ETV Bharat / city

नांदेड दक्षिणमध्ये सर्वाधिक तर सर्वात कमी चिपळूणमध्ये उमेदवार

author img

By

Published : Oct 7, 2019, 8:12 PM IST

विधानसभा निवडणुकीतून उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या अंतिम मुदती संपली असून लढतींचे चित्र स्पष्ट झालंय. चिपळूण मतदार संघात सर्वात कमी ३ तर नांदेड दक्षिण मतदारसंघात सर्वाधिक ३८ उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहेत.

http://10.10.50.85//maharashtra/07-October-2019/mh-mum-ec-final-nominations2-mumbai-7204684_07102019194752_0710f_1570457872_480.jpg


मुंबई - उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या अंतिम मुदतीनंतर आता राज्यातील विधानसभा निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले आहे. चिपळूण मतदार संघात सर्वात कमी ३ तर नांदेड दक्षिण मतदारसंघात सर्वाधिक ३८ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत, असे अतिरिक्त निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

आज उमेदवारी अर्ज माघारी घेण्याची मुदत दुपारी ३ वाजता होती. या मुदतीत राज्यातील विविध मतदारसंघातून अनेक उमेदवारांनी आपले अर्ज माघारी घेतल्याने आता २८८ जागांसाठी सुमारे ३ हजार पेक्षा जास्त उमेदवार रिंगणात आहेत. सर्वाधिक ३८ उमेदवार हे नांदेड दक्षिण मतदार संघातून रिंगणात आहेत तर सर्वांत कमी ३ उमेदवार हे चिपळूण मतदार संघात आहेत. अकोले, शहादा,बोरीवली, माहिम आणि बांद्रा मतदार संघात प्रत्येकी ४ उमेदवार रिंगणात आहेत. नांदेड जिल्ह्यातील भोकर मतदार संघात एकूण ९१ उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. मात्र आज ९४ उमेदवारांनी अर्ज माघारी घेतल्याने आता येथे ७ उमेदवार रिंगणात आहेत. १५ उमेदवार असतील त्या ठिकाणी १ तर ३५ उमेदवार असलेल्या ठिकाणी २ मतदान यंत्रे उपलब्ध केली जाणार आहेत. त्यापेक्षा जास्त उमेदवार असलेल्या ठिकाणी ३ मतदान यंत्रे लावण्यात येणार आहे.त्यामध्ये जालना नांदेड आणि औरंगाबाद ( पूर्व) मतदार संघाचा समावेश आहे.

Intro:Body:mh_mum_ec_final_nominations2_mumbai_7204684

नांदेड दक्षिणमध्ये सर्वाधिक तर सर्वात कमी चिपळूण मध्ये उमेदवार

मुंबई :  उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या अंतिम मुदतीनंतर आता राज्यातील विधानसभा निवडणूकीचे चित्र स्पष्ट झाले आहे. चिपळूण मतदार संघात सर्वात कमी ३ तर नांदेड दक्षिण मतदारसंघात सर्वाधिक ३८ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत असे अतिरिक्त निवडणुक अधिकारी दिलीप शिंदे यांनी पत्रकार परीषदेत सांगितले.

आज उमेदवारी अर्ज माघारी घेण्याची मुदत दुपारी ३ वाजता होती. या मुदतीत राज्यातील विविध मतदारसंघातून अनेक उमेदवारांनी आपले अर्ज माघारी घेतल्याने आता २८८ जागांसाठी सुमारे ३ हजार पेक्षा जास्त उमेदवार रिंगणात आहेत. सर्वाधिक ३८ उमेदवार हे नांदेड दक्षिण मतदार संघातून रिंगणात आहेत तर सर्वांत कमी ३ उमेदवार हे चिपळूण मतदार संघात आहेत.अकोले, शहादा,बोरीवली, माहिम आणि बांद्रा मतदार संघात प्रत्येकी ४ उमेदवार रिंगणात आहेत.नांदेड जिल्ह्यातील भोकर मतदार संघात एकूण ९१ उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते.मात्र आज ९४ उमेदवारांनी अर्ज माघारी घेतल्याने आता येथे ७ उमेदवार रिंगणात आहेत.१५ उमेदवार असतील त्या ठिकाणी १ तर ३५ उमेदवार असलेल्या ठिकाणी २ मतदान यंत्रे उपलब्ध केली जाणार आहेत. त्यापेक्षा जास्त उमेदवार असलेल्या ठिकाणी ३ मतदान यंत्रे लावण्यात येणार आहे.त्यामध्ये जालना नांदेड आणि औरंगाबाद ( पूर्व) मतदार संघाचा समावेश आहे.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.