ETV Bharat / city

Mumbai High Court : किरीट सोमैयांकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व प्रताप सरनाईक यांच्या विरोधात जनहित याचिका दाखल

author img

By

Published : Apr 29, 2022, 3:06 PM IST

Updated : Apr 29, 2022, 5:05 PM IST

मुंबई उच्च न्यायालय
मुंबई उच्च न्यायालय

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि प्रताप सरनाईक ( Chief Minister Uddhav Thackeray and Pratap Saranaik ) यांच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका ( Public interest Petition in Mumbai High Court ) दाखल करण्यात आली आहे. याचिकेत प्रताप सरनाईक यांच्या अनधिकृत बांधकामांना अधिकृत केल्याबद्दल कारवाई करण्यात यावी, अशी मागणी किरीट सोमैया ( BJP Kirit Somaiya ) यांनी केली आहे.

मुंबई - भाजपा नेते किरीट सोमैया यांच्याकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि प्रताप सरनाईक ( Chief Minister Uddhav Thackeray and Pratap Saranaik ) यांच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका ( Public interest Petition in Mumbai High Court ) दाखल करण्यात आली आहे. याचिकेत प्रताप सरनाईक यांच्या अनधिकृत बांधकामांना अधिकृत केल्याबद्दल कारवाई करण्यात यावी, अशी मागणी किरीट सोमैया ( BJP Kirit Somaiya ) यांनी केली आहे.

प्रतिक्रिया देताना भाजपा नेते चंद्रकांत पाटील

प्रताप सरनाईक यांना उद्धव ठाकरे यांनी 18 कोटींचे बक्षीस दिले आहे. लोकायुक्तांनी स्वत: त्याची दखल घेतली आहे. तरीही उद्धव ठाकरे सरकार हा दंड माफ करते. हे चालणार नाही. ही ठोकशाही आहे. ही ठोकशाही माफिया सेनेपुरती मर्यादित राहिली आहे. आम्ही विरोधात आज कोर्टात जनहित याचिका दाखल केली आहे. सरकारला 18 कोटी रुपये वसूल करावेच लागणार आहे. बेकायदेशीर बांधकामाप्रकरणी कारवाई झालीच पाहिजे, असे सोमैया म्हणाले.

शिवसेना नेते तथा आमदार प्रताप सरनाईक यांच्या विहंग गार्डनच्या अनधिकृत 5 मजले बांधकाम आणि राज्य सरकारने त्यांच्या कंपनीला दंड ठोठावले. 18 कोटी रुपयांचा दंड माफ केल्याप्रकरणी फौजदारी कारवाई करण्यात यावी, याकरिता किरीट सोमैयांनी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे. खार पोलीस ठाण्याबाहेर झालेल्या हल्ल्याप्रकरणी किरीट सोमैया यांनी काल मुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडे यांच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करून या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची मागणी केली होती.

हेही वाचा - FIR Against Mns Activists : रुपाली पाटील-ठोंबरे यांची बदनामी केल्याप्रकरणी १६ मनसे कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल

Last Updated :Apr 29, 2022, 5:05 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.