ETV Bharat / city

HSC Result : बारावीचा ऑनलाईन निकाल आज दुपारी 1 वाजता होणार जाहीर

author img

By

Published : Jul 16, 2020, 4:26 AM IST

या संकेतस्थळावर पाहता येईल निकाल - www.maharesult.nic.in www.hscresult.mkcl.org www.maharashtraeducation.com

hsc result
आज बारावीचा निकाल...

मुंबई - महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या इयत्ता बारावीच्या परिक्षेचा निकाल आज (गुरुवार, 16 जुलै) जाहीर होणार आहे. आज दुपारी 1 वाजता राज्य शिक्षण मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर हा निकाल जाहीर केला जाणार आहे.

फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात बारावीच्या परीक्षा घेण्यात आल्या होत्या. राज्यात कोरोनाचे संकट गडद होण्यापूर्वीच ही परीक्षा संपली होती. तरीही कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे बारावीच्या पेपर तपासणीवर मोठा परिणाम झाला होता. त्यामुळे हा निकाल तब्बल दीड महिने उशिराने जाहीर केला जात आहे. मागील चाळीस वर्षात ही अशी पहिलीच वेळ असल्याची माहिती मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी दिली.

या संकेतस्थळावर पाहता येईल निकाल -

  • www.maharesult.nic.in
  • www.hscresult.mkcl.org
  • www.maharashtraeducation.com

महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळातून सुमारे 15 लाख 5 हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी बारावीची परीक्षा दिली आहे. कोरोनामुळे या परीक्षेचा निकाल रखडला होता. निकाल जाहीर होताच विद्यार्थ्यांना सर्व विषयनिहाय संपादित केलेले गुण उपलब्ध होणार असून त्यासाठीची प्रत प्रिंट आउटच्या माध्यमातून घेता येणार आहे. तर, www.maharesult.nic.in या संकेत स्थळावर निकालाशिवाय निकालाबाबत इतर सांखिकीय माहिती मंडळाकडून उपलब्ध करून दिली जाणार आहे.

www.mahsscboard.in या संकेतस्थळावर कनिष्ठ महाविद्यालय यांना एकत्रित निकाल उपलब्ध करून दिला जाणार आहे. बारावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर लगेचच दुसऱ्या दिवशी विद्यार्थ्यांना श्रेणी विषयांव्यतिरिक्त कोणत्याही विषयात संपादित केलेल्या गुणांची पडताळणी करण्यासाठी अथवा उत्तरपत्रिकांच्या छायाप्रती, पुनर्मूल्यांकन व स्थलांतर प्रमाणपत्रासाठी विभागाकडे ऑनलाईन अर्ज करण्याची मुभा देण्यात आली आहे. यासाठी शाळा, महाविद्यालयांकडून अर्ज सादर करण्यासाठी विद्यार्थ्यांना आवाहन करण्यात आले आहे. गुण पडताळणीसाठी 17 जुलै ते 27 जुलै, तर छायाप्रतीसाठी 5 ऑगस्टपर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.