ETV Bharat / city

Anil Deshmukh Bail Hearing Today : अनिल देशमुख यांच्या जामीन अर्जावर आज विशेष सीबीआय कोर्टात सुनावणी

author img

By

Published : Oct 18, 2022, 10:57 AM IST

Anil Deshmukh Bail Hearing
माजी गृहमंत्री अनिल देशमुख

माजी गृहमंत्री अनिल देशमुख (former Home Minister Anil Deshmukh) यांच्या जामीन अर्जावर आज मुंबई सत्र न्यायालयातील विशेष सीबीआय कोर्टामध्ये सुनावणी होणार (Anil Deshmukh Bail Hearing Today) आहे. अनिल देशमुख यांच्या वतीने वरिष्ठ वकील विक्रम चौधरी आणि वकील इंद्रपाल सिंग युक्तिवाद करणार (money laundering case) आहे.

मुंबई : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या जामीन अर्जावर आज मुंबई सत्र न्यायालयातील विशेष सीबीआय कोर्टामध्ये सुनावणी होणार (Anil Deshmukh Bail Hearing Today) आहे. अनिल देशमुख यांच्या वतीने वरिष्ठ वकील विक्रम चौधरी आणि वकील इंद्रपाल सिंग युक्तिवाद करणार (money laundering case) आहे. माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांनी मुंबईतील बार रेस्टॉरंट मालकांकडून वसुली करण्याचे निर्देश दिले असल्याचा आरोप लावल्यानंतर सीबीआयच्या वतीने गुन्हा दाखल करण्यात आला होता. अनिल देशमुख या प्रकरणात सध्या न्यायालयीन कोठडीत आहे.

जामीन मंजूर : सीबीआयच्या गुन्ह्यावरुन ईडीने दाखल केलेल्या गुन्ह्यात उच्च न्यायालयाने देशमुखांना जामीन मंजूर केला आहे. तसेच याविरोधात सर्वोच्च न्यायालयात गेलेल्या ईडीला कोणताही दिलासा न देता सर्वोच्च न्यायालयानं त्यांचे अपील फेटाळून लावले आहे. त्यामुळे देशमुखांनी सीबीआयच्या प्रकरणातही जामीन मागत कोर्टात याचिका दाखल केली आहे. यावरील सुणावणीला आजपासून सुरुवात होणार (bail application Hearing in CBI court) आहे.


सुनावणी सुरु : दरम्यान आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात अटकेत असलेले राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख (former Home Minister Anil Deshmukh) यांच्या न्यायालयीन कोठडीत 1 नोव्हेंबरपर्यंत वाढ करण्याचा निर्णय मुंबई सत्र न्यायालयाने दिला होता. या प्रकरणात अनिल देशमुख यांच्यासह कुंदन शिंदे आणि संजीव पालांडे या आरोपींच्याही न्यायालयीन कोठडीत वाढ करण्यात आली आहे. आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात सीबीआयने अनिल देशमुख यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाची सुनावणी न्यायालयात सुरु (Anil Deshmukh bail application) आहे.


अनिल देशमुखांना मोठा दिलासा : अनिल देशमुख यांच्या भ्रष्टाचाराच्या प्रकरणात जामीन अर्जाला विरोध करत सीबीआयने शुक्रवारी 15 ऑक्टोबर आपला जबाब नोंदवला होता. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते देशमुख यांना अंमलबजावणी संचालनालयाने गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये मनी लाँड्रिंग प्रकरणात अटक केली होती. सध्या ते आर्थर रोड तुरुंगात आहेत. गेल्या आठवड्यात मुंबई उच्च न्यायालयाने मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात देशमुखांना जामीन मंजूर केला होता. त्यानंतर त्यांनी भ्रष्टाचाराच्या प्रकरणात जामिनासाठी विशेष सीबीआय न्यायालयात धाव घेतली होती. सर्वोच्च न्यायालयाने मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयामध्ये हस्तक्षेप करणार नसल्याचे सांगत अनिल देशमुख यांना मोठा दिलासा दिला (Anil Deshmukh bail application Hearing) आहे.

अजून मुक्काम कोठडीतच : ईडीने दाखल केलेल्या गुन्ह्यामध्ये अनिल देशमुख यांना जरी जामीन मिळाला असला, तरी त्यांच्यावर सीबीआयनेही आर्थिक गैरव्यवहाराचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात त्यांना अद्याप जामीन मिळाला नसल्याने त्यांना कोठडीतच राहावे लागणार आहे.

अनिल देशमुखांवर उपचार सुरू : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना अंजॉग्रफीच्या उपचाराकरिता मुंबईतील खाजगी जसलोक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अनिल देशमुख यांना वयानुसार अनेक गंभीर आजार असल्याने त्यांच्यावर खाजगी रुग्णालयामध्ये अँजिओग्राफी करिता परवानगी देण्यात यावी, याकरिता अर्ज करण्यात आला होता. या अर्जाला मागील आठवड्यात मुंबई सत्र न्यायालयातील विशेष पीएमएलए कोर्टाने परवानगी दिली होती. सध्या अनिल देशमुख यांच्यावर उपचार सुरू (bail application Hearing in CBI court) आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.