ETV Bharat / city

Breaking news अनिल परब यांचे रिसॉर्ट पाडण्यासाठी रत्नागिरी कलेक्टरकडे 1 कोटी हस्तांतरित, सोमैयांचा दावा

author img

By

Published : Oct 12, 2022, 6:54 AM IST

Updated : Oct 12, 2022, 7:32 PM IST

Maharashtra Breaking news
Maharashtra Breaking news

19:24 October 12

अनिल परब यांचे दापोलीतील रिसॉर्ट पाडण्यासाठी रत्नागिरी कलेक्टर बँकेकडे 1 कोटी रुपये हस्तांतरित, सोमैयांचा दावा

मुंबई - अनिल परब यांचे दापोलीमध्ये साई रिसॉर्ट NX आणि सी कोंच रिसॉर्ट पाडण्यात येणार आहे. ते पाडण्याच्या खर्चासाठी महाराष्ट्र सरकारने त्यांना पैसे दिले आहेत. पर्यावरण मंत्रालयाने आज रत्नागिरी कलेक्टर बँकेकडे त्यासाठी 1,01,25,000 रुपये हस्तांतरित केले आहे. भाजप नेते किरीट सोमैया यांनी ट्विट करुन हा दावा केला आहे.

19:18 October 12

वसईत शाळेच्या गोदामाला किरकोळ आग

वसई - वसईच्या विद्या विकासनी शाळेच्या खेळाचे सामान ठेवण्याच्या गोदामाला अचानक आग लागली. आग लागली त्यावेळेस शाळा सुरू होती. शाळेत परीक्षा सुरू असल्याने काही मुले पेपर देऊन घरी गेली होती. पण जी मुले शाळेत होती, यांना तातडीने शाळेच्या पटांगनात आणण्यात आले. अग्नीशमन विभागाने तातडीने आग विझवली.

19:03 October 12

चर्चगेट स्टेशनवर थरार, पतीने पत्नीवर केले चाकूने सपासप वार

मुंबई - चर्चगेट स्टेशनवर थरार पाहायला मिळाला. पतीने पत्नीवर चाकूने सपासप वार केले. त्यानंतर पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या.

17:21 October 12

राज्यात १०० टक्के खरीप पेरण्या - राज्य सरकार

मुंबई - राज्यात एकीकडे अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. तरीही ७ ऑक्टोबरपर्यंत शंभर टक्के खरीप पेरण्याचा झाल्याचा दावा राज्य सरकारने मंत्रिमंडळ बैठकीत केला. आज विविध विषयावर चर्चा झाली तसेच काही महत्वाचे निर्णयही घेण्यात आले.

17:03 October 12

रेल्वेच्या खासगीकरणाच्या विरोधात देशभर आंदोलन

मुंबई - रेल्वेच्या खासगीकरणाच्या विरोधात देशभर आंदोलन करण्यात येत आहे. मुंबईत हजारो कर्मचारी तसेच इतर कामगारांचे रेल्वे वर्कशॉपमध्ये उपोषण आंदोलन झाले. शासनाने दखल न घेतल्यास रेल्वे सेवेवर परिणाम होऊ शकतो.

16:54 October 12

ऋतुजा लटके यांच्या राजीनाम्यासंदर्भात दबावाचा प्रश्नच नाही - चहल

मुंबई - ऋतुजा लटके यांनी 3 ऑक्टोबर रोजी राजीनाम्यासाठी अर्ज केला. त्यावर 30 दिवसात निर्णय घेणे नियमानुसार अपेक्षित आहे. त्यानुसार निर्णय दिला जाईल. यासंदर्भात कोणत्याही सरकारी दबावाचा प्रश्नच नाही असे, पालिका आयुक्त इकबाल सिंग चहल यांनी स्पष्ट केले. ते रुतुजा लटके यांच्या राजीनाम्यावर बोलत होते.

