ETV Bharat / city

LIVE Updates : राज्यातील कोरोना परिस्थितीचे ताजे अपडेट्स; वाचा एका क्लिकवर..

author img

By

Published : May 20, 2021, 6:18 AM IST

Updated : May 20, 2021, 11:45 AM IST

Maharashtra Corona situation LIVE updates on ETV Bharat
LIVE Updates : राज्यातील कोरोना परिस्थितीचे ताजे अपडेट्स; वाचा एका क्लिकवर..

11:44 May 20

बोगस डाँक्टरावर कारवाई करण्यासाठी गेलेल्या पथकावर जमावाने हल्ला

औरंगाबाद : पैठण (बालानगर) बोगस डाँक्टरावर कारवाई करण्यासाठी गेलेल्या पथकावर जमावाने हल्ला केल्याची घटना दि.१९ रोजी दुपारी १२ वाजता बालानगर येथे घडली. या प्रकरणी ५ आरोपीविंरुद्ध एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

11:43 May 20

कराडमध्ये दवाखाना चालविणार्‍या बोगस महिला डॉक्टरला अटक

कराड (सातारा) - कराड तालुक्यातील नारायणवाडी गावात दवाखाना चालविणार्‍या बोगस महिला डॉक्टरला कराड ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे. रुग्णांवर उपचार करतानाच तिला पकडण्यात आले. सुवर्णा प्रताप मोहिते (वय 40, रा. रेठरे खुर्द, ता. कराड), असे बोगस महिला डॉक्टरचे नाव आहे.

11:43 May 20

ऑक्सिजनअभावी दुर्घटना घडल्यास अधिकारी वैयक्तिकरीत्या जबाबदार

औरंगाबाद - ऑक्सिजनअभावी, तुटवड्यामुळे एखादीही दुर्घटना घडल्यास, शपथपत्र सादर करणाऱ्या अधिकाऱ्यांना वैयक्तिकरित्या जबाबदार धरण्यात येईल, असे औरंगाबाद खंडपीठाच्या न्या. रवींद्र घुगे आणि न्या. बी. यु. देबडवार यांच्या खंडपीठाने झालेल्या सुनावणीत स्पष्ट केले.

10:07 May 20

मुक्यरमायकोसिसवरील औषध अल्पदरात उपलब्ध करण्यासंदर्भात विचार करा; मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे सरकारला निर्देश

नागपूर : मुक्यरमायकोसिस आजारावरील औषध महागडे असल्याने गरीब रुग्णांना ती परवडणारी नाहीत, म्हणून मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने म्युकरमायकोसिस उपचारावरील औषध अल्प दरात रुग्णांना उपलब्ध करून देण्यासंदर्भात राज्य सरकारने विचार करावा, त्याकरिता एसओपी तयार करावी असे निर्देश दिले आहेत. सध्या नागपूर आणि विदर्भात मुक्यरमायकोसिस या आजाराने ग्रासलेले शेकडो रुग्ण असून राज्यात हा आकडा हजारच्या पुढे गेला आहे, त्यामुळे न्यायालयाने सरकारला दिलेल्या निर्देशांमुळे रुग्णांना दिलासा मिळण्याची शक्यता वाढली आहे.

09:07 May 20

येवला तालुक्यातील खामगाव पाटी येथे नाकेबंदी दरम्यान प्रवाशांची रॅपीड अँटीजन टेस्ट..

नाशिक : येवला तालुक्यातील खामगाव पाटी येथे पोलिसांकडून नाकेबंदी करण्यात आली असून यावेळी औरंगाबाद जिल्ह्यातून नाशिक जिल्ह्यात येणाऱ्या प्रवाशांची आरोग्य विभागाकडून रॅपीड अँटीजन टेस्ट करण्यात येत आहे.

08:34 May 20

पंतप्रधान घेणार राज्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी घेणार बैठक

  • राज्यातील कोरोनाची परिस्थिती आणि उपाय योजना संदर्भात राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत आढावा बैठक.
  • दूरदृश्य प्रणालीद्वारे सकाळी 11 वाजता बैठकीला सुरुवात होईल.
  • लसीकरणाला गती देण्याबाबतही होणार चर्चा.

08:20 May 20

म्युकरमायकोसिसचे नगरमध्ये 81 रुग्ण, आतापर्यंत तिघांचा मृत्यू..

अहमदनगर- जिल्ह्यात म्युकरमायकोसिसचे 81 रुग्ण असल्याचे आतापर्यंत समोर आले आहेत. म्युकरमायकोसिसचे 73 रुग्ण सध्या नगर शहरात खाजगी रुग्णालयात, तर आठ रुग्ण जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल होते, पैकी खाजगी रुग्णालयातील एक तर शासकीय रुग्णालयातील दोन रुग्णांचा उपचारांदरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला आहे. म्युकरमायकोसिस आजाराने जिल्ह्यात ठिकठिकाणी रुग्ण पुढे येत असून त्यांच्यावर नगर शहरातील जिल्हा शासकीय आणि खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सुनील पोखरणा आणि महानगरपालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ.अनिल बोर्गे यांनी दिली आहे.

