ETV Bharat / city

Breaking News Live : पुढील चार ते पाच दिवस मध्य महाराष्ट्र आणि कोकण भागात मुसळधार पावसाची शक्यता

author img

By

Published : Jul 7, 2022, 6:59 AM IST

Updated : Jul 7, 2022, 4:36 PM IST

महाराष्ट्र लाईव्ह अपडेट
महाराष्ट्र लाईव्ह अपडेट

16:31 July 07

पुढील चार ते पाच दिवस मध्य महाराष्ट्र आणि कोकण भागात जोरदार पावसाची शक्यता

  • Maharashtra | Red alert issued for Raigad, Ratnagiri & Sindhudurg till July 9, while Palghar, Pune, Kolhapur & Satara are on red alert till July 8. Mumbai & Thane are on orange alert till July 10: IMD pic.twitter.com/UWMip78mzs

    — ANI (@ANI) July 7, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

आज ऑरेंज अलर्ट तर उद्या मुंबई, ठाणे आणि पालघरमध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. गेल्या ३-४ दिवसांत मान्सूनच्या अनुकूल परिस्थितीमुळे मध्य महाराष्ट्र आणि कोकण भागात चांगला पाऊस झाला. पुढील 4-5 दिवस असेच राहील - जयंत सरकार, IMD, मुंबई

13:14 July 07

अडचणीच्या वेळी पक्ष मागे उभा राहिला नाही- अभिजित अडसूळ यांची खंत

अडचणीच्या वेळी पक्ष मागे उभा राहिला नाही. आजारात कोणी विचारपूस केली नाही. त्यामुळे आमची नाराजी निश्चित आहे. त्या संदर्भात ठाकरे यांना पत्र पाठवले असल्याची माहिती माजी आमदार कॅप्टन अभिजीत अडसूळ यांनी दिली.

12:25 July 07

सीएसएमटी ते वडाळा दरम्यान दोन तासाचा ब्लॉक

मस्जिद बंदर रेल्वे स्थानकाजवळ भिंतीचा काही भाग कोसळला आहे. धोकादायक भिंतीचा भाग काढण्यासाठी हार्बर मार्गावर २ तासांचा मेगा ब्लॉक घेण्यात आला आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते वडाळा वाहतूक २ तास बंद करण्यात आली आहे. हार्बर मार्गावरील प्रवाशांना मध्य रेल्वेने जाण्याची परवानगी देण्यात आली आहे.

12:03 July 07

उमेश कोल्हे हत्याकांडातील सर्व आरोपींना मुंबईत सत्र न्यायालयातील विशेष निर्णय कोर्टात केले हजर

उमेश कोल्हे हत्याकांडातील आरोपींना NIA कोर्टाकडून आज कोठडीची मागणी करण्याची शक्यता आहे. उमेश कोल्हे यांनी भाजपचे माजी राष्ट्रीय प्रवक्ता नुपूर शर्मा यांच्या वादग्रस्त विधानाला समर्थन केले होते.

12:02 July 07

आमच्यासह उद्धव ठाकरेंना भाजपशी संवाद साधावा लागेल- दीपक केसरकर

मुंबई- आमच्यासह उद्धव ठाकरेंना भाजपशी संवाद साधावा लागेल, असे शिंदे गटाचे दीपक केसरकर यांनी माध्यमांशी बोलतना सांगितले. आम्ही उद्धव ठाकरेंशी बोलू, असेही त्यांनी सांगितले.

11:16 July 07

ठाणे महापालिकेतील शिवसेनेच्या 66 नगरसेवकांनी घेतली एकनाथ शिंदे यांची मुंबईत भेट

ठाणे - ठाणे जिल्ह्यात शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो कारण ठाणे महानगरपालिकेने शिवसेनेला सर्वात पहिली सत्ता दिली. आता ठाणे महानगरपालिकेतील 67 नगरसेवक पैकी 66 नगरसेवक हे काल रात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नंदनवन बंगल्यात जाऊन भेट घेतली. 66 माजी नगरसेवक हे शिंदे गटात सहभागी झाले. यामध्ये माजी महापौर नरेश मस्के समवेत हे नगरसेवक यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेट घेतली. 67 नगरसेवक पैकी खासदार राजन विचार यांच्या पत्नी नंदिनी विचारे हे मात्र शिवसेनेतच त्यामुळे उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे गट आता अशी दुफळी ठाण्यात निर्माण झाल्याचे चित्र या भेटीमुळे दिसून येत आहे.

