ETV Bharat / city

Parambir Singh allegations : वाझेला पुन्हा नोकरीत घेण्यासाठी अनिल देशमुखांचे आदेश, मुख्यमंत्र्यांच्याही होत्या सूचना - परमबीर सिंग

author img

By

Published : Feb 2, 2022, 5:12 PM IST

Updated : Feb 2, 2022, 6:46 PM IST

100 कोटी वसुली प्रकरणात माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग ( Parambir Singh ) यांचा ईडीने जबाब घेतला. यात परमबीर सिंग यांनी धक्कादायक माहिती दिली. माजी पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना पुन्हा नोकरीत घेण्यासाठी मला गृहमंत्री अनिल देशमुख ( Anil Deshmukh ) यांचे आदेश होते, तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्याही मला थेट सूचना होत्या, असा धक्कादायक आरोप परमबीर सिंग ( Parambir Singh allegations on Anil Deshmukh ) यांनी केल्याचे सूत्रांनी सांगितले.

Former Commissioner of Police Parambir Singh allegations on Anil Deshmukh
Former Commissioner of Police Parambir Singh allegations on Anil Deshmukh

मुंबई - 100 कोटी वसुली प्रकरणात माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग ( Parambir Singh ) यांचा ईडीने जबाब घेतला. यात परमबीर सिंग यांनी धक्कादायक माहिती दिली. माजी पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना पुन्हा नोकरीत घेण्यासाठी मला गृहमंत्री अनिल देशमुख ( Anil Deshmukh ) यांचे आदेश होते, तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्याही मला थेट सूचना होत्या, असा धक्कादायक आरोप परमबीर सिंग ( Parambir Singh allegations on Anil Deshmukh ) यांनी केल्याचे सूत्रांनी सांगितले.

हेही वाचा - Chandrakant Patil on Wine Sale Decision : वाईन विक्रीसंदर्भातला निर्णय सरकारला मागे घ्यावाच लागेल - चंद्रकांत पाटील

माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी दिलेल्या माहितीनुसार, सचिन वाझे यांना मुंबई पोलीस दलामध्ये पुन्हा रुजू करण्याकरिता मला माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितले होते, तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी देखील निर्देश दिले होते. तसेच, सचिन वाझे यांना मुंबई क्राईम ब्रांचमध्ये महत्त्वपूर्ण असलेल्या CIU विभागात रुजू करण्यात यावे, असे सांगण्यात आले होते. निलंबित झालेल्या अधिकाऱ्यांना वापस घेणाऱ्या समितीचे अध्यक्ष हे पोलीस कमिशनर असतात, त्यामुळे त्यांनी मला हे थेट निर्देश दिले होते, असे परमबीर सिंग यांनी आपल्या जबाबात म्हटल्याचे सूत्रांनी सांगितले.

परमबीर यांची ईडीने मागील वर्षी पोलीस दलातील बदल या संदर्भात चौकशी केली होती. यामध्ये मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाला असल्याचे ईडीकडून म्हटले होते. त्यामुळे, या प्रकरणात ईडीने अनिल देशमुख यांच्यासह परिवहन मंत्री अनिल परब आणि तत्कालीन गृह सचिव सीताराम कुंटे यांचा देखील जबाब नोंदवला होता. त्याचप्रमाणे तत्कालीन माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांचा जबाब नोंदविण्यात आला त्यावेळी परमबीर यांनी ईडीला ही माहिती दिली.

काय आहे प्रकरण?

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना पत्र लिहून माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले होते. अनिल देशमुखांनी सचिन वाझेला प्रत्येक महिन्याला 100 कोटी रुपयांचे वसुलीचे टार्गेट दिले होते, असा खळबळजनक आरोप परमबीर सिंग यांनी पत्राच्या माध्यमातून केला होता. यानंतर निलंबित एपीआय सचिन वाझे यांच्यावरही या प्रकरणातील प्रमुख आरोपी म्हणून अटकेची कारवाई करण्यात आली. तसेच, देशमुख यांचे खासगी सचिव संजीव पालांडे आणि खासगी सहायक कुंदन शिंदे यांनाही याचप्रकरणात अटक करण्यात आली होती. सचिन वाझे सध्या कोठडीत आहे.

हेही वाचा - Raj Thackeray Meeting : तयारीला लागा... राज ठाकरेंचा पदाधिकाऱ्यांना आदेश

Last Updated :Feb 2, 2022, 6:46 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.