ETV Bharat / city

Sachin Waze NIA UPDATE : वाझेची कोठडी ९ एप्रिलपर्यंत वाढवली, देशमुखांनी २ कोटी मागितल्याचा वाझेंचा आरोप

author img

By

Published : Apr 7, 2021, 10:29 AM IST

Updated : Apr 7, 2021, 10:37 PM IST

LIVE UPDATE : वाझे प्रकरण; परमबीर सिंग NIA कार्यालयात दाखल
LIVE UPDATE : वाझे प्रकरण; परमबीर सिंग NIA कार्यालयात दाखल

22:21 April 07

एनआयएकडून प्रदीप शर्मा यांची साडेआठ तास चौकशी

मुकेश अंबानी यांच्या ॲन्टिलिया इमारतीबाहेर सापडलेल्या स्कॉर्पिओ गाडीतील स्फोटकांच्या संदर्भात सचिन वाझे या निलंबित पोलीस अधिकाऱ्याला अटक करण्यात आली आहे. त्यानंतर या संदर्भात तत्कालीन मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांची तब्बल 3 तास चौकशी करण्यात आली होती. दरम्यान, एनआयएकडून एन्काऊंटर स्पेशालिस्ट म्हणून एकेकाळी मुंबईत पोलीस खात्यात नावाजलेल्या प्रदीप शर्मा या माजी पोलीस अधिकाऱ्याची सुद्धा चौकशी करण्यात आली आहे. एनआयएने शर्मा यांची साडेआठ तास चौकशी केली.

19:58 April 07

सचिन वाझेने केलेल्या आरोपांशी माझा संबंध नाही, मी नार्को टेस्ट करायलाही तयार - अनिल परब

सचिन वाझे एनआयएच्या ताब्यात आहे. एनआयएच्या चौकशीदरम्यान सचिन वाझे यानी एक पत्र लिहल आहे. त्या पत्रात परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. मात्र सचिन वाझे याने पत्रातून केलेल्या आरोपांशी आपला काहीही संबंध नसून, माझी आणि महाविकास आघाडी सरकारची नाहक बदनामी करण्यासाठी भारतीय जनता पक्षाचा कडून हे षड्यंत्र केले जात आहे अस स्पष्टीकरण अनिल परब यांच्याकडून करण्यात आलय. बाळासाहेब ठाकरे आणि आपल्या दोन्ही मुलींच्या शपथ घेऊन त्यांनी आरोपांचे खंडन केले.

19:48 April 07

राज्य सरकार आणि अनिल देशमुख यांना सर्वोच्च न्यायालयात दिलासा मिळेल का?

कायदेतज्ञ अ‌ॅड. नितीन सातपुते यांच्यामते मुंबई उच्च न्यायालयाने दिलेला निकाल सर्वोच्च न्यायालयात टिकणार नाही, तसेच गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या विरोधात थेट पोलिसात गुन्हा दाखल नव्हता. त्यामुळे न्यायालयाकडून सर्वात आधी स्थानिक तपास संस्थेकडे हा तपास देण्याची गरज होती. मात्र न्यायालयाने तसे न करता, यामध्ये थेट सीबीआयला चौकशीचे निर्देश दिल्याने यापुढे येणाऱ्या अशा प्रकारच्या याचिकेत थेट सीबीआय चौकशीची मागणी करता येईल, असं मत त्यांनी व्यक्त केले. तसेच उच्च न्यायालयाने जवळच आपलं निरीक्षण नोंदवले. त्यावेळेस तात्काळ अनिल देशमुख यांनी सर्वोच्च न्यायालयात यासंबंधी दाद मागणे आवश्यक होते. थेट सीबीआयला अशा प्रकारचे चौकशीचे आदेश देण्याचे भारतीय दंड प्रक्रियेत तरतूद नसल्याचे मत अ‌ॅड. नितीन सातपुते यांनी व्यक्त केले आहे.

