ETV Bharat / city

सरकार एमपीएससीच्या विद्यार्थ्यांवर अन्याय करत आहे- पंकजा मुंडे

author img

By

Published : Mar 12, 2021, 12:57 AM IST

पंकजा मुंडे
पंकजा मुंडे

महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगामार्फत राज्यसेवा पूर्वपरीक्षा 14 मार्च रोजी घेण्यात येणार होती. पण ही परीक्षा पुढे ढकलली आहे.

मुंबई - महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगामार्फत राज्यसेवा पूर्वपरीक्षा 14 मार्च रोजी घेण्यात येणार होती. पण ही परीक्षा पुढे ढकलली आहे. तर राज्यात कोरोनाचे कारण देत ही परीक्षा लांबणीवर टाकण्यात आली आहे, असे सरकारकडून सांगण्यात आले. परंतु परिक्षा लांबणीवर टाकल्यामुळे विद्यार्थी नाराज आहेत.

पंकजा मुंडे

विद्यार्थ्यांमध्ये संताप-

एमपीएससीची परीक्षा दीड वर्षात पाच वेळा पुढे ढकलण्यात आली आहे. आता राज्य सरकार आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून आलेल्या निर्देशानंतर राज्यसेवा पूर्व परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय आयोगाने घेतलेला आहे. याबाबत प्रसिद्धीपत्रक राज्य लोकसेवा आयोगाच्या सदस्य सचिव यांनी गुरुवारी प्रसिद्धी पत्रक जारी केले आहे. ही परीक्षा महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने पुढे टाकल्यामुळे पुण्यात विद्यार्थ्यांमध्ये संताप पाहायला मिळत आहे. विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरू केलं. पुण्यातील नवी पेठ येथे विद्यार्थ्यांनी रास्तारोको केला. परीक्षा पुढे ढकलल्यामूळे विद्यार्थी आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले.

खरं सरकार कोण चालवत आहे?-

एमपीएससीच्या परीक्षा पुढे ढकलण्याचा हा सावळा गोंधळ कारभारावरती भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांनी सवाल उपस्थित केला आहे. खरं सरकार कोण चालवत आहे? या सरकारला काही ताळमेळ आहे का? असा सवाल पंकजा मुंडे यांनी माध्यमांशी बोलताना उपस्थित केला.

सरकारने ठरवलेल्या तारखे प्रमाणे एमपीएससीची परीक्षा घ्यावी-

विद्यार्थ्यांच्या आयुष्याची खेळण्याचा कोणताही हक्क सरकारला नाही. त्यामुळे सरकारने मुलांच्या हिताचे निर्णय लवकरात लवकर घ्यावे. मुलांना न्याय द्यावा, ही विनंती आहे. ग्रामीण भागातले खूप सारे विद्यार्थी हे मुंबई - पुणे या शहरात येऊन एमपीएससीचा अभ्यास करत आहेत. त्यांना सरासरी महिन्याकाठी दहा हजार रुपये इतका खर्च येतो. ग्रामीण भागातल्या मुलांना आपले आई-वडील कर्ज काढून शिकवत असतात. परंतु आता परीक्षा मात्र पुढे ढकलत असतील तर विद्यार्थ्यांच्या आणि पालकांच्या पदरी फक्त निराशा येईल. हे सरकारने लक्षात घ्यावं आणि ठरवलेल्या तारखेप्रमाणे एमपीएससीची परीक्षा घ्यावी, अशी विनंती पंकजा मुंडे यांनी केली.

हेही वाचा- एमपीएससी परीक्षेबाबत आठवडाभरात मुख्यमंत्री देणार स्पष्टीकरण

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.