ETV Bharat / city

Bhosale's ED cell increased : उद्योगपती अविनाश भोसले यांच्या ईडी कोठडीत पुन्हा वाढ

author img

By

Published : Jul 6, 2022, 5:59 PM IST

Avinash Bhosle
अविनाश भोसले

मुंबई येथील डीएचएफएल आणि येस बँक प्रकरणातील (DHFL And YES Bank Case) आरोपी उद्योगपती अविनाश भोसले (Industrialist Avinash Bhosale) यांच्या ईडी कोठडीत पुन्हा सहा दिवसाने वाढ (Industrialist Avinash Bhosale ED remand extended) करण्यात आली.

मुंबई : डीएचएफएल आणि येस बँक प्रकरणातील (DHFL And YES Bank Case) आरोपी उद्योगपती अविनाश भोसले यांच्या ईडी कोठडीत पुन्हा सहा दिवसाने वाढ (Industrialist Avinash Bhosale ED remand extended)करण्यात आली. या प्रकरणात ईडीने त्यांना मागील महिन्यात अटक केली होती. त्यावेळी 7 दिवसांची ईडी कोठडी देण्यात आली होती. पुन्हा न्यायालयासमोर हजर केले असता, ईडी अधिकाऱ्यांकडून कोठडीत वाढ करण्याची मागणी करण्यात आली. त्यामुळे भोसले(Avinash Bhosale) यांच्या कोठडीत 12 जुलै पर्यंत वाढ करण्यात आली आहे.


डीएचएफएल आणि येस बँक प्रकरणातील अविनाश भोसले यांच्या विरोधात सीबीआयने गुन्हा दाखल करत अटक केली होती. त्यानंतर या प्रकरणात ईडीने अविनाश भोसले यांचा ताबा घेतला होता. त्यानंतर त्यांना मुंबई सत्र न्यायालयातील विशेष PMLA कोर्टात हजर करण्यात आले. दरण्यान ईडीकडून कोठडीची मागणी करण्यात आली होती.





नेमकं प्रकरण काय : पुण्याचे बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले यांना काल गुरुवारी रात्री CBI कडून अटक करण्यात आली. DHFL प्रकरणात त्यांच्याविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला होता. यातूनच त्यांच्याविरोधात ही कारवाई करण्यात आली. गेल्या वर्षी जून 2021 मध्ये अविनाश भोसले आणि त्यांच्या कुटुंबीयातील सदस्यांच्या नावावर असलेली तब्बल 40 कोटी 34 लाख रुपयांची संपत्ती ईडीकडून जप्त करण्यात आली होती. विदेशी मुद्रा प्रबंधन अधिनियमांतर्गत ही कारवाई करण्यात आली होती. DHFL घोटाळा प्रकरणानंतर त्यांना सीबीआयकडून अटक करण्यात आली आहे. अविनाश भोसले आज कोट्यवधी रुपयांच्या एबीआयएल ग्रुपचे मालक आहेत. रिअल इस्टेट किंग अशी त्यांची पुण्यामध्ये ओळख आहे.


हेही वाचा : राहुल गांधींविरोधात फेक न्यूज चालवल्याचा आरोप.. पत्रकार रोहित रंजनला नोएडा पोलिसांनी केली अटक

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.