19:47 April 07

या कारणामुळे एनआयएकडून प्रदीप शर्मा यांची चौकशी

राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून अटक आरोपी विनायक शिंदे , सचिन वाझें व मनसुख हिरेन या तिघांचे मोबाईल लोकेशन पडताळले असता यामध्ये या तिघांचेही मोबाईल लोकेशन हे अंधेरी चकाला येथे आढळून आले होते. यानंतर याच परिसरामध्ये प्रदीप शर्मा या माजी पोलीस अधिकाऱ्याचे घर असल्यामुळे त्यास राष्ट्रीय तपास यंत्रणेने चौकशीसाठी बोलावले होते. राष्ट्रीय तपास यंत्रणेला संशय आहे की, प्रदीप शर्मा, सचिन वाझे, विनायक शिंदे व मनसुख हिरेन या चौघांमध्ये एक मीटिंग पार पडलेली होती. या मिटिंगमध्ये कुठल्या-कुठल्या गोष्टींबद्दल चर्चा करण्यात आली होती, याचा तपास केला जात आहे.

17:30 April 07

पुन्हा पोलीस दलात घेण्यासाठी २ कोटी मागितले, सचिन वाझेंचा अनिल देशमुख यांच्यावर आरोप

सचिन वाझेचं कथित पत्र व्हायरल झाले आहे. या पत्राच्या माध्यमातून सचिन वाझेकडून माजी गृहमंत्री अनिल देशमुख व अनिल परब यांच्यावर आरोप करण्यात आले आहेत. पोलीस दलात पुन्हा घेण्यासाठी अनिल देशमुख यांनी दोन कोटी रुपये मागितल्याचा आरोप करण्यात आला असून बीएमसीतील खासगी कंत्राटदारांकडून पैसे वसूली करण्याचा अनिल परब यांच्याकडून दबाव असल्याचे म्हटले होते.  

16:40 April 07

सचिन वाझेच्या अँजियोप्लास्टीसाठी कोर्टात अर्ज

सुधर्म वाझे प्रतिक्रिया देताना

सचिन वाझेच्या अँजियोप्लास्टीसाठी कोर्टात अर्ज दिला आहे. आम्हाला तपास यंत्रणा तसेच न्यायालयावर विश्वास आहे. -सुधर्म वाझे 

15:48 April 07

अनिल देशमुखांनी बार आणि पब्सकडून वसुलीसंदर्भात काहीही विचारले नाही, एसीपी संजय पाटील आणि डीसीपी राजू भुजबळ यांचा जबाब

समाजसेवा शाखेचे एसीपी संजय पाटील यांचा जबाब नोंदवण्यात आलाय. जबाबाची कॉपी ई टीव्ही भारतच्या हाती, 22 मार्चला हा जबाब नोंदवण्यात आला आहे. एसीपी संजय पाटील आणि डीसीपी राजू भुजबळ यांचे नाव परमबीर यांच्या लेटर बॉम्ब मध्ये आले होतं. एसीपी संजय पाटील 1 तारखेला माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना त्यांच्या शासकीय निवासस्थानी भेटले होते. डिसीपी राजू भुजबळ हे 4 तारखेला माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना भेटले होते.

अनिल देशमुखांनी दोघांनाही बार आणि पब्सकडून वसुलीसंदर्भात काहीही विचारले नसल्याचा दोन्ही अधिकाऱ्यांचा जबाब. एसीपी संजय पाटील यांनी त्यांच्या जबाबात परमबीर यांच्यासोबत झालेले चॅटिंग त्याचेच असल्याचे सांगितलंय. सचिन वाझे आणि संजय पाटील यांची पोलीस आयुक्तालयात भेट झाली होती त्यावेळी वाझेंनी वसुलीचा विषय काढून गृहमंत्र्यांच नाव घेतलं. मात्र माजी गृहमंत्री आणि सचिन वाझे भेटले होते का, याबद्दल मला माहिती नाही असे संजय पाटील यांनी त्यांच्या जबाबात म्हटलंय.

15:46 April 07

सचिन वाझेची एनआयए कस्टडी ९ एप्रिलपर्यंत वाढवली.

