ETV Bharat / city

UP Assembly Election 2022 : आज पहिल्या टप्प्यात 11 जिल्ह्यांतील 58 जागांसाठी मतदान; पाच वाजेपर्यंत 57.79 टक्के मतदान

author img

By

Published : Feb 10, 2022, 7:16 AM IST

Updated : Feb 10, 2022, 6:02 PM IST

UP Assembly Election 2022
UP Assembly Election 2022

18:01 February 10

ईव्हीएमचा व्हिडिओ व्हायरल केल्याप्रकरणी उत्तर प्रदेशातील आग्रा येथे मतदान केंद्राच्या एजंटवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डीएमने एजंटविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

17:59 February 10

सायंकाळी ५ वाजेपर्यंत संपूर्ण राज्यात 57.79 टक्के मतदान झाले आहे. आतापर्यंतच्या मतदानात शामली आघाडीवर आहे. दुसरीकडे, गाझियाबादसह नोएडा देखील मतदानात संयुक्तपणे पिछाडीवर आहे.

12:41 February 10

ईव्हीएम मशीनमध्ये बिघाड

  • शामली विधानसभा 10, बूथ नंबर 4 पर मशीन बार-बार खराब हो रही है चुनाव आयोग संज्ञान लेकर कृपया निष्पक्ष मतदान कराना सुनिश्चित करे। @ECISVEEP

    — Samajwadi Party (@samajwadiparty) February 10, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

शामली विधानसभा मतदारसंघातील बुथ नंबर 4 मधील ईव्हीएम मशीममध्ये वारंवार बिघाड होत असल्याचा आरोप समाजवादी पक्षाने केला आहे. निवडणूक आयोगाला समाजवादी पक्षाने निष्पक्ष मतदान करण्याची विनंती केली आहे.

12:12 February 10

बागपत आघाडीवर तर नोएडा मागे

सकाळी 11 वाजेपर्यंत 20 टक्के मतदान झाले आहे. आतापर्यंतच्या मतदानात बागपत आघाडीवर आहे तर नोएडा मागे आहे.

10:54 February 10

सकाळी नऊ वाजतापर्यंत 7.93 टक्के मतदान

यूपीमध्ये मतदानाचा उत्साह झपाट्याने वाढत आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये पहिल्या दोन तासांत 8 टक्के मतदान झाले आहे. यूपीमध्ये आतापर्यंत एकूण 7.93 टक्के मतदान झाले आहे.

06:58 February 10

11 जिल्ह्यातील 58 जागांसाठी मतदान

उत्तर प्रदेशातील विधानसभा निवडणुकीचा पहिला टप्पा आजपासून सुरू झाला आहे. पहिल्या टप्प्यात 11 जिल्ह्यातील 58 जागांवर मतदान पार पडत आहे. यामध्ये नोएडा, मथुरा, आगरा, शामली, मजप्फरनगर यासह इतर जिल्ह्यांचा समावेश आहे. भाजपा, समाजवादी पार्टी, काँग्रेस आणि बहुजन समाजवादी पार्टी यांच्यामध्ये लढत आहे. मथुरामध्ये कडाक्याच्या थंडीतही मतदान मतदान केंद्रावर आलेले दिसत होते. त्याची माहिती एएनआयने दिली आहे.

Last Updated :Feb 10, 2022, 6:02 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.