ETV Bharat / city

माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांना पुन्हा ईडीचे समन्स, आज चौकशीला हजर राहण्याचे निर्देश

author img

By

Published : Jul 15, 2022, 2:09 PM IST

संजय पांडे
संजय पांडे

काही दिवसांपूर्वीच ईडीने मुंबईचे माजी पोलिस आयुक्त संजय पांडे यांच्याविरोधातही गुन्हा दाखल केला होता. तसेच स्टॉक एक्स्चेंजच कर्मचाऱ्यांच्या अवैध फोन टॅपिंग आणि हेरगिरी प्रकरणात पांडे यांच्या विरोधात मनी लाँड्रिंग कायद्यानुसार हा गुन्हा दाखल केला असल्याचीही माहिती समोर आली आहे. याच प्रकरणात आता त्यांच्यामागे चौकशीचा ( before the ED for questioning ) फेरा लागला आहे.

मुंबई- मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे ( Mumbai Police Commissioner Sanjay Pandey ) यांच्या अडचणी कमी होताना दिसत नाही आहे. ईडीने बेकायदेशीर फोन टॅपिंग प्रकरणात पुन्हा चौकशी करण्याकरिता दिल्लीतील ईडी कार्यालयात आज हजर राहण्याकरिता समन्स ( ED office in Delhi ) पाठवले आहे. मागील आठवड्यातदेखील ईडीने संजय पांडे यांची चौकशी केली होती.

नॅशनल स्टॉक एक्सचेंज फोन टॅपिंग प्रकरणात आधी त्यांच्या विरोधात ईडी आणि सीबीआयने ( National Stock Exchange phone tapping ) गुन्हे दाखल केले. आता पांडे यांना ईडीकडून चौकशीसाठी दुसरा समन्स आलाय. त्यांना ईडी समोर चौकशीला हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे आता पांडे यांच्या अडचणी आणखी किती वाढणार? हे पाहणे महत्त्वाचं ठरणार आहे. दुसरीकडे याच प्रकरणात चित्रा रामकृष्णन यांना ईडीकडून अटक करण्यात आली आहे. याच प्रकरणात आणखी काही जणांना अटक झाल्याची माहितीही समोर आली आहे. जसेजसे तपास पुढे जाईल तसतशी या प्रकरणातील अटक होणाऱ्यांची संख्याही दिवसेंदिवस वाढत चालली आहे.



पांडे यांच्यावर हा आहे आरोप-काही दिवसांपूर्वीच ईडीने मुंबईचे माजी पोलिस आयुक्त संजय पांडे यांच्याविरोधातही गुन्हा दाखल केला होता. तसेच स्टॉक एक्स्चेंजच कर्मचाऱ्यांच्या अवैध फोन टॅपिंग आणि हेरगिरी प्रकरणात पांडे यांच्या विरोधात मनी लाँड्रिंग कायद्यानुसार हा गुन्हा दाखल केला असल्याचीही माहिती समोर आली आहे. तसेच दुसरीकडे यापूर्वी सीबीआयनेही पांडेंविरोधात गुन्हा दाखल केला होता. नारायण आणि रामकृष्ण या दोघांनी शेअर बाजारातील कर्मचाऱ्यांचे फोन अवैधरित्या टॅप केल्याचा आरोप आहे. या कामासाठी मुंबईचे तत्कालीन पोलिस आयुक्त संजय पांडे यांनी स्थापन केलेल्या एका कंपनीची मदत घेतली होती, असा आरोप पांडे यांच्यावर करण्यात आलाय. त्यामुळे याच प्रकरणात आता त्यांच्यामागे चौकशीचा फेरा लागला आहे.



चित्रा रामकृष्ण यांना यापूर्वीच अटक- या प्रकरणात अटक केलेल्या आरोपींकडून अजून काही खळबळजनक खुलासेही करण्यात आले आहेत. तसेच याच प्रकरणात महिला व्यवस्थापकीय संचालक चित्रा रामकृष्ण यांना ईडीने अटक केली आहे. त्यांच्या कार्यपद्धतीबाबतही काही धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्या मांत्रिकाच्या आधाराने अनेक काम ठरवत असल्याच्याही चर्चा समोर आल्या आहेत. संजय पाडे हे सेवेत असतानाही कायम चर्चेत राहिले आहेत. त्यांची नाराजीही अनेकदा उघडपणे बाहेर आली आहे. तसेच भाजप नेते किरीट सोमय्या यांनीही यावरून पांडे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. तसेच याच प्रकरणाचा पाठपुराव करत सोमय्या हे आज दिल्ली दाखल झाले होते.



नुकतेच पदावरून निवृत्त- संजय पांडे हे 1986 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झाल्यानंतर ते राज्याचे पोलीस महासंचालक देखील होते. पण काही तांत्रिक आणि कायदेशीरबाबींमुळे त्यांची पोलीस महासंचालक पदावरुन मुंबई पोलीस आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली होती. ते नुकतेच तीन दिवसांपूर्वी 30 जूनला मुंबई पोलीस आयुक्तपदावरुन निवृत्त झाले आहेत. त्यानंतर त्यांना ईडीने नोटीस पाठवल्याची बातमी समोर आली आहे.

हेही वाचा-Shinde government : शिंदे सरकारचा महाविकास आघाडीला आणखी धक्का; नामांतराच्या निर्णयाला दिली स्थगिती

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.