ETV Bharat / city

Legislative Council Election : विधान परिषदेसाठी 11 उमेदवारांचे भवितव्य पणाला

author img

By

Published : Jun 20, 2022, 5:39 PM IST

Legislative Council
विधान परिषद

विधान परिषदेच्या ( Legislative Council Election ) 10 जागांसाठी 11 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. सर्व आमदारांनी मतदान केल्याने ( All MLA voted MLC Election ) आता अकरा उमेदवारांचे भवितव्य पणाला लागले आहे.

मुंबई - विधान परिषदेच्या दहा जागांसाठी आज सकाळपासून मतदानाला ( Voting for ten seats in the Legislative Council ) सुरुवात झाली आहे. चार वाजता मतदानची वेळ संपली तेव्हा 285 आमदारांनी आपला मतदानाचा हक्क ( 285 MLAs exercised their right to vote ) बजावला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने दोन, काँग्रेसच्या वतीने दोन शिवसेनेच्या वतीने दोन, तसेच भाजपाच्या वतीने 5 उमेदवार रिंगणात आहेत.



अपक्षांवर उमेदवारांची भिस्त - विधानपरिषदेच्या निवडणुकीत गुप्त पद्धतीने मतदान करण्यात ( Voting secret ) आले. यावेळी पक्षातील आमदारांसह अपक्ष आमदारांची मते कोणाला मिळणार यावरच मोठी भिस्त आहे. अपक्ष आमदारांची जास्तीत जास्त मते ज्यांना मिळतील ते उमेदवार निवडून येणार आहेत. यामुळे अपक्ष आमदारांचा भाव चांगलाच वाढला होता. छोट्या पक्षांनी तसेच अपक्षांनी आमदारांनी सरकारला जेरीस आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, सरकारने ही त्यांचे मन वळवण्याचा प्रयत्न केला असून त्यांच्या मतदारसंघातील कामे लवकरात लवकर मार्गी लावण्याचे आश्वासन दिले आहे.

लक्ष्मण जगताप मुक्ता टिळक यांचे मतदान - भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप आणि मुक्ता टिळक हे दोघेही रुग्णालयात उपचार घेत असल्याने त्यांना रुग्णवाहिकेतून मतदानासाठी विधानभवनात आणण्यात आले. दोघांनीही आपला मतदानाचा हक्क बजावला. मात्र, या दोघांच्या मत जाणार दुसरीकडे जाणार म्हणुन दुसऱ्याच्या मदतीने मतदान केल्याचा आरोप काँग्रेसने करत मतदानावर आक्षेप घेतला.

मलिक, देशमुखांना परवानगी नाही - मतदानाचा हक्क मिळण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात गेलेल्या नवाब मलिक, तसेच अनिल देशमुख या राष्ट्रवादीच्या दोन आमदारांना मतदानापासून आजही वंचित राहावे लागले. या दोन्ही आमदारांना मतदानासाठी सर्वोच्च न्यायालयानेही अंतरिम दिलासा दिला नाही.

विजयश्री कुणाच्या गळ्यात - या निवडणुकीत महाविकास आघाडी सरकार आपले सर्व उमेदवार निवडून येतील असा दावा करीत आहे. तर, भाजपच्या वतीनेही सर्व उमेदवार निवडून येण्याचा प्रतिदावा केला जात आहे. मात्र, गुप्त मतदान झाल्याने नक्की कोणाच्या पारड्यात मते पडणार याबाबत स्पष्टता नसल्याने निकालाची उत्सुकता सर्वांनाच लागली आहे.

हेही वाचा - Sangli Family Suicide : सांगली हादरलं ! एकाच कुटुंबातील 9 जणांची आत्महत्या

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.