ETV Bharat / city

Voting permission denied : मुख्यमंत्र्यांना खुर्ची जाण्याची भीती- किरीट सोमय्या

author img

By

Published : Jun 17, 2022, 5:56 PM IST

मंत्री नवाब मलिक आणि माजी मंत्री अनिल देशमुख ( Former Minister Anil Deshmukh ) यांना विधान परिषदेत मतदान ( Voting permission denied ) करण्याची परवानगी देणारी याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली. या कारणाने महाविकास आघाडी ( Mahavikas Aghadi )सरकारला मोठा झटका लागला आहे. याबाबत बोलताना भाजप नेते किरीट सोमय्या ( BJP leader Kirit Somaiya ) यांनी या निर्णयाचे स्वागत करत, ठाकरे सरकारवर पुन्हा एकदा कडक ( riticism on Thackeray government ) शब्दात ताशेरे ओढले आहेत.

Kirit Somayya
किरीट सोमय्या

मुंबई - मंत्री नवाब मलिक आणि माजी मंत्री अनिल देशमुख यांना विधान परिषदेत मतदान ( Voting permission denied ) करण्याची परवानगी देणारी याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली. या कारणाने महाविकास आघाडी ( Mahavikas Aghadi )सरकारला मोठा झटका लागला आहे. याबाबत बोलताना भाजप नेते किरीट सोमय्या ( BJP leader Kirit Somaiya ) यांनी या निर्णयाचे स्वागत करत, ठाकरे सरकारवर पुन्हा एकदा कडक ( riticism on Thackeray government ) शब्दात ताशेरे ओढले आहेत. याबाबत बोलताना किरीट सोमैया म्हणाले की, मुख्यमंत्र्यांना ही पंधरावी झापट मारली गेली आहे. आता मुख्यमंत्र्यांचे गाल सुजले आहेत. मागील राज्यसभेच्या निवडणुकीत भाजपने नाक कापून हातात दिले होते.

नवाब मालिक देशद्रोही - आता विधान परिषद निवडणुकीत कपडे उतरवले जाऊ नयेत म्हणून मुख्यमंत्री काळजी घेत आहेत. उद्धव ठाकरे, शरद पवार, काँग्रेसचे नेते एकत्र येऊन याबाबत रणनीती आखत आहेत. नवाब मालिक दाऊद चा एजंट असून तो देशद्रोही आहे असे, कोर्टाने म्हटले आहे. आता ठाकरे सरकार कुठल्या कोर्टात जाणार? असा प्रश्नही किरीट सोमय्या यांनी या प्रसंगी उपस्थित केला.

हेही वाचा - Agnipath scheme protest: अनेक राज्यांमध्ये गोंधळ, रेल्वे गाड्यांची जाळपोळ, पोलिसांच्या गोळीबारात एकाचा मृत्यू

विधानपरिषदेत झटका बसणार - नवाब मलिक, अनिल देशमुख यांच्या निर्णयावर बोलताना, संजय राऊत म्हणाले की, 'कोर्टाच्या निर्णयानंतर संसदीय लोकशाहीला टाळ लावल पाहिजे'. त्यावर बोलताना किरीट सोमय्या म्हणाले की, संजय राऊतमध्ये हिंमत नाही. मुंबई महापालिकेत माफिया गिरी सुरू होती. त्यावर आता आवाज उठवायला सुरुवात झाली आहे. आता विधान परिषदेत गोंधळ झाला तर मुख्यमंत्री पदाची खुर्ची राहणार का? अशी कडवट टिका त्यांनी केली.

हेही वाचा -Mumbai High Court : मलिक आणि देशमुखांना उच्च न्यायालयाचा झटका; विधानपरिषदेसाठी मतदान करण्याची परवानगी नाकारली

हेही वाचा - Sadabhau Khot : शरद पवारांकडून आपल्याला धोका; सदाभाऊ खोतांचा आरोप

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.