16:43 October 12

अनिल देशमुखांच्या फार्महाऊसवर वन विभागाचा छापा

ठाणे - जिल्ह्यातील अनिल देशमुखांच्या फार्महाऊसवर वन विभागाने छापा टाकला आहे. छाप्यात काळी जादूच्या होम, हवनासाठी वापरणाऱ्या पांढऱ्या काड्यांचा लाखोंचा साठा जप्त करण्यात आला.

16:27 October 12

ठाण्यात परतीच्या पावसाची जोरदार हजेरी

ठाणे - ठाण्यात परतीच्या पावसाची जोरदार हजेरी. दुपारपासून उसंत घेतलेल्या पावसाने ठाण्याला पुन्हा झोडपले. अनेक ठिकाणी सखल भागात त्यामुळे पाणी साठले. लोकांची त्यामुळे धांदल उडाली.

15:54 October 12

आमचा कुणावरही आणि कुठलाही दबाव नाही - देवेंद्र फडणवीस

मुंबई - आमचा कुणावरही आणि कुठलाही दबाव नाही असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे. बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना आम्ही एकत्र लढणार आहोत. सरकार यात कुठलाच हस्तक्षेप करणार नाही. ढाल, तलवार हे मराठमोळे चिन्ह आहे. त्याला गद्दार म्हणणे ही सर्वात मोठी गद्दारी आहे. अंधेरीची निवडणूक कोण लढवणार हे आम्ही दोघे चर्चा करून ठरवू. अद्याप त्यावर निर्णय झालेला नाही, असेही फडणवीस यांनी स्पष्ट केले.

15:13 October 12

ऋतुजा लटके याचिकेवर उद्या होणार सुनावणी

मुंबई - अंधेरी पूर्व ठाकरे गटाच्या उमेदवार लटके यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. ऋतुजा लटके याच्या याचिकेवर उद्या होणार सुनावणी होणार आहे. मुंबई उच्च न्यायालयाकडून संबंधित BMC ला नोटीस बजावण्याचे निर्देश दिले आहेत. मुंबई महानगरपालिकेने ऋतुजा लटके महापालिकेत परिमंडळ उपायुक्तांच्या कार्यालयात कार्यरत आहेत. ऋतुजा लटके यांनी एक महिना अगोदर दिलेला राजीनामा अद्यापही मंजूर न केल्याने उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. ऋतुजा लटके यांची बाजू वकील विश्वजित सावंत यांनी मांडली.

15:04 October 12

तेलगी घोटाळ्यानंतर सर्वात मोठा घोटाळा हा शपथपत्र घोटाळा - नरेश म्हस्के

ठाणे - तेलगी घोटाळ्यानंतर सर्वात मोठा घोटाळा हा शपथपत्र घोटाळा झाला आहे. महिनाभरापासून हे काम सुरू आहे. नॉटरी गायब आहे. 99 टक्के लोकांनी खोटी असल्याचे सांगितले आहे. 10 करोड रुपयांचे काम नॉटरीने दिले होते. निवडणूक आयोगाकडे जमा केलेली शपथ पत्र खोटी आहेत त्यांची खातरजमा करावी. तसेच प्रमुख सूत्रधारावर कारवाई करावी असे शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी सांगितले.

14:08 October 12

मशाल चिन्हावर निवडणूक लढवणार - ऋतुजा लटके

शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून मशाल चिन्हावर निवडणूक लढवणार. ऋतुजा लटके यांनी याबाबतची घोषणा नुकतीच केली आहे. त्या महालिकेत पत्रकारांशी बोलत होत्या. नियमानुसार एक महिन्याचा पगार पालिकेकडे जमा केला आहे. माझी सही बाकी आहे सांगितले जात आहे. मी गेले ३ दिवस कार्यालयात येवून बसत आहे. आज आयुक्तांची भेट घेवून राजीनामा मंजूर करण्याची मागणी करणार आहे, असेही त्यांनी सांगितले.