11:13 July 07

नवीन सरकार आल्यानंतर सहा महिन्यापूर्वीचे पुनर्विलोकन - दीपक केसरकर

नवीन सरकार आल्यानंतर सहा महिन्यापूर्वीचे पुनर्विलोकन केले जाते. योग्य निर्णय आहेत ते तसेच ठेवले जातात. काही चुकीचे वाटले तर त्यात बदलले जातात. अशी परंपरा पहिल्यापासून आहे आणि ती बदललेली नसल्याचे शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी सांगितले.

10:43 July 07

डहाणूत शाळेची भिंत कोसळली; सुदैवाने बचावले विद्यार्थी

पालघर-डहाणूत गेल्या दोन-तीन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळित झाले आहे. तालुक्यातील पळे येथील जिल्हा परिषद शाळेची भिंत कोसळल्याने मोठे नुकसान झाले. सुदैवाने रात्रीच्या सुमारास ही भिंत पडल्याने कोणतीही दुर्घटना न घडता यातून विद्यार्थी बचावले आहेत.

10:40 July 07

नागपूरमध्ये चोरट्यांनी मेडिकल स्टोअर्सचे शटर वाकवून चोरले साडेचार लाख रुपये

नागपूरच्या प्रसिद्ध मेयो रुग्णालयाजवळ असलेल्या श्याम मेडिकल स्टोअर्स मधून पहाटेच्या सुमारास तीन अज्ञात चोरट्यांनी साडेचार लाख रुपये चोरून नेले. तिघेही चोरटे पहाटेच्या सुमारास दुकानाचा शटर वाकवून आत मध्ये शिरले आणि दुकानात ठेवलेले साडेचार लाख रुपये घेऊन पसार झाले. चोरीची ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही मध्ये चित्रीत झाली आहे.

10:31 July 07

राजन विचारे यांना शिवसेनेचे प्रतोद करण्याकरिता लोकसभा अध्यक्षांना पत्र-संजय राऊत

उद्धव ठाकरेंच्या आदेशानुसार आम्ही लोकसभेत बदल केले. राजन विचारे यांना पक्षाचे प्रतोद व्हावे, यासाठी लोकसभा अध्यक्षांना पत्र लिहिले आहे. ईडी कारवाईमुळे भावना गवळींना कायदेशीर अडचणी होत्या, असेही शिवसेनेचे नेते, खासदार संजय राऊत यांनी सांगितले.

10:25 July 07

पुणे शहरातील तब्बल 478 जुन्या वाड्यांच्या संदर्भात मालकांना नोटीस

पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर पुणे शहरातील तब्बल 478 जुन्या वाड्यांच्या संदर्भात मालकांना नोटीस देण्यात आली आहे. पावसाळ्याआधी 38 वाडे पाडण्यात आले आहेत.

10:22 July 07

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज पदभार स्वीकारणार

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज पदभार स्वीकारणार आहेत. मंत्रालयात मुख्यमंत्री कार्यालयाची सजावट करण्यात आली आहे. रांगोळी आणि फुलांची आरास घालून मुख्यमंत्र्यांचे स्वागत करण्यात येणार आहे.

10:10 July 07

वसई विरारमध्ये मुसळधार पावसामुळे शाळांना सुट्टी

रस्ते वाहतूक विस्कळीत झाल्याचा शाळकरी मुलांना फटका बसला आहे. विरारच्या सेंट झेवीअर्स शाळेभोवती पाण्याचा वेढा आहे. विरार - वसई-विरारमध्ये तिसऱ्या दिवसापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे शहरातील मुख्य रस्त्यांना नदीचे स्वरूप आले आहे.

09:27 July 07

मुंबईतील हिरानंदानी पवई भागातील शॉपिंग सेंटरमध्ये आग

मुंबई- मुंबईतील हिरानंदानी पवई भागातील एका शॉपिंग सेंटरमध्ये आग लागली. त्यानंतर त्याच अग्निशमन दलाच्या ६ गाड्या, पाण्याच्या टाक्यांच्या ३ गाड्या हजर होत्या, त्यानंतरही आगीवर नियंत्रण मिळवता आलेले नाही. आग कशी लागली हे अद्याप समजू शकलेले नाही.

09:10 July 07

पंचगंगा संथगतीने इशारापातळीकडे; 15 तासंपासून पाणीपातळीत केवळ 6 इंच वाढ

कोल्हापूर - कोल्हापूरात गेल्या 3 दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. परिणामी पुन्हा एकदा जिल्ह्यात महापुराची पुनरावृत्ती होते की काय अशी भीती निर्माण झाली आहे. असे असतानाच काल दिवसभर पावसाचा जोर कमी झाल्याने पंचगंगा नदीची पाणीपातळी वाढण्याचा वेग मंदावला. गेल्या 15 ते 16 तासंपासून पंचगंगा नदीच्या पाणीपातळीत केवळ 6 इंचांनी वाढ झाली आहे. सद्यस्थितीत पंचगंगा 32.6 फुटांवरून वाहत आहे.

