ETV Bharat / city

MNS Chalo Ayodhya Poster in Mumbai : मनसेचे मुंबईत चला अयोध्या पोस्टर; राज ठाकरे 5 जूनला जाणार दौऱ्यावर

author img

By

Published : May 2, 2022, 2:23 PM IST

Updated : May 2, 2022, 4:14 PM IST

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने ( Maharashtra Navnirman Sena ) शहरात 'चला अयोध्या'चे पोस्टर लावले ( MNS Chalo Ayodhya Poster in Mumbai ) आहे. लोकांना राज ठाकरे यांच्या जून महिन्यातील अयोध्या दौऱ्यात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस जवळील भागात हे पोस्टर लावण्यात आले आहेत.

MNS Chalo Ayodhya Poster in Mumbai
मनसेचे मुंबईत चला अयोध्या पोस्टर

मुंबई - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने शहरात 'चला अयोध्या'चे पोस्टर लावले ( MNS Chalo Ayodhya Poster in Mumbai ) आहे. लोकांना राज ठाकरे यांच्या जून महिन्यातील अयोध्या दौऱ्यात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

मुंबईत मनसे पोस्टर - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस जवळील भागात हे पोस्टर लावण्यात आले आहेत. या पोस्टरवर 'जय श्रीराम, धर्मांध नाही.... मी धर्माभिमानी...., चला अयोध्या!, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा अयोध्या दौरा. , ऐतिहासिक दिवस दिनांक 5 जून 2022 . असा मजकूर या पोस्टरवर दिसून येत आहे.

नागरिकांना आवाहन - मनसेने या बॅनर मध्ये म्हटलंय की, 'जय श्री राम, मी कट्टर नाही, मी धर्माभिमानी आहे' साहजिकच या संदेशाद्वारे मनसेला जनतेला सांगायचे आहे की, धर्माच्या नावाखाली ते कट्टर धर्मांध नसून त्यांना धर्माचा अभिमान आहे. ठाकरे यांची ही कृती हिंदुत्वाच्या दिशेने टाकलेले आणखी एक पाऊल आहे. ज्याद्वारे ते आपले राजकीय मैदान नव्याने शोधत आहेत.

  • Mumbai | Maharashtra Navnirman Sena puts up 'Chalo Ayodhya' poster in the city appealing to people to join Raj Thackeray in his visit to Ayodhya in the month of June

    Visuals from near Chhatrapati Shivaji Maharaj Terminus pic.twitter.com/G0vmt6UmYk

    — ANI (@ANI) May 2, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

राज ठाकरे यांचा इशारा - रविवारी औरंगाबादच्या सभेत राज ठाकरे म्हणाले होते की, लाऊडस्पीकरचा मुद्दा धार्मिक नसून सामाजिक आहे. ३ मे पर्यंत ईद आणि अक्षय्य तृतीयेला मशिदींमधून लाऊडस्पीकर हटवले नाहीत तर ४ मेपासून त्यांचे पक्ष आणि कार्यकर्ते मशिदींसमोर हनुमान चालिसाचे पठण करतील, असा इशारा ठाकरे यांनी दिला आहे. तसेच अजानपेक्षा दुप्पट आवाजात हनुमान चालिसाचे पठण केले जाईल, असे देखील राज ठाकरे यांनी सांगितले आहे.

12 रेल्वेची मागणी - राज ठाकरे 5 जूनला आयोध्या दौऱ्यावर जाणार असून त्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने देखील जय्यत तयारी करण्यात येत आहे. रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांना 12 रेल्वे देण्याची मागणी मनसैनिकांनी केली आहे. तर जवळपास 50 हजाराहून अधिक नागरिक हे आयोध्येला जाणार आहेत. अशी माहिती देखील यावेळी वागस्कर यांनी यावेळी दिली.

हेही वाचा - Raj Thackeray Full Speech Aurangabad : राज ठाकरे यांचे औरंगाबादच्या सभेतील संपूर्ण भाषण जसेच्या तसे..

Last Updated :May 2, 2022, 4:14 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.