ETV Bharat / city

..म्हणून गुजरातच्या मुख्यमंत्र्यांची गुजराती संमेलनाला भेट

author img

By

Published : Oct 15, 2019, 9:39 PM IST

विजय रूपांनी मुख्यंमंत्री गुजरात

मुंबईतील गुजराती भाषीक मतदारांना आकर्षित करण्यासाठी गुजरातच्या मुख्यमंत्र्यांकडून प्रचार केला जात आहे. त्यांनी गुजराती संमेलनाला भेट दिली.

मुंबई - शहरातील पश्चिम उपनगरात मोठ्या संख्येने राहत असलेल्या गुजराती भाषिक मतदारांना आकर्षित करण्यासाठी गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपांनी यांनी विविध संमेलनाला भेट दिली. आज त्यांनी जोगेश्वरीत गुजरात समाज भवनमध्ये गुजरातच्या उद्योगपतींची मिटिंग घेतली. यानंतर त्यांनी अंधेरी, विलेपार्ले व बिकेसीत, हिरेव्यापारी उद्योगपतींनी आयोजित केलेल्या गुजराती समाज संमेलनाला भेट दिली.

विजय रूपांनी मुख्यंमंत्री गुजरात

उत्तर मुंबईतील काँग्रेसची एकमेव जागा जिंकण्यासाठी भाजपकडून शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत. गुजराती मतदारांना आकर्षित करण्यासाठी दिग्गज नेते व अभिनेत्यांना प्रचारात उतरवले जात आहे. आज मालाड विधानसभा भाजपचे उमेदवार रमेश सिंह ठाकूर यांच्या प्रचारार्थ आयोजित रोड शो मध्ये गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपांनी सहभागी झाले. यावेळी त्यांनी मालाडच्या जैन देरासार मंदिरात जाऊन दर्शन घेतले. गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपांनी यांनी देखील रॅलीच्या माध्यमातून लोकांना भाजपला मतदान करण्यासाठी आव्हान केले.

Intro:मुंबई - मुंबईतील पश्चिम उपनगरात मोठया संख्येने राहत असलेल्या गुजराती भाषिक मतदारांना आकर्षित करण्यासाठी गुजरातच्या मुख्यमंत्री विजय रूपांनी यांनी विविध संमेलनाला
भेट दिली. Body:आज त्यांनी जोगेश्वरीत गुजरात समाज भवनमध्ये गुजरातच्या उद्योगपतींची मिटिंग घेतली. तर अंधेरी, विलेपार्ले व बिकेसीत, हिरेव्यापारी उद्योगपतींनी आयोजित गुजराती समाज संमेलनाला भेट दिली.
उत्तर मुंबईतील काँग्रेसची एकमेव जागा जिंकण्यासाठी भाजपकडून शर्तीचे प्रयत्न केले जात आहेत. गुजराती मतदारांना आकर्षित करण्यासाठी दिग्गज नेते व अभिनेत्याना प्रचारात उतरवलं जातंय. आज मालाड विधानसभा भाजपचे उमेदवार रमेश सिंह ठाकूर यांच्या प्रचारार्थ आयोजित रोड शो मध्ये गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपांनी सहभागी झाले. यावेळी त्यांनी मालाडच्या जैन देरासार मंदिरात जाऊन दर्शन घेतले.
गुजरात चे मुख्यमंत्री विजय रूपांनी यांनी देखील रॅलीच्या माध्यमातून लोकांना भाजपला मतदान करण्यासाठी आव्हान केले.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.