ETV Bharat / city

Maharashtra Breaking News पंतप्रधान मोदी यांना साजरा केला रक्षाबंधन

author img

By

Published : Aug 11, 2022, 6:41 AM IST

Updated : Aug 11, 2022, 2:22 PM IST

Maharashtra Breaking news
महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज

14:15 August 11

पंतप्रधान मोदी यांना साजरा केला रक्षाबंधन

पंतप्रधान कर्मचाऱ्यांच्या मुलींनी पंतप्रधान मोदी यांना रक्षाबंधन साजरे केले

12:50 August 11

शिंदे गटातील आमदार आनंद मठात राहणार उपस्थित

शिंदे गटातील आमदारांनी मंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर आज ठाण्यातील आनंद मठात उपस्थित राहणार आहेत.

आनंद मठात आनंद दिघे यांच्या प्रतिमेला वंदन करून पुढील वाटचाल सुरु करणार आहे

- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे राजकारणातील गुरु तर मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर ही मुख्यमंत्र्यानी आनंदमठ येथे लावली होती उपस्थिती

12:22 August 11

मुख्यमंत्र्यांनी महिला पोलिसांसोबत साजरा केला रक्षाबंधन सण

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान भवन परिसरामध्ये कर्तव्य बजावत असलेल्या महिला पोलिसांसोबत रक्षाबंधन सण साजरा केला. दिवसभर कर्तव्य बजावत असणाऱ्या महिला पोलिसांना घरी रक्षाबंधन साजरा करता येत नाही. म्हणून खुद्द मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी महिला पोलिसांसोबत रक्षाबंधन सोहळा साजरा केला

11:07 August 11

टीएमसी नेते अनुब्रत मंडल यांना सीबीआयकडून अटक

गोवंश तस्करी प्रकरणी सीबीआयने टीएमसी नेते अनुब्रत मंडल यांना अटक केली:

11:06 August 11

अकरावी ऑनलाइन प्रवेशाची दुसरी गुणवत्ता यादी आज जाहीर

अकरावी ऑनलाइन प्रवेशाची दुसरी गुणवत्ता यादी आज जाहीर

पहिल्या गुणवत्ता यादी मध्ये एक लाख 39 हजार विद्यार्थ्यांना अकरावीचे पहिल्या पसंतीचे विद्यालय दिले गेले होते.

पैकी 71 हजार विद्यार्थ्यांनी अद्यापही प्रतिसाद दिला नाही

10:50 August 11

हिमाचल प्रदेशातील पूरात इमारत वाहून गेली

कुल्लूच्या अन्नी ब्लॉकमध्ये मुसळधार पावसामुळे आलेल्या अचानक आलेल्या पुरात एक इमारत वाहून गेली. अन्नी बसस्थानकातील दृश्ये.

10:50 August 11

महाराष्ट्रातील व्यावसायिकाकडून ओडिशात १.२२ कोटी रुपयांची रकमेसह २० सोन्याची बिस्किटे जप्त

9 ऑगस्टच्या रात्री, उत्पादन शुल्क पथकाने गंजम जिल्ह्यातील लांजीपल्ली येथे एका महाराष्ट्रातील व्यावसायिकाच्या ताब्यातून 1.22 कोटी रुपयांहून अधिक रोख रक्कम आणि सुमारे 20 सोन्याची बिस्किटे जप्त केली

10:06 August 11

नितीश कुमार यांनी चुकीचा पक्ष निवडला-दीपक केसरकर

मला त्यांच्यावर (मुख्यमंत्री नितीशकुमार) टीका करायची नाही. ते एक ज्येष्ठ राजकारणी आहेत. मुख्यमंत्री म्हणून राज्याची चांगली सेवा केली आहे. पण त्यांनी चुकीचा पक्ष निवडला आहे असे वाटल्यास ते त्यांच्या निर्णयावर पुनर्विचार करू शकतो, असे शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी म्हटले आहे.

