ETV Bharat / city

Maharashtra breaking news update :जालन्यात गॅस गळतीने सिलेंडरचा स्फोट, स्फोटात घरातील सर्व साहित्य जळून खाक

author img

By

Published : Jul 8, 2022, 6:36 AM IST

Updated : Jul 8, 2022, 2:36 PM IST

महाराष्ट्र अपडेट न्यूज
महाराष्ट्र अपडेट न्यूज

14:35 July 08

जालन्यात गॅस गळतीने सिलेंडरचा स्फोट, स्फोटात घरातील सर्व साहित्य जळून खाक

जालन्यात गॅस गळतीने सिलेंडरचा स्फोट झाला. स्फोटात घरातील सर्व साहित्य जळून खाक झाले आहे.

13:10 July 08

उद्धव ठाकरे यांची दुपारी २ वाजता मातोश्रीत पत्रकार परिषद, शिवसेनेतील बंडावर काय बोलणार?

शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे थोड्याच वेळात ( आज दुपारी २ वाजता ) मातोश्री येथे पत्रकार परिषद घेणार आहेत. शिवसेनेत बंड करून एकनाथ शिंदे यांनी भाजपबरोबर सत्ता स्थापन केली आहे. गेली काही दिवस शिंदे गटाकडून शिवसेनेला कायदेशीर तसेच राजकीय धक्के बसत आहेत.

12:37 July 08

ठाण्यात झाड कोसळून दहा दुचाकींचे नुकसान

ठाण्यातील मध्यवर्ती ठिकाणी झाड कोसळण्याचे प्रकार वाढले. सकाळी 8 च्या सुमारास पाचपाखाडी भागातील , गणेश वाडी येथे झाड कोसळून तब्बल दहा दुचाकीचें नुकसान झाले आहे. कोणालाही दुखापत नाही. घटनास्थळी आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडून आणि अग्निशमन दलाकडून झाड कापून बाजूला करण्यात आले.

12:12 July 08

धनुष्यचिन्ह हे आमचे आहे - संजय राऊत

सगळे नगरसेवक आमच्यासोबत आहेत. शिवसेना भक्कम राहिल. धनुष्यचिन्ह हे आमचे आहे. हे चिन्ह आमच्याकडेच राहील, असा विश्वास शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी व्यक्त केला.

11:21 July 08

मुंबईच्या धरणांमध्ये १ दिवसात महिनाभराचा पाणीसाठा वाढला!

मुंबईमध्ये जूनच्या अखेरीपासून मुंबई आणि मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणक्षेत्रात चांगला पाऊस पडत आहे. यामुळे गेल्या ७ दिवसात ८.९२ टक्के म्हणजेच १,२९,१२३ दशलक्ष लिटर पाण्याची वाढ झाली होती. काल (७ जुलै) पासून (८ जुलै) आज पर्यंत १ दिवसात एका दिवसात ६.८६ टक्के ९९,३८५ दशलक्ष लिटर इतका म्हणजेच २८ दिवसांचा पाणीसाठा वाढला आहे.

11:04 July 08

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांच्या विरोधात सीबीआयकडून गुन्हे दाखल

  • CBI searches underway across India on the orders of MHA. The agency registered a fresh case against ex-NSE chief Chitra Ramakrishna, Ravi Narain and former Mumbai Commissioner Sanjay Pandey for allegedly tapping phones of NSE officials and other irregularities: CBI Sources

    — ANI (@ANI) July 8, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">


मुंबई आणि चंदीगड घरावरदेखील छापेमारी करण्यात आली आहे. संजय पांडे यांच्या विरोधात सीबीआयकडून 3 गुन्हे दाखल झाले आहेत.

09:24 July 08

गोवा विधानसभेचे पावसाळी अधिवेशन 11 जुलैपासून होणार सुरू

गोवा विधानसभेचा पावसाळी अधिवेशन 11 जुलैपासून सुरू होत आहे. पहिल्यांदा अधिवेशनाचा काळ 24 दिवसांचा ठरविण्यात आला होता. मात्र कोर्टाने ग्रामपंचायत निवडणुका 10 ऑगस्टला घेण्यास सांगितल्यामुळे हा अधिवेशन कालावधी फक्त दहा दिवसाचा करण्यात आला आहे.

