ETV Bharat / city

Maharashtra Cabinet Expansion : शिंदे सरकार अ‍ॅक्शन मोडवर; आज मंत्रीमंडळ विस्तार, तर बुधवारपासून अधिवेशन

author img

By

Published : Aug 8, 2022, 9:28 PM IST

Updated : Aug 9, 2022, 6:28 AM IST

गेल्या काही दिवसांपासून होणारी टीका टाळत शिंदे सरकार ( Shinde Govt ) अ‍ॅक्शन मोडवर आल्याचे समोर येत आहे. तर दुसरीकडे मंत्रीमंडळ विस्तारावरुन विरोधीपक्ष नेते अजित पवारांनी ( Leader of Opposition Ajit Pawar ) यावर प्रतिक्रिया देत आम्हाला कोणतेही निमंत्रण आले नसल्याचे म्हटले आहे. ज्याप्रमाणे सध्या बैठका आणि घडामोडी सुरू आहेत. त्या पहिल्या तर रात्री उशिरापर्यंत मंत्रिमंडळ विस्ताराबाबतचे निमंत्रण येऊ शकते, अशी शक्यताही अजित पवार यांनी वर्तवली आहे.

Maharashtra Cabinet Expansion
Maharashtra Cabinet Expansion

मुंबई - एकनाथ शिंदे यांच्या सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार आज होण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे. अद्याप या बाबत अधिकृत घोषणा झालेली नाही. परंतु आज विस्तार तर बुधवारपासून विधानसभेचे पावसाळी अधिवेशन ( Monsoon session ) घेण्यात येणार आहे. गेल्या काही दिवसांपासून होणारी टीका टाळत शिंदे सरकार ( Shinde Govt ) अ‍ॅक्शन मोडवर आल्याचे समोर येत आहे. तर दुसरीकडे मंत्रीमंडळ विस्तारावरुन विरोधीपक्ष नेते अजित पवारांनी ( Leader of Opposition Ajit Pawar ) यावर प्रतिक्रिया देत आम्हाला कोणतेही निमंत्रण आले नसल्याचे म्हटले आहे. ज्याप्रमाणे सध्या बैठका आणि घडामोडी सुरू आहेत. त्या पहिल्या तर रात्री उशिरापर्यंत मंत्रिमंडळ विस्ताराबाबतचे निमंत्रण येऊ शकते, अशी शक्यताही अजित पवार यांनी वर्तवली आहे.

22 मंत्र्यांचा शपथविधी आज होणार : मंत्रीमंडळ विस्ताराबाबत झालेल्या बैठकीनंतर राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार एकनाथ शिंदे गट, भारतीय जनता पक्षातील कोणत्या नेत्यांना संधी द्यायची याबाबत चर्चा झाली. आज होणाऱ्या शपथविधीसाठी मंत्र्यांची यादी तयार करण्यात आली असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांकडून मिळत आहे. जवळपास वीस ते बावीस मंत्र्यांचा शपथविधी आज होणार ( Ministers sworn in tomorrow ) असल्याचं सांगण्यात येत आहे. उद्या राजभवनात हा शपथविधी पार पाडला जाईल. आधी विधानभवनाच्या सेंट्रल हॉलमध्ये हा शपथ विधी पार पाडला जाईल, अशा प्रकारचे देखील शक्यता वर्तनात होती. मात्र आता हा शपथविधी राजभवनात पार पाडला जाणार असल्याचं सांगण्यात येत आहे.

मंत्रिमंडळात कोणाला स्थान? : आज होणाऱ्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत एकनाथ शिंदे गटाकडून दादा भुसे, उदय सामंत, दीपक केसरकर, शंभूराजे देसाई, संदिपान भुमरे, संजय शिरसाट, अब्दुल सत्तार, गुलाबराव पाटील, तानाजी सावंत, बच्चू कडू असे दहा जणांचा शपथ विधी पार पडेल, अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे. तर तेथेच भारतीय जनता पक्षाकडून चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार, गिरीश महाजन, राधाकृष्ण विखे पाटील, संजय कुटे, जयकुमार रावल, रवींद्र चव्हाण, बबनराव लोणीकर, नितेश राणे, प्रवीण दरेकर, राम शिंदे, अपक्ष आमदार रवी राणा यांना संधी दिली जाणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

मंत्रिमंडळ विस्ताराला दिल्ली हायकमांडने मंजुरी! : मंत्रिमंडळ विस्ताराबाबत शिंदे आणि फडणवीस यांच्यात सोमवारी बैठक झाली. दिल्ली हायकमांडकडूनही सर्व औपचारिकता पूर्ण करण्यात आल्या आहेत. एकंदरीत नव्या मंत्रिमंडळाबाबत सर्व काही निश्चित झाले आहे. भाजपच्या छावणीतून सुधीर मुनगंटीवार, चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन यांचा मंत्रिमंडळात समावेश होऊ शकतो. दुसरीकडे शिंदे कॅम्पमधून गुलाबराव पाटील, सदा सावरकर, दीपक केसरकर यांना संधी दिली जाऊ शकते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गृहखाते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे दिले जाऊ शकते.

बुधवारपासून विधानसभेचे पावसाळी अधिवेशन : मंत्रीमंडळ विस्ताराची तारीख ठरताच महाराष्ट्र विधानसभेचे पावसाळी अधिवेशन 10 ते 18 ऑगस्ट दरम्यान होणार आहे. पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वतयारीसाठी विधिमंडळ सचिवालयाने सुट्या रद्द केल्या आहेत. सचिवालयाने सोमवारी जारी केलेल्या आदेशानुसार ९ ते १८ ऑगस्टदरम्यान कर्मचाऱ्यांच्या सर्व सुट्या रद्द करण्यात आल्या असून त्यांना कार्यालयात हजर राहण्यास सांगण्यात आले आहे.

हेही वाचा - Maharashtra Assembly Session : बुधवारपासून विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन

Last Updated : Aug 9, 2022, 6:28 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.