महाराष्ट्र एटीएसचे पथक दिल्लीत दाखल, तर जान मोहम्मद शेखच्या कुटुंबासह रेल्वे तिकीट काढून देणाऱ्याची सुटका!

author img

By

Published : Sep 16, 2021, 7:21 PM IST

जान मोहम्मद शेख
जान मोहम्मद शेख ()

जान मोहम्मद शेख मुंबईत वास्तव्याला असून त्याने मुंबईची रेकी केली होती. त्यामुळे एटीएसने त्यांच्या पत्नीसह मुलीला आणि रेल्वेचे तिकीट काढून देणारा असगर शेखला ताब्यात घेतले होते. मात्र, चौकशीनंतर त्यांना सोडून देण्यात आल्याची माहिती मिळत आहे. तसेच आज संशयित दहशतवादी जान मोहम्मद शेख यांच्या चौकशीसाठी महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाची टीम दिल्लीत दाखल झाली आहे.

मुंबई - डॉन दाऊद इब्राहीम याच्या इशाऱ्यावर मुंबईसह देशभरात सणासुदीतील घातपात घडवण्याचा डाव दिल्ली पोलिसांनी उधळून लावलेला आहे. पोलिसांनी सहा दहशतवाद्यांना अटक केली आहे. यातील एक दहशतवादी जान मोहम्मद शेख मुंबईत वास्तव्याला असून त्याने मुंबईची रेकी केली होती. त्यामुळे एटीएसने त्यांच्या पत्नीसह मुलीला आणि रेल्वेचे तिकीट काढून देणारा असगर शेखला ताब्यात घेतले होते. मात्र, चौकशीनंतर त्यांना सोडून देण्यात आल्याची माहिती मिळत आहे. तसेच आज संशयित दहशतवादी जान मोहम्मद शेख यांच्या चौकशीसाठी महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाची टीम दिल्लीत दाखल झाली आहे.



एटीएसचे पथक दिल्लीत

दिल्ली पोलिसांच्या ताब्यात असलेला संशयित दहशतवादी जान मोहम्मद शेख यांच्या चौकशीसाठी महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाची टीम दिल्लीत दाखल झाली आहे. जान मोहम्मद याच्यावर आयएसआय एजंटच्या आणि डॉन दाऊद इब्राहीम यांच्या संपर्कात असल्याचा आरोप असल्याने एटीएस त्याची चौकशी करणार आहे. याशिवाय जान मोहम्मद मुंबईत वास्तव्याला असल्याने मुंबईतील काही संवेदनशील परिसराची त्याने रेकी केली आहे. यामुळे मुंबईच्या सुरक्षेसाठी संशयित दहशतवादी जान मोहम्मद शेख यांची सखोल चौकशी करण्यात येणार आहे. त्यानंतरच या घटनेच्या मूळापर्यंत पोहचता येणार असल्याची माहिती सूत्राने दिली आहे.

कोण आहे जान मोहम्मद शेख ?

धारावीच्या एमजी रोडवरील सोशल नगरात मदिना मश्जिदीच्या पाठीमागे गेल्या काही वर्षांपासून जान मोहम्मद शेख उर्फ समीर कालिया राहत होता. हा काही वर्षांपासून मुंबईत टॅक्सी चालवत होता. अत्यंत चिंचोळ्या गल्लीत राहणार्‍या त्याच्या कुटुंबाचा अतिरेकी कारवायांशी संबंध अद्याप आढळला नसला तरी अत्यंत गुप्तपणे याच घरातून जान मोहम्मद शेख अतिरेक्यांसाठी स्लीपर सेल चालवत असल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. अडरवर्ल्डशी आणि खास करून दाऊद टोळीशी त्याचा सतत संपर्क असे. अधूनमधून तो गावी जाण्याचा बहाणा करून गायब व्हायचा. धारावीत तो राहतो. त्या भागात त्याचा कुणालाही त्रास नसल्याने त्याच्यावर कधी कुणी संशय घेतला नाही. मात्र, दिल्ली पोलिसांनी त्याला अटक केल्यानंतर जान मोहम्मद शेख या संशयित दहशतवाद्याचे पितळ उघडे पडले आहे.

रेल्वे तिकीट काढून देणाऱ्याची सुटका!

मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी रात्रभर जान मोहम्मद शेखची पत्नी रुखसार जान मोहम्मद, मुलगी आफरीन जान यांना एटीएसने ताब्यात घेतले होते. जान मोहम्मद शेखला रेल्वेचे तिकीट काढून देणारा असगर शेखला धारावीच्या एमजी रोडवरील मिलन नगरमधून चौकशीसाठी ताब्यात घेतले. मात्र, जान मोहम्मद शेखच्या कुटुंबासह त्याचीही बुधवारी सकाळी सुटका झाली. कालियाचा जवळचा मित्र सुनील बटला याला मात्र एटीएसने अजूनही सोडले नसल्याची माहिती आहे. तसेच प्राप्त माहितीनुसार असगर शेखने एटीएसच्या चौकशीत सांगितले, मी जान मोहम्मद शेख याला ओळखत नाही. त्याला रेल्वेची तिकीट हवी होती. म्हणून तो माझ्याकडे ग्राहक म्हणून आलेला होता. त्याला मी आरक्षित तिकीट काढून दिली होती.

हेही वाचा - परमबीर सिंह यांना उच्च न्यायालयाचा दणका; चौकशीविरोधातली याचिका फेटाळली

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.