ETV Bharat / city

NCB Seized Cocaine : आंतरराष्ट्रीय ड्रग्ज सिंडिकेटचा पर्दाफाश, एनसीबीने जप्त केले 'कोटीं'चे कोकेन

author img

By

Published : Sep 29, 2022, 6:49 PM IST

Mumbai NCB seized cocaine worth crores
मुंबई एनसीबीने जप्त केले कोटींचे कोकेन

एनसीबीने मुंबईने ब्राझीलमधून येणारे 3.20 किलो ब्लॅक कोकेन जप्त (International drug syndicate busted Mumbai) केले. तीन दिवस चाललेल्या ऑपरेशनमध्ये विविध शहरांमध्ये ड्रग वाहक आणि रिसीव्हरला पकडले (drug syndicate busted Mumbai NCB seizes cocaine) आहे.

मुंबई : एनसीबीने मुंबईने ब्राझीलमधून येणारे 3.20 किलो ब्लॅक कोकेन जप्त (International drug syndicate busted Mumbai) केले. तीन दिवस चाललेल्या ऑपरेशनमध्ये विविध शहरांमध्ये ड्रग वाहक आणि रिसीव्हरला पकडले आहे. एनसीबी-मुंबईने आंतरराष्ट्रीय ड्रग सिंडिकेटला आणखी एक धक्का दिला आहे. मुंबई विमानतळावर बोलिव्हियन महिलेकडून ब्लॅक कोकेन जप्त केले (drug syndicate busted Mumbai NCB seizes cocaine) आहे. या संबंधात गोव्यातून एका नायजेरियन नागरिकालाही अटक करण्यात आली आहे. जप्त केलेले ड्रग्ज दुर्मिळ आहे.

मुंबई एनसीबीने जप्त केले कोटींचे कोकेन


विश्वासार्ह इनपुटच्या आधारे असे लक्षात आले की, एक दक्षिण अमेरिकन नागरिक ड्रग्जच्या खेपासह विमानाने मुंबईत येणार आहे. जे ड्रग्ज पुढे मुंबई आणि जवळपासच्या राज्यांमधून विकले जाणार होते. मिळालेल्या इनपुटची बारकाईने निरीक्षण करून कारवाई करण्यात आली. त्यानंतर एक बोलिव्हियन महिला ब्राझील ते गोव्याला आदिस अबाबा आणि मुंबई येथे लेओव्हरसह प्रवास करत असल्याचे हेरले गेले.

12 पॅकेट ब्लॅक कोकेन जप्त - त्यानुसार, एनसीबी-मुंबईचे अधिकारी मुंबई विमानतळाकडे निघाले आणि बोलिव्हियन महिलेची ओळख पटवण्यासाठी पाळत ठेवली गेली. 26 सप्टेंबरला फ्लाइट लँड झाल्यानंतर थोड्याच वेळात, त्या महिलेची ओळख पटली. जी गोव्याला जाणाऱ्या कनेक्टिंग फ्लाइटमध्ये बसण्यासाठी फिरत होती. त्यानंतर, तिच्या भेटीचा उद्देश आणि तिच्या सामानातील सामग्रीबद्दल तिला नियमितपणे विचारण्यात आले, ज्यावर ती समाधानकारक उत्तर देऊ शकली नाही. परिणामी, तिच्या सामानाची सखोल झडती घेतल्यानंतर ड्रग्ज सापडले. ज्यामध्ये घट्ट पॅक केलेले 12 पॅकेट जप्त करण्यात आले. पाकिटे तपासली असता काळ्या रंगाचा पदार्थ आढळून आला. महिलेची चौकशी केल्यावर तिने कबूल केले की, हे साहित्य ब्लॅक कोकेन आहे. ज्याचे वजन एकूण 3.2 किलो आहे. तिने कबुली दिली की, ती गोव्यातील परदेशी रिसीव्हरला ती खेप पोहोचवायची (drug syndicate busted Mumbai) होती.


सापळा रचून ड्रग्जचा पुरवठा करणाऱ्याला पकडले - तात्काळ गोव्यातील संबंधित व्यक्तीची ओळख पटविण्यासाठी पाठपुरावा करण्यात आला. सखोल पाठपुरवा केल्यानंतर त्या व्यक्तीची ओळख पटली. गोव्यातील एका हॉटेलमध्ये सापळा रचण्यात आला आणि नायजेरियन व्यक्तीला पकडण्यात आले. बोलिव्हियन महिलेने उघड केलेली माहिती पकडलेल्या नायजेरियनच्या तपशिलांना पुष्टी देते. नंतर, नायजेरियन व्यक्तीने देखील आंतरराष्ट्रीय ड्रग सिंडिकेटचा भाग असल्याची कबुली दिली. हा नायजेरियन व्यक्ती ड्रग ट्रॅफिकर असून तो गोव्यात राहून विविध राज्यांतील विविध व्यापाऱ्यांना ड्रग्जचा पुरवठा करत होता. पुढील तपास सुरू (NCB seizes cocaine) आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.