मुंबई - सचिन वाझेची एनआयए कस्टडी ९ एप्रिलपर्यंत वाढवली. साचिन वाझेसाठी एनआयएने चार दिवसांची पोलीस कोठडी वाढवून मागितली होती. UAPA नुसार 30 दिवसांची कोठडी पूर्ण करू देण्याची विनंती एएनआयकडून एएसजी अनिल सिंह यांनी कोर्टाला विनंती केली होती.

मनसूख हिरेन हा मुकेश अंबानी यांच्या अँटालिया बाहेर सापडलेल्या स्फोटकांच्या कटात सामील होता. त्यातच त्याचा जीव गेला, एनआयएचा कोर्टात दावा. 
सचिन वाझे यांच्याकडनं 36 लाख रूपयांची रोकड हस्तगत करण्यात आली आहे. हा पैसा कठून आला, तो कशासाठी वापरायचा होता याची चौकशी होणं आवश्यक. 'शेवटी यामागे काहीतरी मोठा आर्थिक हेतू हेता हे स्पष्ट आहे', मग तो काय होता?, याचीही चौकशी होणं आवश्यक असल्याचा दावा एनआयएने कार्टात केला होता.

15:23 April 07

एनआयएची टीम सचिन वाझेला घेऊन मुंबईतील विशेष न्यायालयात हजर

एनआयएची टीम सचिन वाझेला घेऊन मुंबईतील विशेष न्यायालयात हजर

मुंबई - एनआयएची टीम सचिन वाझेला घेऊन मुंबईतील विशेष न्यायालयात हजर. आज कोर्ट एनआयएच्या कोठडीबाबत करणार सुनावणी. एनआयए तपासातून नविन मिळालेल्या माहितीच्या आधारे कोठडी वाढविण्याची मागणी कोर्टाकडे करण्याची शक्यता. 

13:24 April 07

परमबीर सिंग एनआयए कार्यालयातून बाहेर आले

मुंबई - एनआयए कार्यालयात चौकशीसाठी गेलेले माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग कार्यालयातून बाहेर आले आहेत. सुमारे तीन तास एनआयए कार्यालयात त्यांची चौकशी सुरू होती.

13:12 April 07

प्रदीप शर्मा एनआयए कार्यालयात दाखल

मुंबई - एन्काऊंटर स्पेशलिस्ट अशी ओळख असलेल्या प्रदीप शर्मा यांना एनआयएने चौकशीसाठी बोलवले आहे. प्रदीप शर्मा एनआयए कार्यालयात दाखल झाले आहेत. शर्मा यांच्या चौकशीतून मनसुख हिरेन प्रकरणाच्या तपासा संदर्भात महत्त्वाचे पुरावे मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या प्रकरणी सचिन वाझे आणि विनायक शिंदे यांची ज्या 14 सिमकार्डबाबत चौकशी केली जात आहे. त्यातील एक सिमकार्ड हे अंधेरीत बंद केल्याचे तपासात समोर आले आहे. 2 मार्चला सचिन वाझे आणि विनायक शिंदेंनी पश्चिम उपनगरात एक मिटिंग केली होती. असं सांगितलं जातं की, हे दोघं शर्मांना भेटायला आले होते. 3 मार्च रोजी सचिन वाझेंनी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांची भेट घेतली होती. या भेटीनंतर वाझे पुन्हा अंधेरीला गेले होते. ही भेट देखील शर्मांसोबत होती असं बोललं जातं आहे. 'जैश उल हिंद' या संघटनेनं या गुन्ह्यांची जबाबदारी स्वीकारली आणि काही तासांत मागेही घेतली. या मागेही शर्मांचा हात असल्याचं बोललं जातं. वाझेंच्या अटकेनंतर शर्मा ATS कार्यालयातही गेले होते. तसेच त्यांनी परमबीर सिंग यांचीही भेट घेतल्यची सूञांची माहिती आहे. त्यामुळे या गुन्ह्यात शर्मांचा काही सहभाग आहे का हे तपासण्यासाठी NIA नं शर्मांना बोलावलं असल्याचे NIA सूञांकडून कळते आहे. दरम्यान, एन्काऊंटर स्पेशालिस्ट अशी ओळख असलेल्या प्रदीप शर्मांना 2019 च्या निवडणुकीत शिवसेनेने उमेदवारी दिली होती. 

