ETV Bharat / city

नियम पाळून निर्विघ्नपणे पार पडला उत्सव, कार्यकर्त्यांची मुंबई महापौरांकडे प्रतिक्रिया

author img

By

Published : Sep 19, 2021, 5:04 PM IST

मुंबईत गेल्या वर्षी मार्च पासून कोरोनाचा प्रसार आहे. जगभरात कोरोना विषाणूची तिसरी लाट आली आहे. मुंबईसह महाराष्ट्रातही तिसरी लाट येण्याची शक्यता असल्याने गणेशोत्सव साजरा करण्यावर निर्बंध लागू करण्यात आले.

ganpati immersion
ganpati immersion

मुंबई - कोरोना विषाणू प्रसाराच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकार आणि मुंबईत महापालिकेने गणेशोत्सव साधेपणाने साजरा करण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार नियम पाळून एकदम चांगला उत्सव साजरा झाला. ही गोष्ट मुख्यमंत्र्यांना सांगा अशी प्रतिक्रिया मुंबईचा राजा गणेश गल्ली मंडळाकडून देण्यात आली आहे. गिरगाव चौपाटीवर महापौरांनी गणेश विसर्जनासाठी येणाऱ्यांचे स्वागत करताना ही प्रतिक्रिया दिली.

निर्विघ्नपणे पार पडला उत्सव

निर्बंधांमध्ये गणेशोत्सव
मुंबईत गेल्या वर्षी मार्च पासून कोरोनाचा प्रसार आहे. जगभरात कोरोना विषाणूची तिसरी लाट आली आहे. मुंबईसह महाराष्ट्रातही तिसरी लाट येण्याची शक्यता असल्याने गणेशोत्सव साजरा करण्यावर निर्बंध लागू करण्यात आले. घरगुती गणेश मूर्त्यांचे विसर्जन करताना ५ व्यक्ती, सार्वजनिक मंडळाच्या गणेश मूर्तींचे विसर्जन करताना १० कार्यकर्त्यांना परवानगी देण्यात आली आहे. मंडपात आणि विसर्जनाला येणाऱ्या लोकांनी कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन डोस घेतले पाहिजे. मास्क घालावे, गर्दीत जाऊ नये, हात वारंवार धुवा या नियमांचे पालन करण्याचे आवाहन पालिकेने केले.

नियम पाळून उत्सव साजरा
या पार्श्वभूमीवर आज मुंबईमधून दहा दिवसांचे गणेश विसर्जन आज सुरू आहे. या दरम्यान मुंबईचा राजा असलेल्या गणेश गल्ली गणेशउत्सव मंडळाचा गणपती गिरगाव चौपाटी येथे विसर्जनाला पोहचला असता महापौर किशोरी पेडणेकर यांनी त्याचे स्वागत केले. यावेळी गणेशोत्सव एकदम छान झाला, सर्व नियम पाळून उत्सव साजरा करण्यात आला. महापालिकेनेही चांगले सहकार्य केले, साहेबांना म्हणजेच मुख्यमंत्र्यांना सांगा अशी प्रतिक्रिया एका कार्यकर्त्याने महापौरांशी बोलताना व्यक्त केली आहे.

जुहू चौपाटीवरही गर्दी

दहा दिवस गणरायाची पूजा-अर्चना केल्यानंतर गणपती बाप्पांचे विसर्जन केले जाईल यासाठी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने जय्यत तयारी करण्यात आलेली आहे. मुंबईतल्या जुहू चौपाटी वर सध्या पर्यटकांची गर्दी पाहायला मिळते. मात्र, गणरायाची मूर्ती विसर्जन साठी आल्यानंतर या ठिकाणी पर्यटकांना प्रवेश बंदी केले जाणार आहे. महानगरपालिकेच्या लाईफ गार्डच्या माध्यमातूनच बाप्पांचे विसर्जन केले जाईल.

हेही वाचा - गडचिरोलीतील सूरजागड लोह खनिज प्रकल्पाला मजूर पुरवठा करणाऱ्याची नक्षलवाद्यांकडून हत्या

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.