08:14 May 20

गुन्हे शाखेचा अधिकारी आहे सांगत फसवणूक; पोलिसांनी केली अटक..

मुंबईच्या दहिसर पोलिसांनी कोरोना काळात लोकांची फसवणूक करणाऱ्या बनावट गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यास अटक केली आहे. दुपारी अडीचनंतर जे लोक सामान घेण्यासाठी किंवा कामानिमित्त बाहेर जायचे. त्यांच्याकडून लॉकडाऊनचे उल्लंघन करण्याच्या नावाखाली आरोपी संदीप चंद्रकांत खोत (वय 32) दंडस्वरूपात रक्कम उकळत असे.

06:16 May 20

नवी मुंबईतील यश पॅराडाईस सोसायटीमध्ये उभारले कोविडं सेंटर..

नवी मुंबई : नवी मुंबई महानगर पालिकेचे माजी विरोधी पक्ष नेते विजय चौगुले यांच्या 'माझी सोसायटी माझी जबाबदारी' या संकल्पनेने ऐरोली, सेक्टर ८ येथील यश पॅराडाईज सोसायटी मध्ये सुविधायुक्त असे कोविड केअर सेंटर उभारण्यात आले आहे. या कोविड सेंटरचे उद्घाटन नगरविकासमंत्री तथा पालकमंत्री एकनाथ शिंदे व राज्यस्तरीय कोविड टास्क फोर्सचे प्रमुख डॅा. राहूल पंडीत यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाला ठाणे जिल्हा खासदार राजन विचारे उपस्थित होते.

06:16 May 20

कोरोनाची तिसरी लाट - ३८०० ऑक्सिजन तर १ हजार आयसीयू बेड्स वाढवणार

मुंबई - मुंबईत कोरोनाचा प्रसार गेले वर्षभर आहे. यावर्षी फेब्रुवारीपासून कोरोनाची दुसरी लाट आली होती. आता पुन्हा तिसरी लाट येण्याची शक्यता असल्याने त्याचा सामना करण्यासाठी मुंबईत चार नवीन जंबो सेंटर उभारली जात आहेत. त्यात ५५०० बेड्स असणार असून त्यातील ७० टक्के बेड्स ऑक्सिजनचे तर १ हजार आयसीयू बेड्स असतील. यामुळे सध्या असलेल्या बेड्सच्या संख्येत वाढ होणार असल्याने रुग्णांची संख्या वाढली तरी त्यांच्यावर उपचार करणे शक्य होणार आहे अशी माहिती पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली. 

06:16 May 20

मुंबईत आज दिव्यांग तसेच 45 वर्षावरील नागरिकांचे लसीकरण,,

मुंबई - मुंबईत लसीचा तुटवडा असल्याने पालिकेने प्रत्येक विभागात लसीकरण केंद्र सुरू केली आहेत. दिव्यांग आणि 45 वर्षावरील नागरिकांना पालिका आणि सरकारी 213 केंद्रांवर कोविशील्ड तर 24 केंद्रांवर कोवॅक्सिन लसीचा डोस दिला जाणार आहे. प्रत्येक केंद्रांवर 100 डोस दिले जातील असे पालिकेकडून कळविण्यात आले आहे.

06:06 May 20

राज्यातील कोरोना परिस्थितीचे ताजे अपडेट्स; वाचा एका क्लिकवर..

मुंबई - राज्यात बुधवारी(19 मे) 34 हजार 031 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर 594 रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. राज्यात बुधवारी 51 हजार 457 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे . राज्यात 49 लाख 78 हजार 937 रुग्ण आतापर्यंत कोरोनामुक्त झाले आहेत. मागच्या काही दिवसांपासून रुग्ण बरे होण्याचं प्रमाण वाढत असलं तरी‌, उपचारा दरम्यान मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या मोठी आहे.

राज्यातील कोरोनाग्रस्त रुग्णांची स्थिती..

  • राज्यात नव्या 34 हजार 031 रुग्णांची नोंद.
  • राज्यात एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या 54,67,537
  • राज्यात 24 तासात 594 रुग्णांचा मृत्यू
  • राज्यात 24 तासात 51हजार 457 रुग्ण कोरोनामुक्त.
  • राज्यात आतापर्यंत 49 लाख 78 हजार 937 रुग्णांची कोरोनावर मात.
  • राज्यात अ‌ॅक्टिव्ह रुग्णांची संख्या 4 लाख 01हजार 695.
Last Updated :May 20, 2021, 11:45 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.