13:39 October 12

उद्धव गटाच्या संभाव्य उमेदवार ऋतुजा लटके पालिका आयुक्तांच्या भेटीला

ऋतुजा लटके पालिका आयुक्तांच्या भेटीला गेल्या आहेत. त्यांच्यासोबत माजी उप महापौर हेमांगी वरळीकर या आहेत. दरम्यान ऋतुजा लटके यांचा राजीनामा मंजूर न झाल्यास शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष कोर्टात जाण्याची शक्यता आहे. मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी ही माहिती दिली. अंधेरी पोटनिवडणुकीसाठी लटके या ठाकरे गटाकडून उभ्या राहणार आहेत.

13:04 October 12

अंधेरी पूर्व विधानसभा निवडणुकीसाठी भाजपकडून मुरजी पटेल उद्या उमेदवारी अर्ज भरणार

मुंबई - अंधेरी पूर्व मतदार संघाचे शिवसेनेचे उमेदवार रमेश लटके यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेवर येत्या ३ नोव्हेंबर रोजी निवडणूक होत आहे. यासाठी उद्धव ठाकरे गट विरुद्ध भाजप व शिंदे महायुती यांच्यात महत्त्वाची लढत होणार आहे. भाजपकडून मुरजी पटेल यांना उमेदवारी देण्यात आली आहे. मुरजी पटेल उद्या सकाळी ९ वाजता उमेदवारी अर्ज भरणार आहेत.

12:43 October 12

शिवसेनेतील बंडाळी ही भाजपप्रणित - जयंत पाटील

सांगली - शिवसेनेतील बंडाळी ही भाजपप्रणित होती असा थेट आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी केला आहे. सध्या दोन्ही शिवसेनेच्या गटात वाद सुरू आहे. मात्र शिंदे गट वेगळा होण्यामागे भाजपचा थेट हात होता. त्यामुळे ही बंडाळी भाजपप्रणित होती असे ते म्हणाले.

12:29 October 12

लॉरेन्स बिश्नोई टोळीतील 2 सदस्यांना अटक

लॉरेन्स बिश्नोई टोळीतील 2 सदस्य दीपक अरोरा आणि गुलशन कुमार यांना गोळीबारानंतर अटक केली आहे. 2 पिस्तूल आणि 6 जिवंत काडतुसे त्यांच्याकडून जप्त करण्यात आली. अटक केलेल्या दोन्ही गुंडांचा दिल्ली आणि हरियाणामधील डझनहून अधिक गुन्हेगारी प्रकरणांमध्ये सहभाग आहे, असे दिल्ली पोलिसांनी स्पष्ट केले.

12:19 October 12

ऋतुजा लटके यांचा राजीनामा मंजूर न झाल्यास कोर्टात जाणार - पेडणेकर

मुंबई - ऋतुजा लटके यांचा राजीनामा मंजूर न झाल्यास शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष कोर्टात जाण्याची शक्यता आहे. मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी ही माहिती दिली. वरिष्ठांशी चर्चा करून जो काही निर्णय आहे तो घेतला जाईल, असे त्या म्हणाल्या. त्याचवेळी राजीनामा मंजूर केला नाही तर शिवसनेने कोर्टात जाण्याची तयारी ठेवली आहे, हे त्यांनी स्पष्ट केले. अंधेरी पोटनिवडणुकीसाठी लटके या ठाकरे गटाकडून उभ्या राहणार आहेत.

12:02 October 12

युक्रेनवर अण्वस्त्रांचा वापर केल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील

रशियाने युक्रेनवर अण्वस्त्रांचा वापर केल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील. G7 ने असा इशारा दिला आहे.

11:42 October 12

गोव्याच्या किनार्‍यावर मिग 29 लढाऊ विमान कोसळले

गोव्याच्या किनार्‍यावर एक मिग 29 के लढाऊ विमान तळावर परतत असताना तांत्रिक बिघाड झाल्यामुळे समुद्रात कोसळले. पायलटला सुखरूप बाहेर काढण्यात आले. जलद शोध आणि बचाव कार्यात त्याला बाहेर काढण्यात आले. पायलटची प्रकृती स्थिर असल्याची माहिती भारतीय नौदल विभागाने दिली.