09:57 August 11

सेन्सेक्स ५८३.७३ अंकांनी वधारला

सेन्सेक्स ५८३.७३ अंकांनी वधारला आहे. सध्या ५९,४०१.०२ वर. निफ्टी 158.60 अंकांनी वधारून सध्या 17,693.35 वर आहे

09:55 August 11

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रक्षाबंधनानिमित्त दिल्या शुभेच्छा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रक्षाबंधनानिमित्त देशाला शुभेच्छा दिल्या आहेत.

09:28 August 11

दहशतवादी हल्ल्यात जखमी झालेल्या अधिकारावर उपचार सुरू

दहशतवादी हल्ल्यात जखमी झालेल्या लष्कराच्या जवानांमध्ये एका अधिकाऱ्याचाही समावेश आहे. त्याला वैद्यकीय उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. 16 कॉर्प्स कमांडर लेफ्टनंट जनरल मनजिंदर सिंग हे जमिनीवरील परिस्थितीवर सतत लक्ष ठेवून आहेत.

09:21 August 11

मुंबई पोलिसांनी उध्वस्त केले बेकायदेशीर ऑनलाईन लॉटरीचे रॅकेट

मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखा कक्ष क्रमांक तीनने साकीनाका येथील बेकायदेशीर ऑनलाईन लॉटरीचा पर्दाफाश केला आहे.

09:18 August 11

बंडखोर शिंदे गटाच्या नवनिर्वाचित 9 मंत्र्यांनी बाळासाहेब ठाकरे यांना केले अभिवादन

बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर जाऊन गुलाबराव पाटील, दादा भुसे, उदय सामंत, दीपक केसरकर, तानाजी पाटील, शंभूराज देसाई, संदिपान भुमरे, राठोड आणि अब्दुल सत्तार या नऊ मंत्र्यांनी अभिवादन केले. शिवसेनेच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांनी मंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर मंत्री फिरकले नसल्याचे टीका केली होती. यानंतर आज सर्व मंत्री शिवाजी पार्कवर आले.

08:50 August 11

कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांच्यावर दिल्लीच्या एम्समध्ये व्हेंटिलेटरवर उपचार सुरू

कॉमेडियन राजू श्रीवास्तव दिल्लीच्या एम्समध्ये व्हेंटिलेटरवर आहेत, ते वैद्यकीय उपचारांना प्रतिसाद देत असल्याचे सूत्रांनी सांगितले. जिममध्ये वर्कआऊट करताना छातीत दुखू लागल्याने आणि खाली कोसळल्याने त्यांना काल येथे दाखल करण्यात आले होते. नंतर त्यांची अँजिओप्लास्टी करण्यात आली.

08:02 August 11

स्टील व्यावसायिकांकडून ५८ कोटींची मालमत्त जप्त प्राप्तिकर विभागाने कारवाई केल्याची चर्चा

प्राप्तिकर विभागाने स्टील व्यावसायिकावर मोठी कारवाई केल्याची चर्चा आहे. या कारवाईत ५८ कोटींची मालमत्त जप्त केल्याचे बोलले जात आहे.

06:51 August 11

बीएसएफ जवानांनी साजरा केला रक्षाबंधन सण

जम्मूच्या आरएस पुरा सेक्टरमध्ये भारत-पाकिस्तान सीमेवर बीएसएफ जवानांनी रक्षाबंधन सण साजरा केला.

06:51 August 11

पुढील 5 दिवसांत तेलंगणात सरी कोसळण्याची शक्यता

पुढील 5 दिवसांत तेलंगणात काही ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. पुढील 48 तासांत हैदराबादमध्ये हलका पाऊस पडण्याची शक्यता असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.

06:51 August 11

पदक घेऊन मायदेशी परतताना खूप छान वाटत आहे- अविनाश साबळे

पदक घेऊन मायदेशी परतताना खूप छान वाटत आहे. खेळादरम्यान काही चुका झाल्या, त्यामुळे मला रौप्यपदक मिळाले. जागतिक चॅम्पियनशिप आणि ऑलिम्पिकमधील पुढील लक्ष्य पदकाचा रंग बदलणे आहे, अशी प्रतिक्रिया CWG22 मध्ये रौप्यपदक जिंकल्यावर नायब सुभेदार अविनाश साबळे यांनी दिली आहे.

