ETV Bharat / city

Koregaon Bhima violence : आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला आयोगासमोर जबाब नोंदवणार

author img

By

Published : Nov 18, 2021, 12:05 PM IST

Updated : Nov 18, 2021, 5:24 PM IST

भीमा कोरेगाव प्रकरणात आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला या राज्य सरकारने स्थापन केलेल्या आयोगासमोर हजर राहाणार आहेत. सह्याद्री अतिथीगृहात आयोगाचे कार्यालय असून रश्मी शुक्ला आयोगासमोर हजर राहून जबाब नोंदवणार असल्याची माहिती आहे.

Rashmi Shukla
रश्मी शुक्ला

मुंबई - भीमा कोरेगाव (Bhima koregaon) प्रकरणात आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला (Rashmi Shukla) या राज्य सरकारने स्थापन केलेल्या आयोगासमोर हजर राहाणार आहेत. सह्याद्री अतिथीगृहात आयोगाचे कार्यालय असून रश्मी शुक्ला आयोगासमोर हजर राहून जबाब नोंदवणार असल्याची माहिती आहे.

हेही वाचा : '... तर कोरेगाव-भीमा प्रकरणी चौकशीसाठी देवेंद्र फडणवीसांना देखील बोलावलं जाईल'

काय आहे प्रकरण ?

आयपीएस अधिकारी परमबीर सिंह (Parambir Singh) आणि रश्मी शुक्ला यांना समन्स बजावण्याचे आदेश कोरेगाव भीमा चौकशी आयोगाने दिले होते. आयोगाचे वकील आशिष सातपुते यांनी या संदर्भात अर्ज केला होता. कोरेगाव भीमा हिंसाचार घडला त्यावेळी परमबीर सिंह हे ADG law and order व शुक्ला या पुणे पोलीस आयुक्त होत्या.

हेही वाचा : शहरी नक्षलवाद आणि भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणी कवी वरवरा राव यांना जामीन मंजूर

भीमा कोरेगाव येथे झालेल्या हिंसाचार घटनेच्या अनुषंगाने त्यांच्याकडील इंटेलिजन्स इनपुट व इतर माहिती महत्वाची असल्याने, त्यांची साक्ष आवश्यक असल्याचे आशिष सातपुते यांनी म्हटले होते. सातपुते यांचा अर्ज मंजूर करताना आयोगाचे अध्यक्ष माजी न्यायमूर्ती जे. एन. पटेल यांनी परमबीर सिंह आणि रश्मी शुक्ला यांना समन्स जारी करण्याचे आदेश दिले होते.

हेही वाचा : समीर दाऊद वानखेडे यांचा फर्जीवाडा हळुहळू पुढे येऊ लागला, नवाब मलिकांचा पुन्हा एनसीबी अधिकाऱ्यावर निशाणा

Last Updated :Nov 18, 2021, 5:24 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.