09:10 July 08

जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांना अज्ञाताने घातल्या गोळ्या

जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांना नारा शहरात गोळ्या घालण्यात आल्याचे वृत्त जपानच्या माध्यमाने दिले आहे.

08:59 July 08

एकनाथ शिंदे यांच्या सरकार स्थापनेला उद्धव ठाकरेंचे सर्वोच्च न्यायालयात आव्हान

  • Uddhav Thackeray-led faction moves Supreme Court challenging the Maharashtra Governor’s June 30th decision to invite Eknath Shinde to form government in Maharashtra and election of the Speaker in the Assembly. pic.twitter.com/UZt6zNuZ1J

    — ANI (@ANI) July 8, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

एकनाथ शिंदे यांना महाराष्ट्रात सरकार स्थापनेसाठी निमंत्रित करण्याच्या महाराष्ट्राच्या राज्यपालांच्या 30 जूनच्या निर्णयाला आणि विधानसभा अध्यक्षांच्या निवडीला शिवेसेने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील गटाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली.

07:15 July 08

गंमतीत बंदूक दाखवत असताना दिराकडून भावजयीचा गोळी लागून मृत्यू, फरार आरोपीला अटक

अहमदनगर जिल्ह्यातील पोहेगाव येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. भावजयीला गंमतीत बंदूक दाखवत असताना दिराकडून भावजयीला गोळी लागली आहे. भावजयी सुनीता भालेराव गोळीबारात मृत झाल्या आहेत. घटनेनंतर आरोपी विशाल भालेराव घटनास्थळाहून फरार झाला होता. पोलिसांनी त्याचा शोध घेवून त्याला अटक केली आहे. तर त्याच्या सोबतचे दोन मित्र अद्याप फरार असून त्यांचा शोध पोलिसांनाकडून सुरू आहे.

06:55 July 08

घाटकोपर मानखुर्द लिंक रोडवर मालेगाववरून आलेले 2500 किलो गोमांस जप्त

मुंबईतील घाटकोपर येथील देवनार परिसरामध्ये मालेगाव येथून आलेले 2500 किलोहून अधिक गोमांस जप्त केले आहे. पशु कल्याण संस्थेने दिलेल्या माहिती वरून पोलिसांनी ही गुरुवारी कारवाई केली आहे. या प्रकरणात 10 आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून तीन वाहने जप्त करण्यात आली असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

06:31 July 08

मुंबईत समुद्र किनारे सकाळी केवळ ६ ते १० वेळेत राहणार खुले

मुंबई- मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर आणि बुडण्याच्या घटना लक्षात घेऊन, मुंबईतील सर्व समुद्र किनारे फक्त सकाळी 6 ते सकाळी 10 या वेळेत सर्वसामान्यांसाठी खुले केले जातील, असे बृहन्मुंबई महानगरपालिकेने म्हटले आहे.

06:21 July 08

Maharashtra breaking news update : जालन्यात गॅस गळतीने सिलेंडरचा स्फोट, स्फोटात घरातील सर्व साहित्य जळून खाक

मुंबई- भारतीय हवामान विभागाने (IMD) गुरुवारी शहर आणि उपनगरात काही ठिकाणी मुसळधार ( Warning of torrential rains in Mumbai ) ते अति मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. सोबतच काही भागात रेड अलर्ट देखील जाहीर केला होता. भारतीय हवामान खात्याने मुंबई, ठाणे आणि पालघरमध्ये उद्या, 8 जुलैसाठी रेड अलर्ट म्हणजेच अती मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. मागील शुक्रवारपासून मुंबई आणि परिसरात पावसाचा जोर वाढत आहे. त्यात हा पाऊस विश्रांती घेत बरसत असल्याने तेवढाच मुंबईकरांना दिलासा मिळत आहे.

Last Updated :Jul 8, 2022, 2:36 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.