ETV Bharat / city

Historical August Revolution Ground : ऑगस्ट क्रांती मैदानाचे ऐतिहासिक महत्त्व! ईटीव्ही भारतचा हा खास रिपोर्ट

author img

By

Published : Jan 26, 2022, 3:25 AM IST

देशाच्या क्रांतिकारकांनी मोठा लढा दिला आहे. या लढाईमध्ये मुंबईच्या ऑगस्ट क्रांती मैदानाला एक ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे. (Historical significance of August Revolution Ground) 9 ऑगस्ट 1942 ला महात्मा गांधी यांनी "भारत छोडो" चळवळीची सुरुवात मुंबईतून केली होती.

ऑगस्ट क्रांती मैदान
ऑगस्ट क्रांती मैदान

मुंबई - मुंबईत असलेल्या ऑगस्ट क्रांती मैदान याचं ऐतिहासिक महत्त्व आहे. (August Revolution) येथूनच महात्मा गांधींनी "भारत छोडो" आंदोलनाची हाक देशवासीयांना दिल. (Historical August Revolution Ground) या मैदानातून सुरू झालेल्या चळवळीमुळे ब्रिटिशांना देशातून आपली सत्ता सोडावी लागली होती.

अखिल भारतीय काँग्रेस समितीचे महाअधिवेशन बोलावले

पारतंत्र्यात असताना ब्रिटिश राजवट संपावी यासाठी देशाच्या क्रांतिकारकांनी मोठा लढा दिला आहे. या लढाईमध्ये मुंबईच्या ऑगस्ट क्रांती मैदानाला एक ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे. (August Revolution Ground History 2022) 9 ऑगस्ट 1942 ला महात्मा गांधी यांनी "भारत छोडो" चळवळीची सुरुवात मुंबईतून केली. महात्मा गांधी यांनी गोवालिया टँक( आताचे ऑगस्ट क्रांती मैदान) येथे अखिल भारतीय काँग्रेस समितीचे महाअधिवेशन बोलावले. देशभरात उभारणाऱ्या चळवळीचे केंद्रबिंदु त्यावेळेस ऑगस्ट क्रांती मैदान होते.

ऑगस्ट क्रांती या मैदानातून सुरू

ऑगस्ट क्रांती मैदानातून महात्मा गांधी यांनी "भारत छोडो" आंदोलनाची हाक दिली. ब्रिटिशांनी देशावरची सत्ता सोडण्याचा इशारा या आंदोलनातून देण्यात आला होता. ऑगस्ट क्रांती मैदानातून सुरू झालेल्या या चळवळीत हजारो क्रांतिकार यांनी आपल्या प्राणाची आहुती दिली. त्या सर्व हुतात्मे पत्करणार्‍या क्रांतिकार यांना आदरांजली म्हणून ऑगस्ट क्रांती मैदान ची ओळख आहे.

ऑगस्ट क्रांती मैदानाचाची रचना

मुंबईतील पशु आणि जनावरांना धुण्यासाठी पूर्वी या मैदानाचा उपयोग केला जात होता. म्हणूनच या मैदानाला गोवालिया टँक म्हटलं जायचं. 19000 वर्ग मीटरमध्ये हे मैदान असून, ऑगस्ट क्रांती मैदान हे पाच भागांमध्ये विभागला गेल आहे. या मैदानातील सगळ्यात मोठा भाग हा खेळासाठी वापरला जातो. तसेच वयोवृद्धांसाठी एक बगीचा इथे बनवण्यात आला आहे.

हे मैदान सध्या तरी थोडं दुरापास्त झालेलं दिसतय

लहान मुलांसाठी छोटे क्रीडांगण, तर मैदानाचा अजून एक भाग हौतात्म्य पत्करणार्‍या क्रांतीकारांचा स्मारक बनवला गेला आहे. तर पाचव्या भागामध्ये एक छोटा बगीचा बनवण्यात आला आहे. आता या मैदानाची देखभाल महानगरपालिका अंतर्गत केली जाते. मात्र या मैदानात ऐतिहासिक महत्त्व तरुणांपर्यंत पोहोचवण्यासाठी अद्यापपर्यंत कोणतीही योजना शासन दरबारी दिसत नाही. म्हणूनच हे ऐतिहासिक मैदानाचे महत्त्व फार मोठे असले तरी, हे मैदान सध्या तरी थोडं दुरापास्त झालेलं दिसतय. सध्या राज्यभरात वाढत्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे राज्य सरकारने लावलेल्या निर्बंधा नंतर हे मैदानही बंद ठेवण्यात आला आहे. मात्र मैदानाची देखभाल महानगरपालिकेकडून सुरू आहे.

हेही वाचा - Padma Award : पश्चिम बंगालचे माजी मुख्यमंत्री बुद्धदेव भट्टाचार्य यांनी पद्मविभूषण पुरस्कार नाकारला

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.