ETV Bharat / city

सप्टेंबर 2022 पासून शिवडी ते नाव्हा-शेवा प्रवास केवळ 25 मिनिटांत; सागरी सेतूचे काम ५० टक्के पूर्ण

author img

By

Published : Dec 5, 2020, 8:44 AM IST

Updated : Dec 5, 2020, 12:48 PM IST

shinde
एकनाथ शिंदे

या प्रकल्पाच्या कामाने वेग घेतला असून अंदाजे 50 टक्के काम पूर्ण झाले आहे. तर उर्वरित काम येत्या दोन वर्षात पूर्ण करत हा प्रकल्प सप्टेंबर 2022 ला वाहतूक सेवेत दाखल करण्यात येईल अशी माहिती नगरविकास मंत्री आणि एमएमआरडीएचे अध्यक्ष एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यास शिवडी ते नाव्हा-शेवा हे अंतर केवळ 25 मिनिटांत पार करता येणार आहे.

  • मुंबई- मुंबई आणि नवी मुंबई शहर एकमेकांना जोडत या दोन शहरातील प्रवासाचे अंतर कमी करण्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणा ( एमएमआरडीए) ने मुंबई ट्रान्स हार्बर लिंक रॉड अर्थात शिवडी-नाव्हा-शेवा सागरी सेतू प्रकल्प हाती घेतला आहे. आता या प्रकल्पाच्या कामाने वेग घेतला असून अंदाजे 50 टक्के काम पूर्ण झाले आहे. तर उर्वरित काम येत्या दोन वर्षात पूर्ण करत हा प्रकल्प सप्टेंबर 2022 ला वाहतूक सेवेत दाखल करण्यात येईल अशी माहिती नगरविकास मंत्री आणि एमएमआरडीएचे अध्यक्ष एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यास शिवडी ते नाव्हा-शेवा हे अंतर केवळ 25 मिनिटांत पार करता येणार आहे. त्यामुळे हा प्रकल्प मुंबईकर आणि नवी मुंबईकारांसाठी मोठा दिलासा ठरणार असल्याचे ही त्यांनी सांगितले आहे.
    मुंबईकर आणि नवी मुंबईकारांसाठी मोठा दिलासा ठरणार हा प्रकल्प


    दोन वर्षात कामाला वेग
    एमएमआरडीएने मुंबई आणि नवी मुंबई ही दोन शहरे जवळ आणण्यासाठी हा प्रकल्प हाती घेतला. या प्रकल्पाचे कंत्राट एल अँड टी कंपनीला देण्यात आले आहे. तर या प्रकल्पाच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली आहे. 22 किमी मार्गाचे हे काम अत्यंत अवघड होते. समुद्रातून इतका मोठा पूल बांधण्याचे हे अवघड आव्हान पेलण्यासाठी एमएमआरडीएने अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला आहे. आता दोन वर्षात कामाला वेग आला आहे. याच कामाचा आढावा शिंदे यांनी घेतला. यावेळी प्रसार माध्यमाशी बोलताना त्यांनी हा प्रकल्प सप्टेंबर 2022 मध्ये पूर्ण होऊन तो वाहतूक सेवेत दाखल होईल अशी माहिती दिली. तर या कामाबद्दल समाधान व्यक्त केले आहे.

    कामावर कोविड संकटाचा कोणताही परिणाम नाही
    मार्चपासून मुंबईसह देशात कोरोनाचा कहर सुरू झाला आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी 22 मार्चपासून देशात लॉकडाऊन सुरू झाले. परिणामी सर्व पायाभूत सुविधा प्रकल्पाची ही कामे ठप्प झाली. त्यानुसार या प्रकल्पाचेही काम काही दिवस बंद होते. पण मे-जूनमध्ये मात्र या कामाने वेग घेतला. कोरोनाचे सर्व नियम पाळत काम सुरू केले गेले. त्यानंतर कामाने वेग घेतला. दरम्यान इतर पायाभूत सुविधा प्रकल्पाच्या कामावर कोरोना-लॉकडाऊनचा मोठा परिणाम होऊन प्रकल्प 6 महिने लांबला आहे. मात्र एमटीएचएल प्रकल्पावर मात्र याचा कोणताही परिणाम झाला नसल्याची माहिती महानगर आयुक्त आर ए राजीव यांनी दिली.

    असा आहे प्रकल्प
    मुंबई ट्रान्स हार्बर लिंक (मुंबई पार बंदर प्रकल्प ) अर्थात शिवडी-नाव्हा-शेवा सागरी मार्ग

    अंमलबजावणी एजन्सी: एमएमआरडीए

    एकूण लांबी: सुमारे 22 किमी (सुमारे 16.5 किमी सागरी पूल+5.5 किमी जमिनीवर पूल)

    एकूण खर्च:-17.843 कोटी रुपये

    एकूण मार्गिका:-6 (येण्यासाठी 3 जाण्यासाठी 3)

    काम सुरू झाल्याचे वर्ष: मार्च 2018

    काम पूर्ण करण्याचे वर्ष: सप्टेंबर 2022

    आतापर्यंत काम पूर्ण 50 टक्के

    या प्रकल्पाच्या पूर्णत्वामुळे मुंबई ते नवी मुंबई नाव्हा-शेवा अंतर केवळ 25 मिनिटांत होणार पार


Last Updated :Dec 5, 2020, 12:48 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.