ETV Bharat / city

Hunar Haat Mumbai : मुंबईत केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर आणि देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते 'हुनर हाट'चे उद्घाटन

author img

By

Published : Apr 17, 2022, 7:25 PM IST

Updated : Apr 17, 2022, 7:33 PM IST

खाद्यसंस्कृतीचा दर्शन हाट प्रदर्शनात होत आहे. मुंबईकरांनी येथे येऊन खाद्यसंस्कृतीचे दर्शन घ्यावे, असे आवाहन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. तसेच अशा कार्यक्रमामुळे मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होत आहे. तसेच जगभरातील बाजार पेठेत भारताने तयार केलेल्या वस्तू पोचत असल्याचे मत फडणवीस यांनी व्यक्त केले.

उद्घाटन प्रसंगी मान्यवर
उद्घाटन प्रसंगी मान्यवर

मुंबई - बिकेसी येथील एमएमआरडीएच्या मैदानात हुनर हाट भरवण्यात आले आहे. ३१ राज्यातील 4000 पेक्षा अधिक कारागीर एकत्र आले असून आपल्या विविध राज्यातील हँडक्राफ्ट वस्तू, खाद्यसंस्कृतीचा दर्शन हाट प्रदर्शनात होत आहे. मुंबईकरांनी येथे येऊन खाद्यसंस्कृतीचे दर्शन घ्यावे, असे आवाहन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. तसेच अशा कार्यक्रमामुळे मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होत आहे. तसेच जगभरातील बाजार पेठेत भारताने तयार केलेल्या वस्तू पोचत असल्याचे मत फडणवीस यांनी व्यक्त केले. १७ तारखेपासून ते २७ तारखेपर्यंत हे हुनर हाट सुरू राहील. केंद्रीय अल्पसंख्याक मंत्रालयातर्फे हे ४० वे हुनर हाट आहे. केंद्रीय मंत्री अनुराग सिंह ठाकूर यांच्या हस्ते या महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले.

प्रतिक्रिया देताना विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस
भारतीय खाद्यपदार्थाचा जगभर डंका : आपल्या देशाला मोठी खाद्यसंस्कृती आहे. तसेच मोठा औद्योगिक वारसाही आहे. अशा कार्यक्रमामुळे या दोन्ही गोष्टीत मोठी भर पडणार आहे. त्यामुळेच केंद्रीय मंत्रालयाकडून अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. खाद्यपदार्थांमध्ये भारतीय खाद्यपदापर्थाला मोठी मागणी असते. भारत हा मसाल्याचाही मोठा निर्यातदार आहे. भारतातले मसाले हे जगभरात विकले जातात. भारतीय जेवणाची सर जगातील कोणत्याही जेवणाला येत नाही. अशा उपक्रमाद्वारे या खाद्यसंस्कृतीला मोठा हातभार लागेल. अशा उपक्रमांवर भर द्यायला हवा, असे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.

हेही वाचा - Devendra Fadnavis : संजय राऊत हे फ्रस्ट्रेटेड व्यक्ती, त्यांना कामं नाहीत, आम्हाला कामं आहेत : देवेंद्र फडणवीस

Last Updated : Apr 17, 2022, 7:33 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.