ETV Bharat / city

Rebel MLA Tanaji Sawant : कैलास पाटील यांचा दावा साफ खोटा; बंडखोर आमदार तानाजी सावंत यांचा खुलासा

author img

By

Published : Jun 23, 2022, 7:14 PM IST

MLA Tanaji Sawant
आमदार तानाजी सावंत

बंडखोर नेते एकनाथ शिंदे ( Rebel leader Eknath Shinde ) यांनी आमदारांचे अपहरण करून सूरतला नेण्याचा प्रयत्न केला. असा, गंभीर आरोप उस्मानाबादचे आमदार कैलास पाटील ( MLA Kailas Patil ) यांनी केला होता. त्यावर बंडखोर शिंदे गटाचे आमदार तानाजी सावंत ( Rebel MLA Tanaji Sawant ) यांनी कैलास पाटील यांचा दावा खोटा असल्याचा खुलासा केला आहे.

मुंबई - बंडखोर नेते एकनाथ शिंदे ( Rebel leader Eknath Shinde ) यांनी आमदारांचे अपहरण करून सूरतला नेण्याचा प्रयत्न केला. असा, गंभीर आरोप उस्मानाबादचे आमदार कैलास पाटील ( MLA Kailas Patil ) यांनी केला होता. त्यावर बंडखोर शिंदे गटाचे आमदार तानाजी सावंत ( Rebel MLA Tanaji Sawant ) यांनी कैलास पाटील यांचा दावा खोटा असल्याचा खुलासा केला आहे. एका व्हिडीओतून सावंत यांनी भूमिका स्पष्टीकरण दिले. महाविकास आघाडी सरकारमधील प्रमुख पक्षाचे बंडखोर आमदार एकनाथ शिंदे यांनी जेवणासाठी जायचं सांगत, शिवसेनेच्या आमदारांचे अपहरण केले. पत्रकार परिषद घेऊन, संपूर्ण घडलेला प्रसंग कथन केला. यावर बंडखोर आमदार तानाजी सावंत, स्पष्टीकरण दिले.



काय म्हणाले सावंत - गुप्त मतदान झाल्यानंतर कैलास माझ्याकडे आला, तो म्हणाला नंदनवनला जायचे. आम्ही दोघे एकाच गाडीने एकनाथ शिंदे यांच्या घरी गेलो. चर्चा केली. त्यानंतर आम्ही सूरतच्या दिशेने निघालो. वाहनात तो त्याच्या मोबाईलमध्ये व्यस्त होता. गुजरातच्या चेकपोस्टवर आल्यानंतर लघुशंकेसाठी गाडी थांबवली. त्यानंतर मला चर्चा करायची असे सांगत माघारी जायचे सांगितले. भीती वाटत असल्याचे कारण यावेळी दिले. तसेच माझ्या गाडीने कैलास पाटील यांना मुंबईत सोडल्याचे सावंत यांनी स्पष्ट केले आहे. सहानुभूती मिळवण्यासाठी खोटे आरोप होत असल्याचेही सावंत यांनी सांगितले. या प्रकरणाला आता विविध फाटे फूटत असून आरोप - प्रत्यारोपचे सत्र सुरू झाले आहे.

हेही वाचा - Maharashtra Political Crisis : महाविकास आघाडी सरकार कोसळणार? पाहा तिन्ही पक्षाच्या प्रमुख नेत्यांच्या प्रतिक्रिया...

हेही वाचा - LIVE : राज्यातील राजकीय परिस्थितीवर राष्ट्रवादी काँग्रेसची महत्त्वाची बैठक, पाहा नेमकी काय आहे परिस्थिती?

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.