12:23 April 07

'एनआयए'ने सचिन वाझेला कळवा रेल्वेस्टेशनवर आणून घेतली महत्त्वाची माहिती

ठाणे : राष्ट्रीय तपास यंत्रणेची (एनआयए) टीम काल रात्री अचानक सचिन वाझेला घेऊन मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरून थेट ठाण्यातील कळवा रेल्वे स्थानकाजवळ पोहोचली. येथे बराच वेळ एनआयएच्या टीमने सचिन वाझेची चौकशी केली. कळवा पश्चिम रेल्वे स्थानकावरून बाहेर पडणाऱ्या मार्गावर एनआयएच्या टीमने सचिन वाझेला चालायला लावले. तर एनआयएची टीम येण्याआधीच स्थानिक ठाणे पोलिसांनी कळवा रेल्वे स्थानकाला छावणीचे स्वरूप दिले होते. एवढेच नाही तर प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींना ही कळवा रेल्वे स्थानकापासून दूर उभे केले होते.

11:32 April 07

परमबीर सिंग, सचिन वाझेसंदर्भातील अहवाल गृहखात्याकडे

मुंबई - माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुखांवर 100 कोटींच्या वसुलीविषयी केलेल्या आरोपांसंदर्भातील अहवाल मुंबई पोलिसांकडून गृहखात्याला पाठविण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. याविषयीचा अहवाल सादर करण्याचे निर्देश गृहखात्याने मुंबई पोलिसांना दिले होते.

10:16 April 07

LIVE UPDATE : वाझे प्रकरण; परमबीर सिंग NIA कार्यालयात दाखल

परमबीर सिंग NIA कार्यालयात दाखल

मुंबई : अँटिलिया प्रकरणी तपास करत असलेल्या राष्ट्रीय तपास संस्था म्हणजेच एनआयएकडून अनेकांची चौकशी सध्या केली जात आहे. निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे सध्या एनआयएच्या कोठडीत असून बुधवारी सकाळी मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंगही एनआयएच्या कार्यालयात दाखल झाले.

चौकशीसाठी परमबीर सिंग यांची हजेरी

सकाळी ९.३० च्या दरम्यान परमबीस सिंग NIA कार्यालयात दाखल झाले. NIA ने सिंग यांना चौकशीसाठी समन्स बजावले होते. त्यानुसार सिंग चौकशीसाठी एनआयएच्या कार्यालयात हजर झाले आहेत. कार मायकल रोडवरील गाडी प्रकरणी त्यांचाी चौकशी होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते आहे.

वाझेची कोठडी आज संपणार

या प्रकरणी एनआयएच्या कोठडीत असणारे निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझेंच्या कोठडीची मुदत आज संपणार आहे. त्यामुळे आता आज त्यांना पुन्हा एनआयएकडून कोर्टासमोर हजर केले जाऊ शकते. यापूर्वी 3 एप्रिल रोजी न्यायालयाने वाझेंची एनआयए कोठडी 7 एप्रिलपर्यंत वाढविली होती.

परमबीर सिंग यांचे गृहमंत्र्यांवर आरोप

परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुखांनी सचिन वाझेंना दरमहा 100 कोटी वसुलीचे टार्गेट दिल्याचा आरोप केला होता. या आरोपानंतर देशभरात एकच खळबळ उडाली होती. दरम्यान सिंग यांच्या याचिकेनंतर मुंबई हायकोर्टाने या प्रकरणी सीबीआयला चौकशीचे आदेश दिले आहे. यानंतर अनिल देशमुखांनी गृहमंत्री पदाचा राजीनामा दिला आहे.

Last Updated :Apr 7, 2021, 10:37 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.