबाबतची घोषणाही करण्याची मागणी केली. यामुळे महाराष्ट्रातील १३ कोटी जनतेला आनंद होईल, असेही देसाई यावेळी म्हणाले.


तर जनअभियान सुरू होईल - देसाई
महाराष्ट्रामध्ये मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा यासाठी जनअभियानाचे रूप आले असल्याचे सांगुन देसाई म्हणाले, महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील मान्यवरांनी मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा यासाठी राष्ट्रपतींना निवेदन दिले असल्याची माहिती रेड्डी यांना दिली. यासह राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना हजारो पोस्ट कार्डसच्या माध्यामातूनही मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा, अशी मागणी करणारे पत्र महाराष्ट्राच्या कान्याकोप-यातून पाठविली असल्याची देसाई यांनी माहिती दिली.

हेही वाचा - CM Uddhav Thackeray : मुख्यमंत्र्यांची राष्ट्रपतींकडे मराठी भाषेला 'अभिजात भाषेचा' दर्जा देण्याची मागणी; पाठवले 1,25,000 पोस्टकार्ड

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.