08:58 July 07

रात्रभर मुंबईत मुसळधार पाऊस, सकाळी पावसाचा जोर कमी

मागील चार दिवसांपासून मुंबईसह महाराष्ट्राला पावसाने जोरदार तडाखा दिला. मुंबईतील अनेक सखल भागात पाणी साचले. साचलेल्या पाण्यातून मार्ग काढताना मुंबईकरांना वाट काढावी लागली. रात्रभर मुंबईत मुसळधार पाऊस झाला. मात्र आज सकाळी पावसाचा जोर काहीसा कमी झाला आहे. अधूनमधून जोरदार सरी कोसळत आहेत. त्यात तितकासा जोर नाही. पाऊस नसला तरी मुंबईकरांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो आहे

08:26 July 07

रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गसाठी 9 जुलैपर्यंत रेड अलर्ट

  • Maharashtra | Red alert issued for Raigad, Ratnagiri & Sindhudurg till July 9, while Palghar, Pune, Kolhapur & Satara are on red alert till July 8. Mumbai & Thane are on orange alert till July 10: IMD pic.twitter.com/UWMip78mzs

    — ANI (@ANI) July 7, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गसाठी 9 जुलैपर्यंत रेड अलर्ट जारी, तर पालघर, पुणे, कोल्हापूर आणि सातारा 8 जुलैपर्यंत रेड अलर्टवर. मुंबई आणि ठाणे 10 जुलैपर्यंत ऑरेंज अलर्टवर असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.

07:53 July 07

मुंबईत सलग तिसऱ्या दिवशी पावसाची बॅटिंग

मुंबईतील दहिसर, बोरिवली मालाड, कांदिवली, जोगेश्वरी, अंधेरी वांद्रे, दादर या इतर भागात मुसळधार पाऊस झाला. सलग तीन दिवसांपासून मुंबईत पाऊस पडत आहे. रात्रभर पाऊस पडला, तर मुंबईच्या अंधेरी सबवेमध्ये पाणी तुंबले. मुंबईत मुसळधार पाऊस सुरू आहे. काल रात्रीपासून शहरात मुसळधार पाऊस पडत आहे.

07:19 July 07

उमेश कोल्हे प्रकरणात एनआयएचा महाराष्ट्रात सक्रिय तपास सुरू

अमरावती येथील उमेश कोल्हे यांच्या हत्येप्रकरणी राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) महाराष्ट्रात अनेक ठिकाणी झडती घेतल्या आहेत.

07:12 July 07

मुंबईत मुसळधार पाऊस, अंधेरीतील सबवे जलमय

मुंबईत मुसळधार पाऊस झाला आहे. मुंबई शहरात पावसाचा जोर कायम असल्याने अंधेरी सबवे जलमय झाला आहे.

06:47 July 07

नांदेडच्या आसना नदी पात्रात रसायनयुक्त पाणी, हजारो मासे मृत्युमुखी

नांदेड शहराच्या आसना बायपास परिसरातून वाहणाऱ्या आसना नदी पात्रात पूर्णा, वसमत या भागातील साखर कारखान्यांची मळीयुक्त व रसायनमिश्रित पाणी सोडण्यात आल्याने नदी दूषित झाली. याचा फटका जलचर प्राण्यांना बसला असून हजारो मासे मृत्युमुखी पडले आहेत. या घटनेची माहिती समजताच जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी स्वतः भेट देऊन संबंधित प्रकरणाची माहिती घेतली.

06:22 July 07

Maharashtra Live breaking news update : अडचणीच्या वेळी पक्ष मागे उभा राहिला नाही- अभिजित अडसूळ यांची खंत

मुंबई- शिवेसेनेतील बंडखोरीनंतर राज्यात शिंदे-फडणवीस यांची सत्ता स्थापन झाली. मात्र, शिवसेना या धक्क्यातून अजून सावरलेली दिसत नाही. एकनाथ शिंदे ( CM Eknath Shinde ) यांनी बंडखोरी करत शिवसेनेत भगदाड पाडल्यानंतर आता खासदार शिंदेच्या वाटेवर आहेत. शिंदे यांचे बंड थंड झाले असताना आता एकूण 11 खासदार लवकरच शिंदे यांच्या गटात सामील होणार अशी शक्याता आहे. त्यामुळे हा शिवसेनेसाठी तसेच पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासाठी मोठा असणार आहे.

Last Updated :Jul 7, 2022, 4:36 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.