ETV Bharat / city

आजही देशातील सरकार लोकशाहीचा गळा दाबण्याच्या प्रयत्नात - जयंत पाटील

author img

By

Published : Aug 9, 2021, 1:02 PM IST

ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त मुंबई येथील ऐतिहासिक ऑगस्ट क्रांती मैदानाला भेट देऊन स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या हुतात्म्यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी आज (सोमवार) अभिवादन केले. यावेळी त्यांच्यासमवेत कॅबिनेट मंत्री आणि मुंबई अध्यक्ष नवाब मलिक व राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई पदाधिकारी उपस्थित होते.

government of country is trying to strangle democracy
स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या हुतात्म्यांना केले अभिवादन

मुंबई - ऑगस्ट क्रांती मैदानात ब्रिटिशांची जुलमी राजवट उलथवून टाकण्यासाठी 'भारत छोडो'चा नारा दिला होता आणि अहिंसेचा मार्ग स्वीकारून ब्रिटिशांना परतवून लावले होते. आजही देशातील सरकार लोकशाहीचा गळा दाबण्याचा प्रयत्न करत आहे. पेगासससारख्या गोष्टी आणून अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणली जात असल्याचा आरोप जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केला आहे. महात्मा गांधी यांच्या नेतृत्वाखाली ज्याप्रमाणे देश एकवटला होता. त्याचप्रमाणे, आजही देश लोकशाही वाचवण्यासाठी, भारतीय संविधानाचा मान राखण्यासाठी एकवटल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास पाटील यांनी यावेळी व्यक्त केला.

स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या हुतात्म्यांना केले अभिवादन

स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या हुतात्म्यांना केले अभिवादन -

ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त मुंबई येथील ऐतिहासिक ऑगस्ट क्रांती मैदानाला भेट देऊन स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या हुतात्म्यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी आज (सोमवार) अभिवादन केले. यावेळी त्यांच्यासमवेत कॅबिनेट मंत्री आणि मुंबई अध्यक्ष नवाब मलिक व राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई पदाधिकारी उपस्थित होते.

लोकल प्रवासासंदर्भात राज्य सरकारचा टप्प्याटप्याने निर्णय -

15 ऑगस्टपासून कोविड लसीचे दोन डोस देणाऱ्या नागरिकांना लोकलमध्ये प्रवासाची मुभा देण्यात आलेली आहे. कोविड परिस्थिती पाहून राज्य सरकार टप्याटप्याने लोकल सेवेसंदर्भात निर्णय घेईल. भारतीय जनता पक्षाला श्रेयवादाची लढाई करायची असेल तर, ती करून द्या. मात्र, राज्य सरकार परिस्थिती पाहूनच निर्णय घेईल असेही वेळी जयंत पाटील यांनी स्पष्ट केले.

लोकांना समान वागणूक देण्यासाठी राष्ट्रवादी प्रयत्नशील -

देशात अद्यापही अनेक संकट आहेत. या संकटांवर सर्वांनी मिळून मात करणे गरजेचे आहे. यासोबतच समाजात सर्व लोकांना समान वागणूक मिळावी यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नेहमी प्रयत्नशील राहील, असा विश्वासही यावेळी राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी व्यक्त केला आहे.

हेही वाचा - कुठपर्यंत शांत बसायचं, वेळ आली तर राष्ट्रवादीला बुडवू - खासदार संजय जाधव

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.