ETV Bharat / city

ग्लोबल वार्मिंगचा धोका लक्षात घेऊन पर्यावरण रक्षणावर भर द्या - नाना पटोले

author img

By

Published : Nov 16, 2021, 10:22 PM IST

नाना पटोले
नाना पटोले

ग्लोबल वार्मिंगमुळे (Global warming) होत असलेले बदल हे मनुष्यासाठी अत्यंत घातक आहेत. पर्यावरणाचा ऱ्हास झाला तर जगणे मुश्कील होईल. त्यामुळे पर्यावरण रक्षण ही काळाची गरज असून आपल्या सर्वांची ती जबाबदारी आहे. काँग्रेस पक्षाचा पर्यावरण सेल पर्यावरणासाठी करत असलेले काम अत्यंत कौतुकास्पद असून या कामात खंड पडू न देता पर्यावरण रक्षण करा, असे आवाहन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केले.

मुंबई - ग्लोबल वार्मिंगमुळे (Global warming) होत असलेले बदल हे मनुष्यासाठी अत्यंत घातक आहेत. पर्यावरणाचा ऱ्हास झाला तर जगणे मुश्कील होईल. त्यामुळे पर्यावरण रक्षण ही काळाची गरज असून आपल्या सर्वांची ती जबाबदारी आहे. काँग्रेस पक्षाचा पर्यावरण सेल पर्यावरणासाठी करत असलेले काम अत्यंत कौतुकास्पद असून या कामात खंड पडू न देता पर्यावरण रक्षण करा, असे आवाहन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केले.

टिळक भवन येथे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या पर्यावरण सेलच्या पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण सोहळा पार पडला यावेळी ते बोलेत होते. पर्यावरणातील बदलामुळे हिमालयातील बर्फही वितळू लागला आहे. या बदलाचा फटका समुद्रकिनारी असलेल्या शहरांना बसत आहे. पर्यावरणाच्या समस्या वाढल्या आहेत. त्यामुळे झाडे लावणे व जोपसण्याला प्राधान्य दिले पाहिजे, असेही नाना पटोले म्हणाले.

पर्यावरणा सोबत लोकशाही व संविधान वाचवण्याची गरज..

यावेळी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले, पर्यावरण सेलचे काम किती मोलाचे व महत्वाचे आहे हे आपण आरे बचाव आंदोलनात पाहिले. या आंदोलनातून दिलेला संदेश अत्यंत महत्त्वाचा आहे. प्राण गेले तरी मागे हटणार नाही ही पर्यावरण प्रेमींची भूमिका वाखाणण्यासारखी आहे. चिपको आंदोलनाएवढेच आरेतील वृक्ष बचावचे आंदोलन महत्वाचे होते. पर्यावरण रक्षणाची जशी आपली जबबादारी आहे तशीच लोकशाही व संविधान वाचवण्याची जबाबदारीही आहे, असे थोरात म्हणाले.

यावेळी, आरे आंदोलनात वृक्ष वाचवण्यासाठी तरुंगात गेलेले सामाजिक कार्यकर्ते शशी सोनावणे, प्रशांत कांबळे, संदीप परब, प्रमिला भोईर, मयुर आग्रे, विजयकुमार कांबळे, श्रीधर, सोनाली, संदेश आणि कमलेश यांचा प्रदेशाध्यक्ष नाना पटोले व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमात पर्यावरण सेलच्या पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण सोहळाही पार पडला.

हे ही वाचा - Mumbai Air Pollution : मुंंबई गुदमरतेय! वायू प्रदुषणात दिल्लीलाही टाकले मागे!

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.