ETV Bharat / city

Mumbai Ganeshotsav 2022 कृत्रिम तलावाला मुंबईकरांचा प्रचंड प्रतिसाद, ३ पटीहून अधिक मूर्तींचे विसर्जन

author img

By

Published : Aug 30, 2022, 7:10 AM IST

huge response from mumbaikars to artificial lake for immersion of more than 3 times ganesha idols
कृत्रिम तलावाला मुंबईकरांचा प्रचंड प्रतिसाद

मुंबईमध्ये २०१५ मध्ये २५ हजार ४५४, २०१६ मध्ये ३० हजार ३५९, २०१७ मध्ये २९ हजार २८३, २०१८ मध्ये ३४ हजार ५८४, २०१९ मध्ये ३३ हजार ९२५, २०२० मध्ये ७० हजार २३३ तर २०२१ मध्ये ७९ हजार १२९ अशा एकूण ३ लाख २ हजार ९६६ मुर्त्यांचे विसर्जन कृत्रिम तलावात करण्यात आले आहे. पर्यावरणपूरक गणेशोत्सव Mumbai Ganeshotsav 2022 साजरा करण्याचे आवाहन पालिका दरवर्षी करते. पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी पालिका पुढाकार घेऊन महापालिका bmc artificial lake कृत्रिम तलाव निर्माण करते. त्याला नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे.

मुंबई महानगरामध्ये दरवर्षी गणेशोत्सव मोठ्या धुमधडाक्यात साजरा केला जातो. गेल्या ३ वर्षात मुंबईमधील Mumbai Ganeshotsav 2022 उत्सवासाठी स्थापना करण्यात येणाऱ्या मूर्तींची संख्या कमी झाली आहे. तर दुसरीकडे कृत्रिम तलावात bmc artificial lake विसर्जित करण्यात येणाऱ्या मूर्तींची संख्या ३ पटीहून अधिक वाढली आहे. यामुळे मुंबईकरांनी पालिकेच्या आवाहनानुसार पर्यावरण पूरक गणेशोत्सव साजरा करण्याला तसेच कृत्रिम तलावात मूर्तीचे विसर्जन करण्याला चांगला प्रतिसाद दिला असल्याचे दिसून येत आहे.

पर्यावरण पूरक उत्सव साजरा करण्याचे आवाहन मुंबईमध्ये ११ दिवस गणेशोत्सव मोठ्या धूम धडाक्यात साजरा केला जातो. दरवर्षी २ लाखाहून अधिक गणेश मूर्तीची स्थापना मुंबईमध्ये केली जात होती. स्थापना करण्यात येणाऱ्या बहुसंख्य मुर्त्या प्लास्टर ऑफ पॅरिसच्या असतात, त्यांचे रंगही हानिकारक असतात. यामुळे समुद्र, तलाव, नद्या आदी ठिकाणी असलेल्या प्राण्यांच्या जीवाला धोका असतो. यासाठी प्रदूषण नियंत्रण मंडळ, राज्य सरकार आणि मुंबई महापालिकेकडून मुर्त्या कृत्रिम तलावात विसर्जित कराव्यात असे आवाहन गेले काही वर्षे केले जात आहे.


कृत्रिम तलावाला नागरिकांचा प्रतिसाद मुंबईमध्ये २०१५ मध्ये २५ हजार ४५४, २०१६ मध्ये ३० हजार ३५९, २०१७ मध्ये २९ हजार २८३, २०१८ मध्ये ३४ हजार ५८४, २०१९ मध्ये ३३ हजार ९२५, २०२० मध्ये ७० हजार २३३ तर २०२१ मध्ये ७९ हजार १२९ अशा एकूण ३ लाख २ हजार ९६६ मुर्त्यांचे विसर्जन कृत्रिम तलावात करण्यात आले आहे. पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन पालिका दरवर्षी करते. पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी पालिका पुढाकार घेऊन कृत्रिम तलाव निर्माण करते. त्याला नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. मूर्तीचे विसर्जन करता यावे यासाठी पालिकेने ७४ नैसर्गिक स्थळी उपायोजना केली आहे. त्याच प्रमाणे लहान मूर्तीचे विसर्जन करता यावे यासाठी १६० कृत्रिम तलाव उभारले जात आहेत अशी माहिती पालिकेचे उपायुक्त व गणेशोत्सव समन्वयक हर्षद काळे यांनी दिली.


स्थापना करण्यात येणाऱ्या मुर्त्यांची संख्या घटली मुंबईत २०१५ मध्ये १ लाख ९२ हजार ३०८ गणेश मूर्तीची स्थापना करण्यात आली होती. २०१६ ते २०१८ या ३ वर्षात त्यात वाढ झाली. २०१६ मध्ये २ लाख १० हजार ११८, २०१७ मध्ये २ लाख ०२ हजार ३५२, २०१८ मध्ये २ लाख ३५ हजार ३७३ गणेश मूर्तीची स्थापना करण्यात आली होती. २०१९ मध्ये त्यात घट झाली. २०१९ मध्ये १ लाख ९६ हजर ४८३ मुर्त्यांची स्थापन करण्यात आली होती. २०२० मध्ये त्यात आणखी घट होऊन १ लाख ३५ हजार ५१५ मूर्तीची स्थापन करण्यात आली आहे. २०२१ मध्ये त्यात किंचीत वाढ होऊन १ लाख ६४ हजार ७६१ मूर्तीची स्थापना करण्यात आली.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.