11:19 October 12

कवी कुमार विश्वास आणि भाजप नेते तजिंदर पीएस बग्गा यांच्यावरील एफआयआर रद्द

पंजाब आणि हरियाणा हायकोर्टाने माजी आप नेते आणि कवी कुमार विश्वास आणि भाजप नेते तजिंदर पीएस बग्गा यांच्यावरील एफआयआर रद्द केला. विश्वास यांनी कथितपणे आपचे निमंत्रक अरविंद केजरीवाल यांच्या विरोधात प्रक्षोभक विधाने केली आणि फुटीरतावादी घटकांशी संबंध असल्याचा आरोप केला होता. त्यामुळे 153, 153-ए, 505 आणि इतर अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता

11:08 October 12

एसटी पंपावरील डिझेल संपले, फेऱ्या रद्द झाल्याने हजारो रुपयांच नुकसान

ऐन दिवाळी सणाच्या पाश्र्वभूमिवर पुणे शहरातून लोक आपापल्या गावाला जात असताना आज अचानक पुण्यातील स्वारगेट आगरतील गाड्यांमधील डिझेल संपले. पेट्रोल पंपचालकाचा थकीत न भरल्याने स्वारगेट येथील एस टी महामंडळाच्या कार्यालयाबाहेर एस टीच्या लांबचलांब रांगा पाहायला मिळत आहे.

10:18 October 12

सोनिया गांधींचे समर्थन आहे का? मल्किर्जुन खरगे यांनी दिली माहिती

काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणुकीत सोनिया गांधींच्या समर्थनाच्या अफवा मल्लिकार्जुन खरगे यांनी फेटाळून लावल्या आहेत.

09:38 October 12

ईडीने छाप्यातून जप्त केले ४ कोटी रुपये

अंमलबजावणी संचालनालयाने काल छत्तीसगडमधील काही वरिष्ठ अधिकारी, व्यावसायिकांच्या आवारात छापे टाकून ४ कोटी रुपये रोख जप्त केले आहेत. बेहिशेबी दागिने आणि सोनेही जप्त करण्यात आले आहे. काही वरिष्ठ आयएएस अधिकार्‍यांच्या आवारातून आक्षेपार्ह कागदपत्रे जप्त केलेली आहेत..

08:26 October 12

मुंबई महापालिकेतील बालवाडी शिक्षिका, मदतनीस यांना दिवाळीपूर्वी वाढीव मानधन

मुंबई महापालिकेच्या अखत्यारीत येणाऱ्या बालवाडी शिक्षिका व मदतनीस यांना वाढीव मानधन देण्याबाबतचा ठराव मंजूर झालेला असून त्याची संपूर्ण थकबाकीसह वाढीव मानधन दिवाळीपूर्वी देण्याबाबत महापालिकेच्यावतीने मान्यता देण्यात आली. त्याचप्रमाणे बोनसबाबत आयुक्त यांच्यासोबत चर्चा करुन योग्य तो तोडगा काढण्याबाबत आश्वासन देण्यात आले व याबाबत संबंधितांची बैठक आयोजित करून निर्णय घेण्याबाबत सहमती दर्शविली अशी माहिती म्युनिसिपल मजदूर युनियनचे अरुण नाईक यांनी दिली.

08:22 October 12

लिफ्ट पडून जखमी झालेल्या 74 वर्षीय ज्येष्ठ नागरिकाचे निधन

2 ऑक्टोबर रोजी बोरिवली येथील गृहनिर्माण वसाहतीत लिफ्ट पडून जखमी झालेल्या 74 वर्षीय ज्येष्ठ नागरिकाचे स्थानिक रुग्णालयात निधन झाले. निष्काळजीपणाने मृत्यू झाला का, याची चौकशी सुरू आहे.