06:50 August 11

बिहारमध्ये भाजप स्वबळावर सरकार बनवेल सुवेंदु अधिकारी

बिहारमध्ये जे झाले त्याचा फायदा भाजपला झाला. भाजप आणि पंतप्रधान मोदींच्या प्रतिमेमुळे नितीश कुमार यांना २०२० मध्ये बिहारमध्ये सरकार स्थापन करण्यात मदत झाली. बिहारमध्ये भाजप स्वबळावर सरकार बनवेल, असा विश्सास भाजप बंगालचे नेते सुवेंदु अधिकारी यांनी व्यक्त केला.

06:50 August 11

उघड्या नाल्यात पडलेला ७ वर्षी अद्यापही बेपत्ता

गुरुग्राम जिल्ह्यातील गडोली गावात उघड्या नाल्यात पडलेल्या ७ वर्षीय मुलाचा अद्याप शोध लागलेला नाही. बचावकार्य सुरू करून ७२ तास झाले आहेत. एनडीआरएफ, एसडीआरएफ आणि पोलिसांची टीम घटनास्थळी आहे, हा चौथा दिवस आहे.

06:50 August 11

श्रीजा अकुला यांचे हैदराबाद विमानतळावर भव्य स्वागत

CWG 2022: सुवर्णपदक विजेती श्रीजा अकुला यांचे हैदराबाद विमानतळावर भव्य स्वागत करण्यात आले.

06:50 August 11

अल-कायदाच्या प्लॅनबाबात पोलिसांनी कळाली महत्त्वाची माहिती

आसाम पोलिसांनी अल-कायदा, अन्सारुल्ला बांगला प्लॅनबद्दल महत्त्वाची माहिती मिळविली आहे.

06:49 August 11

पक्ष बदलू इच्छिणाऱ्या प्रत्येकासाठी ते 'मार्गदर्शक- आसामच्या मुख्यमंत्र्यांची नितीश कुमार यांच्यावर टीका

देखील बदलले आहेत, परंतु त्यांच्यासारखे नाही. दर 6 महिन्यांनी पक्ष बदलू इच्छिणाऱ्या प्रत्येकासाठी ते 'मार्गदर्शक' आहेत, अशी टीका आसामचे मुख्यमंत्री एच. बी. सरमा यांनी केली आहे. दुसरीकडे नितीश यांना उपराष्ट्रपती व्हायचे होते, असा आरोप भाजपचे सुशील मोदी यांनी केला आहे. 6-8 महिन्यांनंतर नितीशकुमार पुन्हा त्या युतीतून बाहेर पडणार नाहीत, याची खात्री कशी देणार?

06:49 August 11

तापी नदीत भाजपची तिरंगा रॅली

सुरतच्या तापी नदीत भाजपने तिरंगा रॅली काढली

06:23 August 11

Maharashtra Breaking News पंतप्रधान मोदी यांना साजरा केला रक्षाबंधन

मुंबई- महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांची राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी मातोश्री निवासस्थानी जाऊन बुधवारी भेट घेतली. 11 ऑगस्ट रोजी होणारी विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत उद्धव ठाकरे यांच्या गटातील दोन सदस्यांना समितीचे सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात यावी असे पत्र शिवसेनेचे अजय चौधरी यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना लिहिलं होतं. विधानसभा अध्यक्षांनी आमदार अजय चौधरी यांच्या पत्राला केराची टोपली दाखवत एकनाथ शिंदे गटाचे प्रथम भरत गोगावले यांच्या पत्रातून केलेल्या मागणीनुसार एकनाथ शिंदे गटातील मंत्री उदय सामंत आणि मंत्री दादाजी भुसे यांना कामकाज सल्लागार समितीच्या सदस्यत्व म्हणून मान्यता दिली आहे.

Last Updated : Aug 11, 2022, 2:22 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.