ETV Bharat / city

Dadaji Bhuse On Organic farming : सेंद्रिय शेतीसाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन आणि मदत करणार - दादाजी भुसे

author img

By

Published : May 7, 2022, 7:52 PM IST

सेंद्रिय शेतीचा जास्तीत ( Organic Farming ) जास्त प्रसार आणि प्रचार व्हावा, शेतकऱ्यांना त्याचा फायदाही व्हावा यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील आहे, असे राज्याचे कृषीमंत्री दादाजी भुसे म्हणाले ( Agriculture Minister Dadaji Bhuse ) आहेत.

Dadaji Bhuse
Dadaji Bhuse

मुंबई - रासायनिक खतांचा वापर झाल्याने त्याचा जमिनीसह मानव जातीवरही दुष्परिणाम जाणवू लागला आहे. त्यामुळे सेंद्रिय शेतीचा ( Organic Farming ) जास्तीत जास्त प्रसार आणि प्रचार व्हावा, शेतकऱ्यांना त्याचा फायदाही व्हावा यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील आहे, असे राज्याचे कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी 'ई टीव्ही भारत'शी सांगितले ( Agriculture Minister Dadaji Bhuse ) आहे.

दादाजी भुसे म्हणाले की, राज्यभरात रासायनिक खतांच्या वापरामुळे जमिनीचे मोठे नुकसान होत आहे. जमिनीचा पोत खराब होत आहे, यासाठी जास्तीत जास्त सेंद्रिय शेती शेतकऱ्यांनी करावी. म्हणून राज्य सरकार शेतकऱ्यांना प्रोत्साहन देणार आहे. याबाबत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारांच्या ( NCP Leader Sharad Pawar ) अध्यक्षतेखाली नुकतीच एक बैठक झाली आहे. या बैठकीत सहकार मंत्री बाळासाहेब पाटील ( Minister Balasaheb Patil ), दूग्ध विकास मंत्री सुनील केदार( Minister Sunil Kedar ), अन्न आणि औषध प्रशासन मंत्री राजेंद्र शिंगणे ( Minister Rajendra Shingane ) तसेच शेतकरी संघटना उपस्थित होत्या. सेंद्रिय शेतीला आणखी चांगले मोठ्या प्रमाणात बळ कसे देता येईल. शेतकऱ्यांना पाठबळ कसे देता येईल, या दृष्टिकोनातून सविस्तर चर्चा बैठकीमध्ये संपन्न झाली असल्याचे भुसे यांनी सांगितले आहे.

"रासायनिक खतांचा शेतीवर भडीमार" - पुढे भुसे यांनी म्हटले की, रासायनिक खते आणि द्रव्यांच्या वापरामुळे पर्यावरणावर आपल्या जमिनीच्या मातीवर त्याच्यासोबतच एकंदरीत मानव जातीवर गंभीर परिणाम दिसत आहेत. हे सगळे टाळण्याच्या दृष्टिकोनातून सेंद्रिय शेतीकडे मोठ्या प्रमाणात आपल्याला कस वळता येईल. तसेच, सेंद्रिय शेतीच्या माध्यमातून उत्पादनामध्ये वाढ कशी करता येईल. शेतकरी बांधवांनाही त्यामाध्यमातून दोन पैसे कसे जास्तीचे मिळतील. कृषी विभागांनी गेल्या दोन वर्षामध्ये या संदर्भातले काही नियोजन केल्याचे बैठकीत सांगण्यात आले.

"सेंद्रिय शेतीच्या नावाने ग्राहकांची फसवणूक नको" - योग्य दर्जाचा माल ग्राहकांपर्यंत गेला पाहिजे. काही ठिकाणी सेंद्रिय शेतीच्या नावाने ग्राहकांचे फसवणूक होताना आपल्याला दिसते. त्यामुळे जो मूळ सेंद्रिय माल आहे, त्याचे योग्य प्रमाणीकरण करुन त्याला दोन पैसै जास्तीचे मिळतील. त्या दृष्टिकोनातून त्याचा मार्केटिंग पण कसं करता येईल. तसेच, ग्राहकापर्यंत तो माल सुस्थितीत कसा पोहोचवता येईल, याबाबत कृषी विभागाच्या वतीने नियोजन सुरु आहे, अशी माहिती भुसे यांनी दिली आहे.

कृषी मंत्री दादाजी भुसे आणि प्रकाश सिंग रघुवंशी यांच्याशी संवाद साधताना प्रतिनिधी

"कार्बन क्रेडिट पॉलिसी राबवणार" - अनेक वर्षापासून ज्या पद्धतीने दर वर्षी लाखो टन रासायनिक खतांचा भडीमार जमिनीवर सुरु आहे. त्यामुळे मातीतील कार्बन कमी होत. आहे. त्यामुळे येणाऱ्या कालावधीत काही कंपन्या पुढे येत आहेत. ज्यामाध्यमातून शेतकरी बांधव आपल्या जमिनीतील कार्बन वाढवतील. जर, त्या प्रयोगाच्या माध्यमातून जमिनीतील कार्बन त्याने वाढवला त्याला थेट अनुदान कसे, देता येईल. या विषयावर कृषी विभाग गंभीरपणे विचार करत, असल्याचे भुसे यांनी सांगितले आहे.

सेंद्रिय शेती आणि देशी वाणांचा प्रसार - बनारस येथील प्रकाश सिंग रघुवंशी यांनी दादाजी भुसे यांची भेट घेतली आहे. त्यांनी देशी वाणांचे जतन करुन अतिशय उच्च दर्जाची पिके घेतलेली आहे. त्यांनी तूर सोयाबीन यासह अनेक भाज्यांची देशी बीजे जतन केली आहे. त्यांनी याबाबत राज्य सरकारला मदत करण्याचे दर्शवले असून, काही शेतकऱ्यांना मोफत बियाणे आणि प्रशिक्षण देण्याचे 'ई टीव्ही भारत'शी बोलताना मान्य केले. रघुवंशी हे गेल्या काही वर्षांपासून महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांना आधुनिक आणि सेंद्रिय पद्धतीने शेती करण्याचे प्रशिक्षण देत असतात.

हेही वाचा - Satara Gelatin Blast : जिलेटीन स्फोटाने सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचा बफर झोन हादरला, जिलेटीनच्या 115 कांड्या जप्त

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.