08:04 October 12

चित्रदुर्गातील चल्लाकेरे टाऊन येथून राहुल गांधींची भारत जोडो यात्रा पुन्हा सुरू

काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी कर्नाटकातील चित्रदुर्गातील चल्लाकेरे टाऊन येथून 'भारत जोडो यात्रा' पुन्हा सुरू केली. कन्नियाकुमारी येथून 7 सप्टेंबर रोजी सुरू झालेल्या यात्रेने आतापर्यंत 905 किमी अंतर कापले आहे. एकूण 12 राज्यांतून यात्रा जम्मू आणि काश्मीरमध्ये संपेल.

07:57 October 12

पालघर मॉब लिंचिंग प्रकरणातील केस सीबीआयकडे देणे चुकीचे

पालघर मॉब लिंचिंग प्रकरणातील केस सीबीआयकडे देणे चुकीचे आहे. सुशांत सिंह प्रकरण, बिहार निवडणूक, गिरीश महाजन प्रकरण या सर्व प्रकरणांची सीबीआय चौकशी प्रलंबित आहे. केंद्राला खटले प्रलंबित ठेवावे असतातत तेव्हाच सीबीआयचा सहभाग होतो, असे महाराष्ट्र काँग्रेसचे प्रमुख नाना पटोले यांनी म्हटले आहे.

07:55 October 12

बेस्टची प्रवाशांसाठी दिवाळी भेट, ९ रुपयात ५ वेळा प्रवास करा

मुंबई - आर्थिक अडचणीत असलेल्या बेस्ट कडून प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी नवनवीन योजना आणल्या जात आहे. त्याला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याने बेस्टने दिवाळीसाठी विशेष योजना जाहीर केली आहे. अवघ्या ९ रुपयांत ५ वेळा प्रवास करता येईल, अशी सुपर सेव्हर योजना जाहीर केली आहे. बेस्टच्या चलो अॅपचा प्रथमच वापर करणाऱ्यां प्रवाशांना त्याचा फायदा घेता येणार असल्याचे बेस्ट उपक्रमाकडून सांगण्यात आले आहे

07:12 October 12

तरुण रस्त्यावर तलवारी घेऊन नाचले, गुन्हा दाखल

तरुण रस्त्यावर तलवारी घेऊन नाचताना दिसले. सुमारे 20-25 लोक चाकूसह धारदार शस्त्रे वापरून नाचत होते. शस्त्रास्त्र कायद्यांतर्गत एफआयआर नोंदवला. 18 अद्याप ताब्यात घेतले आहे. त्यापैकी 13 अल्पवयीन आहेत. पुढील तपास सुरू असल्याचे डीसीपी दक्षिण पी कृष्णकांत यांनी म्हटले आहे.

07:10 October 12

सीएसएमटी आणि बीएमसी हेरिटेज वास्तू गुलाबी रंगाने उजळली

आंतरराष्ट्रीय बालिका दिनानिमित्त सीएसएमटी आणि बीएमसी हेरिटेज वास्तू गुलाबी रंगाने उजळली.

07:09 October 12

मुसळधार पावसामुळे रस्ता वाहून गेला

कर्नाटकातील कोप्पल जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे रस्ता वाहून गेला.

06:22 October 12

Maharashtra Breaking news कवी कुमार विश्वास आणि भाजप नेते तजिंदर पीएस बग्गा यांच्यावरील एफआयआर रद्द

मुंबई शिवसेनेतील शिंदे गट व उद्धव ठाकरे गटातील वाद सातत्याने उफाळून येत आहे. निवडणूक आयोगाने चिन्ह व नावे दिल्यानंतर दोन्ही गटातील नेते एकमेकाविरोधात टीका करत आहे. ( Maharashtra breaking news, etv bharat live update news )

Last Updated :Oct 12, 2022, 7:32 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.